Weekly Money Horoscope : सूर्य-शुक्र भेट! हा आठवड्यात 'या' राशीसाठी ठरणार भाग्यभाली

Weekly Money Horoscope 15 to 21 May 2023 : या आठवड्यात सूर्य वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. सुर्य आणि शुक्र भेटीमुळे काही राशींचे भाग्य चमकणार आहे. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. (Weekly Finance Horoscope)  

May 14, 2023, 16:20 PM IST

Weekly Money Horoscope 15 to 21 May 2023 : जगण्यासाठी प्रेम आणि पैसा या दोन्ही गोष्टी आवश्यक आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या येणारा आठवडा कसा असेल प्रत्येकाला जाणून घ्यायचं असतं. हा आठवडा पुन्हा काही राशींसाठी आर्थिकदृष्ट्या शुभ ठरणार आहे. (weekly financial horoscope 15 to 21 may 2023 money career Weekly Money Horoscope in marathi)

1/13

आर्थिक राशीभविष्य

मे महिन्याचा तिसरा आठवडा हा मेष, मिथुन, कन्या, कुंभ यासह अनेक राशींना करिअर आणि व्यवसायात विशेष लाभ देणारा ठरणारा आहे. 

2/13

मेष (Aries)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ असणार आहे. आर्थिक प्रगती आणि यश देणारा ठरणार आहे. नवीन प्रकल्प तुमच्यासाठी सुवर्ण संधी घेऊन येणार आहे. प्रवासातून शुभ योग जुळून येणार आहे. 

3/13

वृषभ (Taurus)

या आठवडा या राशीच्या लोकांसाठी अधिक खर्चिक ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी आपलं मत मांडा त्यातून तुम्हाला नक्की फायदा दिसून येईल. नवीन गुंतवणूक करणार असाल तर जरा थांबा.विचारपूर्वी खर्च करा. 

4/13

मिथुन (Gemini)

या राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या हा आठवडा शुभ ठरणार आहे. अचानक धनलाभाचे योग आहेत. कामाबाबतीत चांगली बातमी मिळणार आहे. गुंतवणुकीसाठी हा चांगला आठवडा आहे.

5/13

कर्क (Cancer)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिकदृष्ट्या संमिश्र असणार आहे. हळूहळू तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. प्रवासातून शुभ योग तयार होतं आहे. खर्च होईल पण धनलाभ होण्याची शक्यता आहे. 

6/13

सिंह (Leo)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक स्थितीवर पकड मजबूत करणारा ठरणार आहे. प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी धडपड करावी लागणार आहे. आर्थिक स्थिती सुधारण्यापासून अचानक धनलाभ करणारा ठरणार आहे. 

7/13

कन्या (Virgo)

हा आठवडा या राशीच्या लोकांसाठी आर्थिकस्थिती चांगला करणारा ठरणार आहे. नातेवाईकांकडून आर्थिक लाभाची शक्यता आहे. गुंतवणुकीसाठी हा आठवडा योग आहे. 

8/13

तूळ (Libra)

हा आठवडा या राशीच्या लोकांसाठी खर्चिक असणार आहे. दुसरीकडे कामातील प्रगती तुम्हाला उर्जा देईल. आयुष्यात सकारात्मक दृष्टीकोन वाढणार आहे. 

9/13

वृश्चिक (Scorpio)

या आठवड्यात या लोकांना आर्थिकदृष्ट्या आनंदाची बातमी मिळणार आहे. हा आठवडा या लोकांसाठी प्रगतीचा ठरणार आहे. एककीडे खर्च होणार आहे पण दुसरीकडे आर्थिक लाभ देखील होणार आहे. 

10/13

धनु (Sagittarius)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिकगदृष्ट्या अतिशय चांगला ठरणार आहे. प्रवासातून धनलाभाचे योग आहेत. आर्थिक बाबतीत वरिष्ठांशी चर्चा करुन निर्णय घ्या.

11/13

मकर (Capricorn)

या राशीच्या लोकांचा कामात प्रगती होणार आहे. मान सन्मान वाढणार आहे. प्रत्येक कामात यश मिळणार आहे. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. 

12/13

कुंभ (Aquarius)

हा आठवड्या तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. आर्थिकदृष्ट्या स्थिती चांगली होणार आहे. दान करुन धनाची वृद्धी होईल. प्रवासातून शुभ योग तयार होतं आहेत. 

13/13

मीन (Pisces)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप चांगला असणार आहे. तुमची आर्थिकस्थिती मजबूत होणार आहे. कामात प्रगती दिसून येणार आहे. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)