Weekly Horoscope : श्रावणाचा तिसरा आठवडा 12 राशींसाठी कसा? बुध व शुक्र गोचरमुळे 'या' राशींवर बरसणार भोलेनाथाची कृपा

Weekly Horoscope 19 to 25 August 2024 in Marathi : श्रावणाचा तिसरा आठवड्याची सुरुवात रक्षाबंधनाच्या सणाने झालीय. त्यात या आठवड्यात बुध आणि शुक्र ग्रह कन्या राशीत असणार आहे. अशात या आठवड्यात कोणासमोर संकट तर कोणावर बरसणार भोलेनाथाची कृपा जाणून घ्या ज्योतिषशास्त्र पंडीत आणि आनंदी वास्तूचे आंनद पिंपळकरकडून मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कसा असणार आहे. (weekly horoscope 19 to 25 august 2024 check weekly horoscope astrology predictions zodiac signs saptahik rashi bhavishya in marathi)

Aug 19, 2024, 15:09 PM IST
1/12

मेष (Aries Zodiac)

या आठवड्यात मेष राशीच्या लोकांच्या कामाच्या ठिकाणी सुधारणा होणार आहे. तुमचे प्रकल्पही यशस्वी होणार आहेत. या आठवड्यात तुम्हाला कुटुंबाकडून सहकार्य लाभणार आहे. सुख आणि समृद्धीचे योग जुळून आले असून प्रवासातूनही यश मिळणार आहे. आर्थिक बाबतीत चांगले परिणाम या आठवड्यात मिळणार आहे. मात्र काही तणावही तुम्हाला जाणवणार आहे. या आठवड्यात आर्थिक खर्च जास्त असणार आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. घराबाहेर जास्त राहिल्यास मन अस्वस्थ वाटेल. आरोग्यावर विपरीत परिणाम होईल. सप्ताहाच्या शेवटी जीवनात सुख-समृद्धी येणार आहे. शुभ दिवस: 21, 22  

2/12

वृषभ (Taurus Zodiac)

या राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत लाभ मिळणार आहे. या आठवड्यात तुम्ही खरेदीमध्ये व्यस्त असणार आहात. प्रवासात यश मिळणार असून शुभ संयोग घडणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत पार्टीच्या मूडमध्येही असणार आहात. नोकरीच्या ठिकाणी काही बातम्या मिळाल्याने तुम्हाला आनंद असणार आहात. कुटुंबात सामान्य परिस्थिती असेल तर थोडे प्रयत्न केले तर जीवन आनंदी होईल. आठवड्याच्या शेवटी अहंकाराचे भांडण टाळल्यास चांगले परिणाम तुम्हाला मिळतील.  शुभ दिवस: 22, 23  

3/12

मिथुन (Gemini Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत शुभ असून त्यांना वडिलांची मदत लाभणार आहे. संपत्तीत वाढ होण्याच्या शुभ संधी या आठवड्यात चालून आली आहे. कुटुंबाकडून पाठिंबा मिळणार आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासह चांगल्या ठिकाणी जाण्याचा बेत आखणार आहात. तुम्हाला कामाच्या ठिकाणी समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. तर भागीदारीत केलेल्या कामामुळे त्रास होण्याची शक्यता आहे. नोकरीत काही गोष्टींबाबत मन अस्वस्थ राहणार आहे. या आठवड्यात सहली पुढे ढकलणे तुमच्यासाठी शहाणपणाचे ठरेल. आठवड्याच्या शेवटी व्यावहारिक निर्णय घेतल्यास चांगले परिणाम मिळणार आहे.  शुभ दिवस: 23,24,25  

4/12

कर्क (Cancer Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी हा सप्ताह लाभदायक असणार आहे. तुमचे प्रकल्प वेळेवर पूर्ण होणार असून कामाच्या ठिकाणी काही महत्त्वाचे काम मार्गी लागणार आहेत. आर्थिक बाबतीत यश मिळणार आहे. गुंतवणुकीतून नफाही लाभणार आहे. आठवडा तुमच्यासाठी आर्थिक बाबींमध्ये यशाने भरलेला असणार आहे. या आठवड्यात प्रवासातून शुभ परिणाम मिळतील. तुम्हालाही तुमच्या प्रियजनांसोबत कुठेतरी प्रवास करण्याचा योग येणार आहे. या आठवड्यापासून कुटुंबात बरेच बदल दिसून येतील आणि परस्पर प्रेम राहणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला अचानक काही प्रतिकूल बातम्यांना सामोरे जावे लागणार आहे. शुभ दिवस: 19,20

5/12

सिंह (Leo Zodiac)

या राशीच्या लोकांना या आठवड्यात नशीब साथ मिळणार आहे. तुम्ही कठोर परिश्रम केल्यास तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. आर्थिक बाबतीत तुम्ही यशस्वी होणार आहात. गुंतवणुकीतून नफा मिळणार आहे. कोणत्याही गुंतवणुकीबाबत तुम्हाला काळजी वाटणे स्वाभाविक आहे. मानसिक तणाव वाढू शकतो. या आठवड्यात तुम्हाला तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागणार आहे. प्रवासात असा कोणताही निष्काळजीपणा करू नका ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल. तुमचे काम खराब होण्याची शक्यता आहे. शेवटी तुम्ही थोडे व्यवहारी राहिल्यास बरे होईल, अन्यथा तुम्ही दाखवलेली अती घाई तुमच्यासाठी नुकसानदायी ठरणार आहे. शुभ दिवस: 24,25  

6/12

कन्या (Virgo Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. ते त्यांच्या प्रकल्पाच्या यशाने आनंदित असणार आहे. प्रकल्प यशस्वी करण्यासाठी तुम्हाला एखाद्या महिलेची मदत मिळणार आहे. आर्थिक बाबतीत मातृसत्ताक स्त्रीच्या सहकार्याने जीवनात सुख-समृद्धी नांदणार आहे. या आठवड्यात तुम्ही अशा ठिकाणी जाण्याचा निर्णय घेणार आहात. सहली यशस्वी होणार असून गोड आठवणींनी भरल्या असणार आहेत. कोणताही महत्त्वाचा निर्णय पुढे ढकलल्यास चांगले परिणाम मिळतील. आठवड्याच्या शेवटी, परिस्थिती बदलेल, तुम्हाला आनंद आणि समृद्धीच्या अनेक संधी मिळतील आणि तुमचे मन प्रसन्न राहील. शुभ दिवस: 21,22  

7/12

तूळ (Libra Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी आठवडा लाभदायक असणार आहे. काही नवीन प्रकल्पाकडेही तुमचा कल वाढणार आहे. तुम्हाला कुटुंबात आनंद आणि सुसंवाद असणार आहे. तुमच्या बोलण्याकडेही जास्त लक्ष दिले जाणार आहे. आर्थिक बाबींसाठी हा आठवडा कठीण असून आर्थिक लाभासाठी मजबूत परिस्थिती निर्माण होणार आहे. या आठवड्यात तुम्हाला प्रवासातून मध्यम यश मिळणार आहे. ते पुढे ढकलण्यात काही नुकसान होणार नाही. आठवड्याच्या शेवटी, आपण आपल्या प्रियजनांच्या सहवासात आनंददायी वेळ व्यतित करणार आहात. शुभ दिवस: 24, 25

8/12

वृश्चिक (Scorpio Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत शुभ असून आर्थिक लाभासाठी मजबूत असणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. तर तुम्ही यशाच्या मार्गावर पुढे जाणार आहात. आनंद आणि सुसंवादाचे योगायोग घडणार आहे. परस्पर प्रेम अधिक दृढ होणार आहे. कुटुंबात आनंद आणि सौहार्द असणार आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या सहवासात आनंददायी वेळ घालवणार आहात. प्रवासातही तुम्हाला यश मिळणार आहे. भावनिकदृष्ट्या आनंदी असणार आहात. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला आराम मिळणार आहे. शुभ दिवस: 21,22,23  

9/12

धनु (Sagittarius Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी हा दिवस लाभदायक असणार आहे. तुमची प्रतिष्ठा वाढल्याने तुम्हाला फायदा होणार आहे. तुम्ही तुमच्या प्रकल्पावर नियंत्रण ठेवण्यास सक्षम असणार आहात. आर्थिक बाबतीत हा आठवडा अनुकूल असून आर्थिक लाभाच्या शुभ संधी या आठवड्यात तयार होणार आहेत. वडिलांच्या मदतीने पैसा लाभणार आहे. स्त्रीच्या मदतीने तुम्हाला जीवनात आनंद आणि शांती मिळणार आहे. प्रवासातही तुम्हाला यश मिळेल आणि प्रवासात आनंदी असणार आहात. कुटुंबात अहंकाराचा कलह टाळणे तुमच्या हिताच ठरेल. जर तुम्ही आठवड्याच्या शेवटी आराम करण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला चांगले परिणाम नक्की मिळतील. शुभ दिवस: 24,25  

10/12

मकर (Capricorn Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी आठवडा आदराने भरलेला असणार आहे. कामाच्या ठिकाणी काही बातम्या मिळाल्यानंतर तुम्हाला वाईट वाटणार आहे. ऑफिसमध्ये एखाद्याशी मतभेद होणार आहे. तणावपूर्ण परिस्थिती देखील वाढ होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुम्ही एखाद्या सुंदर ठिकाणी जाण्याचा निर्णय घेऊ शकता. कुटुंबात सुख-समृद्धीची शुभ शक्यता निर्माण होणार आहे. आठवड्याच्या शेवटी कोणीतरी मदत करेल ज्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. तुम्हाला अशा लोकांकडून पाठिंबा मिळेल ज्यांनी कठोर परिश्रम करून आपल्या जीवनात स्थान मिळणार आहे. शुभ दिवस: 21,23  

11/12

कुंभ (Aquarius Zodiac)

या राशीचे लोक त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती करणार आहात. कोणताही नवीन प्रकल्प तुमच्यासाठी शुभ परिणाम देणार आहे. नोकरीच्या ठिकाणीही मान-सन्मान वाढणार आहे. आर्थिक बाबींमध्ये बरेच बदल या आठवड्यात होणार आहे. जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला या आठवड्यात फायदा मिळणार आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य लाभणार आहे. जीवनात आनंदी वाटणार आहे. आता प्रवासातून शुभ परिणाम मिळणार आहे. तुम्ही नवीन ठिकाणी प्रवास करण्याचा विचारही करणार आहात. या आठवड्यात पोटाशी संबंधित समस्या वाढण्याची शक्यता आहे. शुभ दिवस: 24  

12/12

मीन (Pisces Zodiac)

या राशीच्या लोकांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडून सर्व प्रकारचे सहकार्य लाभणार आहे. ते कुटुंबाच्या सहवासात आनंददायी वेळ घालवणार आहात. प्रेम जीवनात आनंद दार ठोठावणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत खरेदीच्या मूडमध्ये असणार आहात. कामाच्या ठिकाणी सुधारणा होणार आहे. आर्थिक बाबतीत, खर्चासाठी परिस्थिती निर्माण होणार आहे. ज्याची आर्थिक स्थिती चांगली आहे त्याच्यामुळे खर्च जास्त होऊ शकतो. भागीदारी व्यवसायात शुभ परिणाम मिळणार आहे. आठवड्याच्या शेवटी लक्ष केंद्रित करणे आवश्यक असणार आहे. शुभ दिवस: 22,24 (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)