Weekly Numerology : 'या' मूलांक लोकांसाठी शुभ असणार हा आठवडा, तुमच्या नशिबात काय?

Saptahik Ank jyotish 13 to 19 may 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 13 ते 19 मेपर्यंतचा हा आठवडा कसा जाणून घेऊयात. 

May 12, 2024, 22:31 PM IST
1/10

Weekly Numerology 13 to 19 may 2024 in Marathi : अंकशास्त्राच्या गणनेनुसार, 13 मे ते 19 मे चा हा मे महिन्याचा तिसऱ्या आठवडा गजकेसरी योगासह अनेक शुभ योगाचा आहे. तर 14 मे रोजी गंगा सप्तमी व्रत आणि वृषभ संक्रांती आहे. 16 मे हा सीता नवमीचा पवित्र सण आहे. या शुभ संयोगांमध्ये 13 ते 19 मे हा मूलांक क्रमांक 1 ते 9 असलेल्या लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या अंकशास्त्र डॉ. कविता ओझा यांच्याकडून

2/10

मूलांक 1

आर्थिक बाबींमध्ये सुधारणा होणार आहे. या आठवड्यात तुम्हाला आर्थिक लाभाच्या संधीही लाभणार आहेत. कामाच्या ठिकाणी वाद संवादाने सोडवल्यास चांगले परिणाम मिळतील. प्रेमसंबंधांमध्ये कोणत्याही नवीन सुरुवातीबद्दल मन अस्वस्थ करणार ठरणार आहे. आठवड्याच्या शेवटी स्थिती सुधारणार आहे. तुम्हाला काही चांगली बातमी मिळणार आहे.

3/10

मूलांक 2

कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. तुम्ही तुमच्या प्रकल्पाशी संबंधित निर्णय घेण्यात यशस्वी होणार आहात. आर्थिक बाबतीत यश मिळणार आहे. या आठवड्यात तुम्ही कितीही मेहनत कराल त्यापेक्षा अधिक फळ तुम्हाला मिळणार आहे. त्याचे शुभ परिणाम तुम्हाला भविष्यातदेखील मिळणार आहे. प्रेमसंबंधांमध्ये, परस्पर प्रेम दृढ करणारा हा आठवडा ठरणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुमच्या मेहनतीचे फळ मिळणार आहे. 

4/10

मूलांक 3

कार्यक्षेत्रात भागीदारीत केलेले काम तुमच्यासाठी शुभ योगायोग घेऊन आला आहे. तुम्हाला प्रकल्पात यश मिळणार आहे. प्रेमसंबंधांमध्ये सुखद योगायोग घडणार आहे. परस्पर प्रेम अधिक घट्ट होणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आनंददायी समारंभात सहभागी होणार आहात. आर्थिक बाबींमध्ये या आठवड्यात खर्च वाढणार आहे. सप्ताहाच्या शेवटी तुम्ही तुमच्या प्रियजनांच्या सहवासात आनंददायी वेळ व्यतित करणार आहात. 

5/10

कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. तुम्ही तुमच्या प्रकल्पात काही बदल करणार आहात. तुम्ही एखाद्या नवीन प्रकल्पाकडे आकर्षित होणार आहे. व्यावसायिक सहली यशस्वी होणार आहे. प्रेमसंबंधांमध्ये परस्पर प्रेम अधिक घट्ट होणार आहे. प्रेम जीवनात आनंद दार ठोठावणार आहे. आर्थिक बाबतीत अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तुमच्या गुंतवणुकीबाबत अस्वस्थता असणार आहे. 

6/10

मूलांक 5

नोकरीच्या ठिकाणी प्रगती होणार असून मान सन्मान वाढणार आहे. या आठवड्यात तुम्हाला एक चांगला प्रकल्प मिळणार आहे. यशाच्या मार्गावर तुम्ही पुढे जाणार आहात. प्रेम संबंध मजबूत होणार आहे. या आठवड्यात तुम्हाला आर्थिक बाबतीत मध्यम यश मिळणार आहे. आठवड्याच्या शेवटी व्यावहारिक निर्णय घेतल्यास चांगले परिणाम दिसून येणार आहे. 

7/10

मूलांक 6

या आठवड्यात तुम्हाला तुमच्या प्रकल्पात यश मिळणार आहे. नोकरीच्या ठिकाणी प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहे. तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टशी संबंधित काही चांगली बातमी कानावर पडणार आहे. आर्थिक दृष्टिकोनातून परिस्थिती अनुकूल असणार आहे. आर्थिक लाभही होणार आहे. प्रेमसंबंधांमध्ये परस्पर मतभेद वाढण्याची शक्यता आहे. मन अस्वस्थ राहील. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला काही चांगली बातमी कानावर पडणार आहे. 

8/10

मूलांक 7

आर्थिक बाबतीत वेळ अनुकूल असणार आहे. आर्थिक लाभाची परिस्थिती तयार होणार आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमची संपत्ती वाढवण्याच्या अनेक संधी मिळणार आहे. प्रेम संबंधांमध्ये परस्पर प्रेम मजबूत करणारा हा आठवडा ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी महिलांमुळे अडचणी वाढणार आहे. तुमचे मनही अशांत असणार आहे. आठवड्याच्या शेवटी, वेळ अनुकूल असेल आणि तुमचं मन प्रसन्न असेल. 

9/10

मूलांक 8

आर्थिक बाबींसाठी हा आठवडा शुभ असणार आहे. या आठवड्यात आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी मिळणार आहे. प्रेमसंबंधांमध्ये परस्पर प्रेम मजबूत होणार आहे. तुमचा प्रकल्प यशस्वी होण्यासाठी तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. आठवड्याच्या शेवटी, वेळ अनुकूल होणार असून आनंद आणि समृद्धी तुमच्या दारात येणार आहे. 

10/10

मूलांक 9

नोकरीच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. तुमचा मान-सन्मानही वाढणार आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टशी संबंधित काही चांगली बातमी मिळणार आहे. आर्थिक सुधारण्यासाठी तुम्हाला थोडीशी जोखीम पत्करून गुंतवणूक केल्यास फायदा होईल. आठवड्याच्या शेवटी, वेळ अनुकूल असणार आहे. तुम्हाला शांत, एकटे वेळ घालवायला या आठवड्यात आवडणार आहे. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती अंक शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)  

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x