शेतकऱ्यांना त्रासदायक ठरणाऱ्या नाफेडच्या जाचक अटी आहेत तरी काय?

Maharastra Onion Price : नाफेडच्य़ा माध्य़मातून शेतकऱ्यांना दिलासा मिळताना दिसतोय  शेतकऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत पाहूया...

Aug 25, 2023, 00:17 AM IST

NAFED Conditions: कांद्याच्या सरकारच्या धोरणावरुन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केलीय. दोन दिवसांत २ लाख टन कांदा खरेदी होईल, ५० लाख टन कांद्याचं करायचं काय, असा सवाल त्यांनी सरकारला विचारलाय. 

1/6

शेतक-यांच्या काळजीपेक्षा सरकारमध्ये श्रेयवादच जास्त असल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केलाय.

2/6

तर काही ठिकाणी कांदा खरेदी केंद्र सुरू झालेली नाहीत, यावर तोडगा निघेल, असा विश्वास उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंनी व्यक्त केला आहे. 

3/6

कांदा लिलाव सुरू झालेत. याठिकाणी कांद्याला सरासरी 2200 रुपये भाव मिळत असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे कांदा उत्पादक शेतक-यांमध्ये नाराजी दिसून येतेय.

4/6

सरकारनं 3 हजार ते 3, 500 हजार रुपये कांद्याला बाजारभाव द्यावा अशी मागणी करण्यात येतेय.

5/6

दुसरीकडे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही कांदा लिलाव शेतक-यांनी बंद पाडले. 

6/6

नाफेडनं लिलावात उतरण्याची मागणी शेतकरी करतायत. नाफेडचे अधिकारी कुठे आहेत असा संतप्त सवाल यावेळी शेतक-यांनी केला.