तुमच्या बोटाला लागलेली शाई साधीसुधी नाहीय! लोकशाही बळकट करणाऱ्या शाईच्या रंजक गोष्टी

Indelible Ink History: तुमच्या बोटाला लागलेली निळी शाई लोकशाही बळकट करणारी आहे. ही शाई साधीसुधी नाहीय. तुम्हाला या शाईची रंजक तथ्य माहिती आहेत का? 

| May 20, 2024, 16:14 PM IST
1/8

तुमच्या बोटाला लागलेली शाई साधीसुधी नाहीय! जाणून घ्या रंजक गोष्टी

Loksabha Election 2024 Voters ink Unknown Facts Marathi News

महाराष्ट्रातील पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. धुळे, दिंडोरी, नाशिक पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतील 6 मतदार संघात निवडणूक होतेय. मतदान केल्यावर आपल्या डाव्या हाताच्या बोडला शाई लावली जाते. ही निळी शाई लोकशाही बळकट करणारी आहे. ही शाई साधीसुधी नाहीय. तुम्हाला या शाईची रंजक तथ्य माहिती आहेत का? 

2/8

कशी असते प्रक्रिया?

Loksabha Election 2024 Voters ink Unknown Facts Marathi News

मतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटविल्यानंतर त्याला प्रवेश दिला जातो. प्रत्यक्ष मतदानापूर्वीच मतदाराच्या डाव्या तर्जनीवर न पुसली जाणारी शाई लावली जाते. त्यानंतर मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा घेतला जातो. मतदानापूर्वी मतदान केंद्राध्यक्ष (पोलींग ऑफीसर) मतदाराच्या डाव्या तर्जनीवर शाई लावलेली आहे की नाही याची तपासणी करतात. 

3/8

डाव्या तर्जनीची तपासणी

Loksabha Election 2024 Voters ink Unknown Facts Marathi News

जी व्यक्ती डाव्या तर्जनीची तपासणी करु देत नाही ते मतदानासाठी अपात्र असल्याचे मतदान अधिकारी सांगू शकतात. जर एखाद्या मतदाराला डाव्या हाताची तर्जनी नसेल तर त्या व्यक्तीच्या डाव्या हातावरील कोणत्याही बोटाला शाई लावली जाते.

4/8

लोकशाही मजबूत करणारी काळी रेष

Loksabha Election 2024 Voters ink Unknown Facts Marathi News

मतदानाचा हक्क बजावल्याची खूण म्हणून सर्वसामान्य असो की लोकप्रतिनिधी अथवा सेलिब्रिटींकडून शाई लावलेल्या डाव्या हाताची तर्जनी अभिमानाने दाखविली जाते. लोकशाही मजबूत करणारी ही काळी रेष निवडणुकांचा अविभाज्य घटक बनली आहे.

5/8

डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई

Loksabha Election 2024 Voters ink Unknown Facts Marathi News

लोकसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी महाराष्ट्रात सुमारे 2 लाख 15 हजार 850 शाईच्या बाटल्या लागणार आहेत. या शाईचे वाटप जिल्हानिहाय करण्यात आले आहे. राज्यातील 48 लोकसभा मतदार संघांमध्ये 98 हजार 114 मतदान केंद्र आहेत. 

6/8

मतदार केंद्रासाठी प्रत्येकी 2 शाईच्या बाटल्या

Loksabha Election 2024 Voters ink Unknown Facts Marathi News

प्रत्येक मतदार केंद्रासाठी प्रत्येकी 2 शाईच्या बाटल्या याप्रमाणे 1 लाख 96 हजार 228 शाईच्या बाटल्यांची संख्या होते. याशिवाय 1 लाख 96 हजार 228 शाईच्या बाटल्यांबरोबरच 10 टक्के अधिक अशा एकूण 2 लाख 15 हजार 850 शाईच्या बाटल्यांचा उपयोग होतोय. 

7/8

बाटल्यांची मागणी

Loksabha Election 2024 Voters ink Unknown Facts Marathi News

या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांकरिता राज्यातील 48 मतदारसंघांमध्ये 9 कोटी 24 लाख 91 हजार 806मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत. या मतदारांच्या डाव्या तर्जनीवर शाई लावण्याकरिता निवडणूक आयोगामार्फत सुमारे 2 लाख 15 हजार 850 शाईच्या बाटल्यांची मागणी नोंदविण्यात आली.. 

8/8

म्हैसूर पेंटस् कंपनीत उत्पादन

Loksabha Election 2024 Voters ink Unknown Facts Marathi News

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून या सर्व बाटल्या राज्याला दिल्या जातात. त्यानंतर सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात येतात. मतदारांच्या तर्जनीवर लावण्यात येणारी आणि काही दिवस न पुसली जाणारी ही शाई म्हैसूर पेंटस् कंपनीमार्फत बनवली जाते.