Digital Dementia काय आहे? बघुयात याची कारणे आणि सुरुवातीचे लक्षणे

आजकाल लोकं जास्तवेळ मोबाईल आणि लॅपटॉपच्या स्क्रिनवर घालवतात. ज्यामुळे लोकं बऱ्याच गंभीर आजारांना बळी पडत असतात. यामध्ये एक आजार म्हणजे 'डिजीटल डिमेंशिया'.  जाणून घेऊया आजाराची कारणे आणि त्याची लक्षणे. 

| Oct 22, 2024, 16:02 PM IST

आजकाल लोकं जास्तवेळ मोबाईल आणि लॅपटॉपच्या स्क्रिनवर घालवतात. ज्यामुळे लोकं बऱ्याच गंभीर आजारांना बळी पडत असतात. यामध्ये एक आजार म्हणजे 'डिजीटल डिमेंशिया'.  जाणून घेऊया आजाराची कारणे आणि त्याची लक्षणे. 

1/7

या आजाराचा वाढतोय धोका

खूप वेळ मोबाईल आणि लॅपटॉपच्या स्क्रिनवर काढल्यामुळे 'डिजिटल डिमेंशिया' सारखा आजाराचा धोका वाढत चालला आहे. एक्सपर्ट्सनुसार डिजिटल डिमेंशिया एक मानसिक समस्या आहे. या मेंदूच्या विकारामुळे लोकांना गंभीर समस्यांचा सामना करायला लागत आहे.

2/7

काय आहे डिजिटल डिमेंशिया?

हा एक असा आजार आहे जो मेंदूवर खूप वाईट प्रकारे परिणाम करतो. ज्याला एक प्रकारचा 'ब्रेन डिसऑर्डर' म्हणता येईल. या स्थितीत रुग्णाला मेमरी लॉस, निर्णय क्षमता कमी होणे, पर्सनेलिटीमध्ये बदल आणि दैनिक कामे करण्यात अडचण होणे अश्या अनेक समस्या हेत राहतात. यालाच 'डिमेंशिया' म्हणतात.

3/7

डिजिटल डिमेंशियाचे कारण

एक्सपर्टसनुसार खूप वेळ स्क्रिनच्या समोर बसल्याने मेंदू कमी ऍक्टीव होत जातो आणि जेव्हा आपण  मोबाईल किंवा लॅपटॉप सारख्या गोष्टींचा वापर अधिक प्रमाणात करतो. तर त्यामुळे मेंदूमध्ये एक प्रकारचा सेंसर मिसमॅच व्हायल लागतो आणि हाच 'डिजिटल डिमेंशिया'चे कारण बनतो.

4/7

काय असतात डिजिटल डिमेंशियाची लक्षणे?

शॉर्टटर्म मेमरी, गोष्टींना सहजपणे विसरणे किंवा हरवून टाकणे, कोणत्या शब्दाला किंवा विषयाला आठवण्यात अडथळे येणे, मल्टी टस्किंगमध्ये समस्या प्रत्येक छोट्या मोठ्या कामांसाठी  गुगलचा वापर , फोननंबर सारख्या साध्या गोष्टी लक्षात ठेवण्यास असक्षम अशी काही लक्षणे आढळून येतात. तसेच लहान मुलांच्या वाढीत अडथळे आणि मुलांना भाषा शिकण्याची गती कमी पडत जाणे, जर ही लक्षणे दिसत असतील तर र्दुलक्ष करु नये. 

5/7

डिजिटल डिमेंशियापासून बचाव कसा करावा?

डिजिटल डिमेंशियापासून वाचण्यासाठी झोपण्यापूर्वी व सकाळी उठल्यानंतर  काही वेळ मोबाईलपासून दूर राहावे. सुडोकु, चेस, सारखे खेळ खेळणे , गरजेपेक्षा जास्त स्किनवर वेळ न घालवणे, मोबाईलपेक्षा गरजेचे फोन नंबर आणि किराणा मालाची यादी कागदावर लिहा. याशिवाय बिंज वॉचिंगपासून वाचा आणि चांगली झोप घ्या.  

6/7

हे केवळ फोकस गमावण्याबद्दल नाही,तर अभ्यासात असे आढळून आले की स्क्रीनकडे टक लावून दिवसातून 4 तासांपेक्षा जास्त वेळ घालवणे विविध प्रकारच्या स्मृतिभ्रंशाच्या उच्च जोखमीशी जोडलेले आहे. संशोधकांनी हेवी स्क्रीन वापरकर्त्यांच्या मेंदूच्या काही भागात शारीरिक बदल देखील पाहिले. मोबाईल किंवा लॅपटॉपच्या अतिवापरामुळे संज्ञानात्मक वर्तनात नेमके किती बदल होतात हे निश्चित करण्यासाठी सध्या अधिक संशोधन चालू आहे.  

7/7

रात्रीच्यावेळी स्क्रिन वापरणे, विशेषतः निळाप्रकाश असलेली उपकरणे, झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम करतात. निळाप्रकाश मेंदूला जागृत ठेवतो आणि मेलाटोनिन(झोप-प्रेरक संप्रेरक) पातळी कमी करतो. ज्यामुळे झोपेच्या समस्या उद्भवतात. (वरिल माहिती ही फक्त ज्ञान प्रदान करण्यासाठी आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही, यामधुन कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही).