लहान मुलांमध्ये होणाऱ्या Galsua व्याधीकडे अजिबातच दुर्लक्ष करू नका, पाहा त्यावरील घरगुती उपाय

Galsua Home Remedies: या संसर्गात प्रभावित व्यक्तीच्या कानाच्या खालील भाग सुजलेला दिसतो. ही सूज साधारण 7 ते 9 दिवस कायम राहते.   

May 24, 2023, 07:51 AM IST

Galsua Home Remedies: गलसुआ किंवा सोप्या भाषेत गालगुंड ही एक अशी व्याधी आहे, जी सहसा लहान मुलांमध्ये पाहिली जाते. हा एक प्रकारचा संसर्ग असून, यामुळं पॅरोटिड ग्रंथी प्रभावित होतात. मम्प्स व्हायरस संसर्गानंतर 14 ते 25 दिवसांच्या कालावधीत त्याची लक्षणं दिसण्यास सुरुवात होते. 

1/7

आणखी काही लक्षणं

what is Galsua know its Home Remedies

गालगुंडांची आणखी काही लक्षणं म्हणजे गिळण्यास त्रास होणं, घसा खवखवणं, खसा दुखणं इत्यादी. किंबहुना आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला एकदा गालगुंड झाल्यास त्यांना पुन्हा या संसर्गाचा धोका नसतो. 

2/7

पारामाइक्सोवायरस

what is Galsua know its Home Remedies

पारामाइक्सोवायरसमुळं गालगुंड होतात. यावर बऱ्याचदा घरगुती उपायांनी मात करता येते. असं असलं तरीही डॉक्टरांचा सल्लाही तितकाच महत्त्वाचा. पण, चला त्याआधी जाणून घेऊया यावरील घरगुती उपाय.   

3/7

पुरेसा आराम

what is Galsua know its Home Remedies

गालगुंड झाल्यास तुम्ही पुरेसा आराम करणं अपेक्षित असतं. यामुळं शरीराला संसर्गाशी लढण्याची ताकद मिळते.   

4/7

गरम किंवा साधं पाणी

what is Galsua know its Home Remedies

गरम किंवा साधं पाणी पिऊनही या संसर्गात आराम मिळवता येतो. यामुळं घसाही फार काळ कोरडा राहत नाही.   

5/7

लिंबाचा रस

what is Galsua know its Home Remedies

लिंबामध्ये असणारं विटामिन सी संसर्गाशी लढण्यासाठी मदत करतं. त्यामुळं कोमट पाण्यात लिंबू पिळून ते पाणी पिणं अरोग्यासाठी लाभदायक ठरतं. 

6/7

चिमुटभर हळद आणि साधं मीठ

what is Galsua know its Home Remedies

गरम किंवा कोमट पाण्याच चिमुटभर हळद आणि साधं मीठ मिसळून या पाण्यानं गुळण्या केल्यामुळंगी गालगुंड असणाऱ्यांना आराम मिळतो. हे तुम्ही दिवसातून दोन किंवा त्याहून अधिक वेळा करू शकता. 

7/7

आलं आणि मधाचं सेवन

what is Galsua know its Home Remedies

आलं आणि मधाचं सेवन केल्यामुळंही हा संसर्ग दूर करण्यास मदत होते. तुम्ही दर दिवशीसुद्धा आल्याचा रस आणि मध गरम पाण्यात मिसळून हे पाणी पिऊ शकता.  (वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांच्या आधारे घेण्यात आली असून, तज्ज्ञांचा सल्लाही तितकाच महत्त्वाचा हे लक्षात घ्या. )  

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x