रोटी आणि चपातीमध्ये काय फरक, हे शब्द कोणत्या भाषेतून आले? 90 टक्के लोकांना उत्तर माहित नाही

चपाती, रोटी, फुलके याशिवाय आपलं जेवण पूर्ण होत नाही. पण चपाती आणि रोटी यामध्ये नेमका फरक काय हे तुम्हाला माहिती आहे का? एवढंच नाही तर 90 टक्के लोकांना हा शब्द आला तरी कुठून आणि त्यात नेमका फरक काय हे माहिती नाही. 

Feb 14, 2024, 12:36 PM IST
1/7

दैनदिन जीवनात असे अनेक शब्द आहे जे आपण रोज वापरतो. लहानपणापासून जे ऐकतो ते बोलतो. पण त्या शब्दांचा नेमका अर्थ काय हेदेखील आपल्याला माहिती नसतं. असाच एक शब्द आहे तो म्हणजे चपाती आणि रोटी. 

2/7

रोज घरात आपण चपाती वाढ असं म्हणतो किंवा आज रोटी केली आहे असं ऐकतो. जेवणाच्या ताटावर बसल्यावर आपण भरपेट जेवतो. पण चपाती आणि रोटी यातील फरक तुम्हाला माहिती आहे का?

3/7

आज आपण या दोघांमधील फरकच नाही तर हे शब्द आले कुठून याबद्दल जाणून घेणार आहोत. तर रोटी हा शब्द संस्कृच रोटिका यावरुन आला आहे. रोटी म्हणजे धान्य दळल्यानंतर तव्यावर गोल आणि सपाट अशी भाजलेला पदार्थ. काही लोक रोटिका हा पर्शियन शब्दही म्हणतात. 

4/7

मग चपाती म्हणजे काय? तर चपाती हा शब्दही संस्कृत मधून आला असून चर्पट या शब्दातून उदयास आला आहे. चर्पट म्हणजे थप्पड. चर्पट पासून चर्पटी आणि मग जन्माला आला चपाती. 

5/7

चपाती म्हणजे ज्यामध्ये पीठ थोडेसं मऊ असतं. जे पीठ हाताने थोपटून बनवलं जातं. म्हणजे त्याला हाताने थप्पड मारून बनवलं जातं त्याला चपाती असं म्हणतात. 

6/7

रोटी ही घट्ट पीठापासून लाटून बनवली जाते. तर चपाती ही पातळ पीठाची असून ती हाताने थापली जाते. 

7/7

यात अजून एका नावाची भर आहे ते म्हणजे अनेक घरात बनवले जातात ते फुलके. हादेखील रोटीचा एक प्रकार आहे. ज्यामध्ये ती पातळ आणि लहान गोलाकार असते आणि ती गॅसवर ठेवल्यास फुगते. म्हणून तिला फुलके असं म्हणतात.