एखाद्या ठिकाणी अचानक गर्दी वाढून चेंगराचेंगरी झाली तर काय करावं? जीव वाचवण्यासाठी करा 'या' गोष्टी

Mahakumbh 2025 : उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथे महाकुंभ मेळा सुरू असून दररोज कोट्यवधी भाविक येथे भेट देत आहेत. साधूसंतांची वर्णी असणाऱ्या या ठिकाणी बुधवारी पहाटेच्या सुमारास मात्र अतिशय भयावह घटना घडली. मौनी अमावस्येचे निमित्त साधून पवित्र गंगा स्नानासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आणि याच रूपांतर चेंगराचेंगरीत झालं. यात 10 भाविकांचा मृत्यू झाला असून 25 ते 20 भाविक जखमी झाले असल्याची माहिती मिळतेय. अशावेळी एखाद्या ठिकाणी अचानक गर्दी वाढून चेंगराचेंगरी झाली तर काय करायला हवं याबाबतची माहिती जाणून घेऊयात. 

Pooja Pawar | Jan 29, 2025, 16:09 PM IST
1/7

स्वतःजवळ थोडी जागा बनवा :

जर शक्य असल्यास स्वतःच्या आजूबाजूला थोडी जागा बनवा. चेंगराचेंगरीवेळी असं करणं थोडं कठीण आहे पण तसा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला श्वास घ्यायला आणि पुढील निर्णय घ्यायला मदत होईल. गर्दीच्या ठिकाणी तुमचे हात पुढे ठेवून चाला.   

2/7

बॉक्सर पोझीशन :

 पायात थोडं अंतर ठेवून उभे राहून चाला. यामुळे पाय मजबुतीने जमिनीवर राहतील ज्यामुळे तुम्हाला धक्का लागला तरी तुम्ही पडणार नाही. तसेच दोन्ही हात तुम्ही छातीजवळ असे घ्या जसे एखादा बॉक्सर बॉक्सिंग पोझीशन घेऊन उभा राहतो. असे केल्याने तुमची छाती आणि फुफ्फुस संकुचित होण्याची शक्यता कमी होईल.

3/7

जर चेंगराचेंगरी दरम्यान तुम्ही जमिनीवर कोसळलात तर दोन्ही हातांची मदत घेऊन उठण्याचा प्रयत्न करा. जर उठणं शक्य नसेल तर तुमचे गुडघे फोल्ड करा आणि स्वतःला संकुचित करून जमिनीवर झोपा. असे केल्याने शरीराचे संवेदनशील भाग जसे पोट, छाती इत्यादींवर प्रेशर येऊन ते दाबले जात नाहीत. तसेच आपला चेहरा आणि डोकं हे आपल्या हाताने किंवा कोपऱ्याने सुरक्षित ठेवा. अडथळा टाळण्यासाठी वाकणे आवश्यक असू शकते.

4/7

गर्दी सोबत चाला :

 जर तुम्ही प्रचंड गर्दीत अडकला असाल तर गर्दीच्या विरुद्ध दिशेने चालण्याचा प्रयत्न करू नका. कारण असे झाल्यास तुम्हाला चेंगराचेंगरी आणि धक्काबुक्की होऊन इजा होऊ शकते. गर्दी सोबत चालता चालता हळूहळू बाहेर निघण्याचा रस्ता कुठे आहे  हे शोधा. 

5/7

बाहेर पडण्याचा मार्ग शोधा :

 गर्दीतून बाहेर पडण्यासाठी, इमारत, स्टेज किंवा रस्त्याच्याकडेला पोहोचू शकाल असा मार्ग शोधा.  जर खूप गर्दी आणि चेंगराचेंगरी असेल तर उंच ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करा. जसे स्टेज, खांब, उंच पुष्ठभाग इत्यादी.  

6/7

पाणी पित राहा :

जास्त गर्दी असलेल्या ठिकाणी गर्मीमुळे उकडायला लागतं. त्यामुळे खूप घाम येतो आणि शरीर डिहाड्रेट होण्याचा धोका असतो. म्हणून पुरेसं पाणी पित राहणं योग्य ठरेल. तसेच शांत राहा पॅनिक होऊ नका. गर्दीच्यावेळी शांत आणि सतर्क राहणे गरजेचे असते. 

7/7

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)  

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x