व्हॉट्सअ‍ॅपचं चॅट लॉक फीचर; पर्सनल मेसेज लॉक करता येणार

व्हॉट्सअ‍ॅपच चॅट लॉक फीचर भारतात लाँच. पर्सनल मेसेज लॉक करण्यासाठी सुविधा. फिंगर प्रिंटनेच चॅट ऑपन करता येणार आहे. 

Jun 22, 2023, 23:50 PM IST

WhatsApp chat lock feature : व्हॉट्सअ‍ॅपने आता चॅट लॉक नावाचं फीचर लाँच केले आहे. या फीचरमुळे आपले खासगी मेसेज लॉक करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. जवळपास सर्वच फोनमधील व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना या सुविधेचा फायदा घेता येणार आहे. आतापर्यंत आपण संपूर्णच व्हॉट्सअ‍ॅप लॉक करण्याची सुविधा होती. मात्र, काहींचे पर्सनल मेसेज असतात, ते इतरांनी पाहू नयेत यासाठी ही सुविधा उपलब्ध केली आहे. त्यामुळे पर्सनल चॅट लॉक केलेले असल्यास फिंगर प्रिंट वापरूनच उघडता येणार आहे. यामुळे अनेकांना या फीचरचा फायदा होणार आहे.

1/5

यामुळे व्हॉट्सअ‍ॅपवर पर्सनल मेसेज लॉक करता येणार आहेत. 

2/5

चॅट लॉक ऑप्शनवर क्लिक करा. 

3/5

नंबर सिलेक्ट केल्यावर प्रोफाईल फोटोवर क्लिक करा. 

4/5

ज्या नंबरचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट लॉक करायचे आहे तो नंबर सिलेक्ट करा. 

5/5

यासाठी फोनमधील व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करा.