जेव्हा शाहरुखनं गौरीसमोर ठेवली बुरखा, नमाजची अट! पाहा, लग्नाच्या वेळी नेमकं काय घडलं?

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा आज 58 वा वाढदिवस आहे. शाहरुख खानच्या खासगी आयुष्याविषयी त्याच्या चाहत्यांना अनेक गोष्टी जाणून घ्यायच्या असतात. त्यापैकी एक म्हणजे त्याची पत्नी गौरी खान. गौरी खान आणि शाहरुखची लव्ह स्टोरी तर सगळ्यांनाच माहित आहे. पण तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का की एकदा शाहरुखनं गौरीला बुर्खा घालून नमाज पठण करण्यास सांगितलं होतं. त्याविषयी त्यानं एका मुलाखतीत खुलासा केला होता. 

| Nov 02, 2023, 16:13 PM IST
1/7

वेगवेगळ्या धर्मांचे असल्यानं लग्नात आले अडथळे

शाहरुख आणि गौरी हे दोघेही वेगवेगळ्या धर्माचे असल्यानं त्यांच्या लग्नाच्या विरोधात अनेक अडथळे होते. त्यात त्यांचा धर्म आणि शाहरुख तेव्हा एक नवोदित अभिनेता होता. 

2/7

शाहरुख आणि गौरीनं कधी केलं लग्न

शाहरुख आणि गौरीनं 1991 मध्ये हिंदू परंपरेनं लग्न केलं होतं. लग्ना दरम्यान, शाहरुखनं गौरीच्या कुटुंबासोबत कसा प्रँक करत असताना त्यानं गौरीला बुर्खा घालून नमाज पठण करण्यास सांगितलं होतं.  

3/7

शाहरुखनं केला होता हा खुलासा

लग्नाच्या दिवशी शाहरुखनं गौरीच्या कुटुंबासोबत एक प्रँक केला होता. गौरीचं कुटुंब हे रुढिप्रिय आहे आणि त्याला त्यात काहीही हरकत नाही. त्यांच्यासोबत केलेल्या मजेशीर प्रँकविषयी सांगत शाहरुख म्हणाला, त्या रिसेप्शन पार्टीत, मी जवळपास मध्यरात्री 1.15 वाजता पोहोचलो, तेव्हा ते सगळे बसले होते आणि ते चर्चा करत होते की हा मुस्लिम मुलगा आहे. तो मुलीचं नाव बदलेल का? आता ती मुस्लिम होईल का? 

4/7

गौरीला सांगितला बूर्खा घाल आणि नमाज पठण कर

शाहरुख याविषयी सांगताना म्हणाला, ही सगळी चर्चा पंजाबीमध्ये सुरु होती. हे ऐकताच त्यानं त्यांच्याकडे पाहिलं आणि गौरीला सांगितलं की 'तू लगेच बुर्खा परिधान कर, आपल्याला नमाज पठण करायचे आहे.'

5/7

गौरीच्या कुटुंबाला वाटली ही भीती

शाहरुखचे हे शब्द ऐकताच गौरीचं कुटुंब त्याच्याकडे आश्चर्यानं पाहू लागलं आणि त्यांना प्रश्न पडला की शाहरुखनं आधीच गौरीचं नाव बदललं की काय? त्या क्षणी त्यांची आणखी मज्जा घेण्यासाठी शाहरुख तिच्या कुटुंबाला म्हणाला, ती कायम स्वरूपी बुर्खात राहिल आणि कधीच घराच्या बाहेर जाणार नाही. 'बॉलिवूड शादी डॉटकॉम'नं याविषयी माहिती दिली आहे.

6/7

गौरीनं घेतला होता शाहरुखचं नाव बदलण्याचं निर्णय

गौरीनं जेव्हा तिच्या घरी शाहरुखविषयी सांगण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा त्याच्या धर्मामुळे त्यांच्या लग्नासाठी तयार होणार नाहीत असं वाटलं असता तिनं त्याचं नाव घरी अभिनव सांगण्याचा विचार केला होता. पण तिनं असं काही केलं नाही. 

7/7

गौरी आणि शाहरुखच्या लग्नाला झाली इतकी वर्षे

शाहरुख आणि गौरीच्या लग्नाला जवळपास 32 वर्षे झाली आहेत. त्यांना तीन मुलं आहेत. (All Photo credit : Shah Rukh Khan and Gauri Khan Instagram)