हिवाळ्यात ज्वारी, नाचणी की तांदळाची कुठली भाकरी खावी? या भाकरीने वजनही राहील नियंत्रणात

Winter Healthy Food : हिवाळ्यात वजन आटोक्यात राहवं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून कुठली भाकरी पौष्टिक आहे. त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. ज्वारी, नाचणी, तांदळाची कुठली भाकरी तुमच्यासाठी फायदेशीर जाणून घ्या.  

Nov 18, 2023, 17:20 PM IST
1/8

हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी बाजरीचा समावेश आहारात करावा. बाजरीची भाकरी ही आरोग्यासाठी उत्तम असते.   

2/8

बाजरीत भरपूर प्रमाणात कॅल्शियम तसंच व्हिटॅमिन बी, फायबर, प्रथिने, कार्ब्स, लोह, खनिजे आणि फायटेट, फिनॉल आणि टॅनिनसारखे अँटीऑक्सिडंट् उपलब्ध असतात.   

3/8

बाजरीही उष्ण असल्याने हिवाळ्यात खाल्ल्याने शरीरात आतून उबदार बनवते. शिवाय ती पचन्यास हलकी असल्याने तुम्हाला फायदा होतो. 

4/8

बाजरीचं पीठ ग्लूटेन मुक्त असल्याने हिवाळ्यात रोज खाल्ल्यामुळे पोटाशी संबंधित आणि पचनक्रियेशी संबंधित समस्येवर मात करण्यास मदत होते.   

5/8

वजन कमी करायचं असेल तर बाजरीची भाकरी खाल्ल्यामुळे आपल्याला पोट भरल्यासारखे वाटतं. त्यामुळे आपण जास्त खाणं टाळतो.   

6/8

बाजरीची भाकरी खाल्ल्यामुळे तुमच्या शरीराला ओमेगा 3 मिळतं. इतर धान्यांपेक्षा बाजरीच्या पिठात सर्वात जास्त ओमेगा 3 फॅटी अॅसिड आहे. 

7/8

बाजरीची भाकरी खाल्ल्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्याशिवाय तुमच्या शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. याचा फायदा किडनी आणि यकृता निरोगी राहण्यास होतो.  

8/8

बाजरीत मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम, पोटॅशियम असतात त्यामुळे बीपी आणि हृदयाच्या रुग्णांना डॉक्टर बाजरीची भाकरी खाण्याचा सल्ला दिला जातो. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)