347 खोल्याचं जगातील सर्वात मोठं घर, 22400 कोटींची मालकीण पण अजूनही अविवाहित आहे 'ही' राजकुमारी

Mansi kshirsagar | Jan 28, 2025, 14:34 PM IST
1/9

347 खोल्याचं जगातील सर्वात मोठं घर, 22400 कोटींची मालकीण पण अजूनही अविवाहित आहे 'ही' राजकुमारी

who is Princess Shivranjani Rajye। owner of world largest residence

Who Is Rajkumari Shivranjani Rajye: जगातील सर्वात मोठे खासगी निवासस्थान भारतात आहे. तर, या घराची मालकीण ही एका मोठ्या राजघराण्याची राजकुमारी आहे. या घरात अजूनही राजपुती थाट पाहायला मिळतो. 

2/9

347 खोल्याचे हे घर 26 एकरांत बांधण्यात आलेले आहे. हा राजवाडा बांधण्यासाठी तब्बल 15 वर्षे लागली. सूर्यनगरी जोधपुरमध्ये असलेले उम्मेद भवन जगातील सर्वात मोठे खासगी निवासस्थान असलेला राजवाडा आहे आणि त्याची मालकीण राजकुमारी शिवरंजनी राज्ये या आहेत. 

3/9

जोधपुरचे उम्मेद भवन पॅलेसचा इतिहास आणि वारसा खूप जुना आहे. आजदेखील महाराजांचे कुटुंब या राजवाड्यात राहतात. इतकंच नव्हे तर राजकुमारींनी राजवाड्याचा छोटासा हिस्सा टाटा कंपनीसोबत मिळून एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये रुपांतर केले आहे. 

4/9

राजकुमारी शिवरंजनी यांनी उम्मेद भवनला एक नवीन लूक दिला आहे. टाटांच्या हॉटेल ताजसोबत मिळून त्यांनी कुटुंबाचा वारसा एका उंचीवर नेऊन ठेवला. जोधपुरचे उम्मेद भवन हे हॉलिवूड आणि बॉलिवूड कलाकारांसह बिझनेसमन याचे आवडचे व्हेकेशन आणि डेस्टिनेशन वेडिंग प्लेस बनलं आहे. 

5/9

शिवरंजनी यांचे संपूर्ण बालपण वेस्ट इंडिजमध्ये गेले. त्यानंतर न्यूयॉर्कमध्ये त्यांनी फिल्म मेकिंगचा कोर्स, कॅम्ब्रिज विद्यापीठ, ह्युमन सायन्स या विषयांच्या पदवीचा अभ्यास पूर्ण केला. 

6/9

साधारण दोन दशकांपूर्वी शिवरंजनी यांचे लहान भाऊ आणि युवराज शिवराज सिंह यांच्यासोबत झालेल्या एका दुर्घटनेमुळं त्यांच्या कुटुंबाला मोठ्या आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागला. तेव्हा शिवरंजनी यांनी व्यावसायात सक्रीय सहभाग घेतला. 

7/9

 राजकुमारी शिवरंजनी राज्ये यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्यांचं सपूर्ण आयुष्य परिवारासाठी व व्यावसायासाठी खर्ची करण्याचा निर्णय घेतला. 

8/9

शिवरंजनी यांनी फॅमिली बिझनेसची धुरा सांभाळली आणि शाही किल्ला आणि महल यांचे रुपातंर संग्रहालय आणि हॉटलमध्ये करण्यासाठी पाउल उचलले. 

9/9

गज सिंह यांच्या कुटुंबीयांची नेटवर्थ 22400 कोटी इतकी आहे. शिवरंजनी उम्मेद भवन पॅलेस आणि मेहरानगढ किल्ल्याची देखभाल करण्याचे काम करतात. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x