Swapnil Kusale: 7 नंबरवरुन थेट ब्रॉन्झ... धोनीचा Fan असलेल्या स्वप्निलने त्याचीच ट्रीक वापरत पटकावलं Olympic पदक

Paris Olympics 2024 Kolhapur Atheletes Swapnil Kusale Wins Bronze: स्वप्निल काल अव्वल आठ खेळाडूंमध्ये पात्र ठरल्यापासूनच त्याच्याकडून पदकाची अपेक्षा होती. पात्रता फेरीमध्ये सातव्या स्थानावर राहिलेल्या स्वप्निलने थेट कांस्य पदकावर नाव कोरलं. त्याने हे कसं केलं पाहूयात फोटोंमधून...

| Aug 01, 2024, 14:51 PM IST
1/11

Swapnil Kusale Wins Bronze

पॅरिसमध्ये सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताच्या स्वप्निल कुसळेने ऐतिहासिक कामगिरी केली आहे.  

2/11

Swapnil Kusale Wins Bronze

कोल्हापूरच्या स्वप्निल कुसळेने 50 मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारामध्ये कांस्य पदकावर आपलं नाव कोरलं आहे.   

3/11

Swapnil Kusale Wins Bronze

स्वप्निलने 451.4 पॉइण्ट्स पटकावत कांस्य पदकावर नाव कोरलं. विशेष म्हणजे पात्रता फेरीमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिलेल्या चीनच्या लियूनेच सुवर्णपदक पटकावलं. 

4/11

Swapnil Kusale Wins Bronze

लियूने एकूण 463.9 पॉइण्ट्स मिळवले. तर युक्रेनचा सेरहिय कुशिकने 461.3 पॉइण्ट्स मिळवत दुसरं स्थान पटकावलं. सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये स्वप्निल सहाव्या स्थानी होता. 

5/11

Swapnil Kusale Wins Bronze

स्वप्निलने मजल दरमजल करत पाचव्या, चौथ्या स्थानी झेप घेत अखेरच्या फेरीमध्ये तिसरं स्थान निश्चित केलं.  

6/11

Swapnil Kusale Wins Bronze

स्वप्निलचा आदर्श हा भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी आहे. धोनीच्या शांत आणि संयमी राहण्याच्या स्वभावाचा आपल्यावर फार मोठा प्रभाव असल्याचं स्वप्निलनेच सांगितलं आहे. पात्रता फेरीमध्ये टॉप 8 मध्ये राहून पुढच्या फेरीसाठी पात्र ठरल्यानंतर स्वप्निलनेच हा खुलासा केला. 

7/11

Swapnil Kusale Wins Bronze

"मी रेंजवर असता मला फार गप्पा मारायला आवडत नाही. शांत आणि संयमी राहण्यास माझं प्राधान्य असतं. अचूक लक्ष्यभेद करण्यासाठी मला या दोन गोष्टी महत्त्वाच्या वाटतात. मी धोनीचा फार मोठा चाहता आहे," असं स्वप्निलने अंतिम सामन्याआधी सांगितलं होतं.

8/11

Swapnil Kusale Wins Bronze

"मैदानामध्ये कितीही तणाव असला तरी धोनी शांत अन् संयमी असतो. मला हे फार भावते. मलाही अशाच पद्धतीने वावरायला आवडतं," असं स्वप्निल म्हणाला. 

9/11

Swapnil Kusale Wins Bronze

विशेष म्हणजे धोनी आधी ज्याप्रमाणे तिकीट तपासणीस म्हणजेच टीसी म्हणून काम करायचा त्याप्रमाणे स्वप्निलही टीसीच आहे. कोल्हापूरमधील कांबळवाडी गावात जन्मलेला 29 वर्षीय स्वप्निल मागील 12 वर्षांपासून ऑलिम्पिकसाठी प्रयत्न करत होता.

10/11

Swapnil Kusale Wins Bronze

"जे इतके वर्ष करत होतो तेच यावेळीही फॉलो केलं. भारतासाठी मेडल जिंकल्याचा आनंद जास्त आहे," असं स्वप्निल मेडल जिंकल्यानंतर म्हणाला. म्हणजेच धोनीप्रमाणेच संयम राखण्याने स्वप्निलला हे यश मिळवता आलं, असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही.

11/11

Swapnil Kusale Wins Bronze

"खूप आनंद झाला आहे. अजूनही माझ्या हृदयाचे ठोके वाढलेले जाणवत आहेत. एलिमिनेशनच्या राऊंडमध्ये मी फक्त माझ्या श्वासावर लक्ष केंदित केलं होतं. स्कोअरचा विचार मी अजिबात विचार करत नव्हतो," असं मेडल जिंकल्यानंतर स्वप्निल म्हणाला.