एक हात खिशात, दुसऱ्या हाताने ऑलिम्पिकमध्ये आरामात निशाणा, 'तो' नेमबाज नाही तर...

Who is Yusuf Dikec : ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत सहभागी झालेला तुर्कीमधील 51 वर्षीय शूटर युसूफ डिकेक यांची (Yusuf Dikec) सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. खरं तर त्यांच्या स्टाईलमुळे सर्वत्र कौतुक सुरु आहे. पण युसूफ डिकेक हे नेमकं आहे तरी कोण तुम्हाला माहितीय?  

| Aug 02, 2024, 12:24 PM IST
1/7

युफूस डिकेक यांची एवढी चर्चा होण्यामागे कारण असं आहे की, त्यांनी नेमबाजने ऑलिम्पिकमध्ये अगदी सहज नेमबाजी करत Silver Medal वर आपलं नाव कोरलंय.

2/7

एक हात खिशात, डोळ्यांवर नेहमीचाच साधा चष्मा आणि त्यांनी सहज नेम साधला. त्यांचा लिम्पिकमधील स्वॅग पाहून सोशल मीडियावर तुफान कौतुक होतंय. 

3/7

पण तुम्हाला त्यांच्या कमालमागील गुपित जाणून आश्चर्य वाटेल. 51 वर्षीय युसूफ डिकेक हे नेमबाज तर आहेच पण त्याशिवाय ते एक कमांडो आहेत. 

4/7

युसुफ डिकेच यांचा जन्म 1973 मध्ये तुर्कीच्या कहरामनमारा प्रांतातील गोक्सुन जिल्ह्यातील तासोलुक गावात झालाय. युसुफ डिकेच हे तुर्की जेंडरमेरीचे सेवानिवृत्त नॉन-कमिशन केलेले अधिकारी आहेत. युसूफ डिकेक यांनी 2001 पासून शूटिंगला सुरू केली. 

5/7

युसूफ डिकेच हे तुर्की राष्ट्रीय संघ आणि लष्करी संघासाठी एकाच वेळी शूटिंग करतात. त्यांचं प्राथमिक शिक्षण तासोलुक गावात पूर्ण झालं. तर अंकारामधील गाझी विद्यापीठातून शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विषयात त्यांनी पदवी प्राप्त केलीय.   

6/7

युसूफ डिकेच यांनी 1994 मध्ये अंकारामधील जेंडरमेरीच्या मिलिटरी स्कूलमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी 2000 मध्ये सार्जंट पदासह पदवी प्राप्त केली. युसुफ डिकेचने इस्तंबूलमध्ये एक वर्ष सेवा केल्यानंतर तुर्की जेंडरमेरीच्या स्पोर्ट्स क्लबमध्ये बदली झाली. 

7/7

काही काळ लष्करात सेवा दिल्यानंतर, युसूफ डिकेच यांनी 2001 मध्ये नेमबाजी खेळात हात आजमावण्यास सुरुवात केली. तेव्हापासून ते लष्करी राष्ट्रीय संघाच्या वतीने राष्ट्रीय खेळांमध्ये भाग घेत असतात. युसूफ डिकेच यांनी आतापर्यंत चार युरोपियन चॅम्पियनशिप विजेतेपद, एक ISSF विश्वचषक विजेतेपद आणि एक CISF जागतिक चॅम्पियनशिप सुवर्णपदक नावावर केलंय.