तब्बल 2,11,93,27,18,75,000 रुपयांचा मालक असूनही 2BHK फ्लॅटमध्ये का राहतो हा धनिक? आई विश्रांतीसाठी...

Rented Home: अशीच एक व्यक्ती अब्जोंची संपत्ती असूनही चक्क दोन बेडरूम, हॉल आणि किचनच्या एका फ्लॅटमध्ये राहते. असं का? जाणून घ्या.   

Sep 13, 2024, 12:25 PM IST

Rented Home: जगातील श्रीमंतांच्या यादीत येणारी अनेक नावं आणि त्या व्यक्तींची जीवनशैली तुम्ही पाहिली असेल. आश्चर्याची बाब म्हणजे ही माणसं इतकी कमाल असतात की नकळतच त्यांच्या वागण्याबोलण्यातून वेगळेपणा झळकत असतो. 

 

1/7

गडगंज श्रीमंती

Why Elon Musk live in Rented Home see inside photos

एकूण संपत्ती  2,11,93,27,18,75,000 रुपये म्हणजेच 252.5 अब्ज रुपयांची गडगंज श्रीमंती असणाऱ्या व्यक्तीचं हे घर. या धनाढ्य व्यक्तीकडे इतकी संपत्ती असतानाही त्याचं राहतं घर आणि जीवनशैली पाहून अनेकजण हैराण होतात, कारण हा माणूस एका भाडेतत्त्वावरील घरात राहतो. 

2/7

मस्क

Why Elon Musk live in Rented Home see inside photos

जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी कितीही बंगले असले तरीही स्वत: मात्र प्रत्यक्षात भाड्याच्या घरात राहणारा हा माणूस म्हणजे एलॉन मस्क. सोशल मीडियावर मस्क जिथं राहतो त्या ठिकाणचे फोटो व्हायरल झाले असून, पाहणारेही हैराण झाले आहेत.   

3/7

2बीएचके फ्लॅट

Why Elon Musk live in Rented Home see inside photos

मस्क एका सर्वसाधारण 2बीएचके फ्लॅटमध्ये राहत असून, त्याची किंमत साधारणत: 50 डॉलर इतकी असावी. मस्कचं आत्मचरित्र्य लिहिणाऱ्या वॉल्टर इसाकसननं त्याच्या घरातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यामुळं अनेकांनाच या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या घरात डोकावण्याची संधी मिळाली होती

4/7

घरांची विक्री

Why Elon Musk live in Rented Home see inside photos

2020 मध्ये मस्कनं त्याच्या 5 घरांची विक्री केली होती. हल्लीच त्यानं कॅलिफोर्नियास्थित आपलं शेवटचं घरही 32 मिलियन डॉलर किमतीला विकलं. 

5/7

स्पेसएक्स

Why Elon Musk live in Rented Home see inside photos

कॅलिफोर्नियातील घर विकल्यानंतर त्यानं टेक्सासच्या बोका चिका इथं भाडेतत्वावर राहण्यास सुरुवात केली. सूत्रांच्या माहितीनुसार हे घर मस्कनं स्पेसएक्सकडून भाड्यानं घेतलं आहे. त्यानंच ट्विट करत याविषयीची माहितीसुद्धा दिली होती. 

6/7

लिविंग रुम

Why Elon Musk live in Rented Home see inside photos

मस्कच्या घराती फोटोंमध्ये फ्रीज, कॉफी मशिन, खुर्ची आणि त्यावर टेस्लाच्या प्लेडमोडचं जॅकेट पाहायला मिळतं. लिविंग रुममध्ये त्यानं काहीही ठेवलं नसून, तिथं फक्त एक कॉफी टेबल आहे जिथं मस्क मिटींग आणि तत्सम कामं करतो.  

7/7

आईसुद्धा जगते सामान्य आयुष्य

Why Elon Musk live in Rented Home see inside photos

मस्ककडे कमाल श्रीमंती असली तरीही त्याचं राहणीमान अगदी सामान्य आहे असं सांगितलं जातं. सुरुवातीला तो मित्रांसमवेत राहत होता, पण त्यानंतर मात्र त्यानं वेगळं घर घेतलं. फक्त एलॉन मस्कच नव्हे, तर त्याची आईसुद्धा त्याच्या घरी जमीनीवर बिछाना पसरवूनच विश्रांती करते. मस्कची आई एक सुपरमॉडेल आणि एक डाएटिशीयन आहे