Photos: भारतीय 'खेळाडू'ला धक्के मारुन बाहेर काढलं? कोहलीनेही केली मध्यस्थी पण...

World Cup 2023 India vs Australia Indian Jersey Man Escorted Out of Ground: भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या सामन्यादरम्यान मैदानामधून भारतीय जर्सी घातलेल्या एका व्यक्तीला चक्क धक्का मारुन बाहेर काढण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. यासंदर्भातील फोटो सध्या व्हायरल होत आहेत. जाणून घेऊयात नक्की घडलं काय...

| Oct 08, 2023, 16:02 PM IST
1/9

World Cup 2023 India vs Australia notorious pitch invader Jarvo 69

सोशल मीडियावर काही ठिकाणी भारतीय खेळाडूला सामन्यादरम्यान धक्के मारुन मैदानाबाहेर काढण्यात आल्याची चर्चा आहे. जाणून घेऊयात नक्की घडलं काय...

2/9

World Cup 2023 India vs Australia notorious pitch invader Jarvo 69

ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईच्या चेपॅक क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे. मोठी धावसंख्या उभारण्याच्या उद्देशाने पॅट कमिन्सने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

3/9

World Cup 2023 India vs Australia notorious pitch invader Jarvo 69

सामन्यातील तिसऱ्याच ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर विराट कोहलीने जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर मिचेल मार्शला झेलबाद केलं. विराटने स्लीपमध्ये भन्नाट कॅच घेतला.

4/9

World Cup 2023 India vs Australia notorious pitch invader Jarvo 69

सामना रंगात आलेला असतानाच अचानक जॅरव्हो हा पिच इव्हेडर मैदानात शिरला. 69 क्रमांकाची जर्सी घालून मैदानात आला. तो आधी उपकर्णधार आणि विकेटकीपर के. एल. राहुलजवळ जाऊन बोलू लागला तर राहुलने त्याला मैदानाबाहेर जाण्याचा सल्ला दिला.

5/9

World Cup 2023 India vs Australia notorious pitch invader Jarvo 69

त्यानंतर जॅरव्होला मैदानातून बाहेर काढण्यासाठी सुरक्षा यंत्रणेमधील काहीजणांनी मैदानात धाव घेतली आणि त्याला धक्के मारुन बाहेर काढू लागले.

6/9

World Cup 2023 India vs Australia notorious pitch invader Jarvo 69

मात्र जॅरव्हो मैदानातून बाहेर जाण्यास तयार नव्हता. अखेर विराट कोहलीने त्याची समजूत घातली आणि त्याला मैदानाबाहेर जाण्यास सांगितलं. तो विराटबरोबरही चर्चा करु लागला.

7/9

World Cup 2023 India vs Australia notorious pitch invader Jarvo 69

अखेर सुरक्षारक्षकांनी त्याला धक्के मारत मारत मैदानाबाहेर नेलं. मात्र जॅरव्होने अचानक अशाप्रकारे एन्ट्री घेतल्याने प्रेक्षकांनी या नकोश्या पाहुण्याने घातलेल्या गोंधळाची मजा घेतली. 

8/9

World Cup 2023 India vs Australia notorious pitch invader Jarvo 69

जॅरव्होने भारतीय संघाच्या सामन्यात अशाप्रकारे मैदानात घुसखोरी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. डिनॅएल जार्व्हिस असं त्याचं खरं नाव असून तो जॅरव्हो नावाची जर्सी घालून मैदानात घुसखोरी करतो. 

9/9

World Cup 2023 India vs Australia notorious pitch invader Jarvo 69

28 ऑगस्ट 2021 रोजी जॅरव्हो पहिल्यांदा चर्चेचा विषय ठरलेला. तो पॅड, ग्लोज, हेल्मेट घालून फलंदाजी करण्यासाठी भारत आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यादरम्यान मैदानात शिरलेला. तेव्हाही त्याला धक्के मारुन बाहेर काढण्यात आलं होतं.