वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच्या जर्सीचा इतिहास, 31 वर्षात असा बदलला रंग आणि डिझाइन

World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषकाची सुरुवात 1975 मध्ये झाली. त्यावेळी पांढऱ्या कपड्यातच क्रिकेट खेळलं जायचं. क्रिकेटला खरा रंग मिळाला तो 1992 मध्ये पहिल्यांदा एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये रंगीत कपड्यांचा वापर सुरु करण्यात आला. त्यानंतर प्रत्येक वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाच्या जर्सीमध्ये थोडेफार बदल होत गेले. आता 2023 च्या वर्ल्ड कपसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची जर्सी लाँच केली आहे. गेल्या 31 वर्षात सात खेळल्या गेलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाची जर्सीचा रंग आणि डिझाइन कशी बदलत गेली ते पाहूयात.

| Sep 21, 2023, 20:07 PM IST
1/9

1992 वर्ल्ड कप

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड आयोजक असलेल्या 1992 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्यांदा रंगीत कपड्यांचा वापर करण्यात आला. टीम इंडियासठी निळी जर्सी मिळाली. या जर्सीच्या खांद्यावर कलरफुल स्ट्रिप्स होत्या. याशिवाय जर्सीच्या पुढच्या भागावर इंडिया नाव आणि जर्सीच्या मागे खेळाडूचं नाव लिहिण्यात आलं होतं. 

2/9

1996 वर्ल्ड कप

1996 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत आकाशी आणि पिवळ्या रंगाचा जर्सीसाठी वापर करण्यात आला. या जर्सीची कॉलर पिवळ्या रंगाची होती. याशिवाय एक सप्तरंगीपट्टी होती. तसंच पिळव्या पट्टीवर इंडिया नाव लिहिण्यात आलं होतं.

3/9

1999 वर्ल्ड कप

1999 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाच्या जर्सीत थोडासा गडद आकाशी आणि पिवळ्या रंगाचा वापर करण्यात आला. पण यावेळी पिवळा रंगाचा पॅटर्न थोडासा बदलण्यात आला. शिवाय त्याला काळ्या रंगाची बॉर्डरही देण्यात आली. 

4/9

2003 वर्ल्ड कप

यावेळच्या वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाच्या जर्सीच्या रंगात आणि डिझाईनमध्ये एकदम वेगळा बदल करण्यात आला. जर्सीचा रंग निळा करण्यात आला. जर्सीच्या खांद्याच्या दोन्ही बाजूला गडद निळ्या रंगाच्या पट्टया देण्यात आल्या. तर जर्सीच्या मध्यभागी तिरंगा दाखवण्यात आला. यावर इंडिया असं लिहिण्यात आलं होतं. 

5/9

2007 वर्ल्ड कप

2007 च्या वर्ल्ड कपासाठी टीम इंडियाच्या जर्सीत बदल करण्यात आला. निळा रंगं पुन्हा फिकट करण्यात आला. जर्सीतून गडद निळ्या पट्ट्या काढून टाकण्यात आला. INDIA साठी नवा फाँट वापरण्यात आला. मध्यमागी असलेला तिरंगा एका बाजूला करण्यात आला. आधीपेक्षा जर्सीला जास्त स्टायलिश लूक देण्यात आला. 

6/9

2011 वर्ल्ड कप

यावेळचा टीम इंडियाचा रंग संपूर्ण देशासाठी लकी ठरला. 28 वर्षांनंतर भारताने वर्ल्ड कपवर नाव कोरलं. यावेळी जर्सीचा रंग गडद निळा करण्यात आला. दोन्ही बाजूला तिरंगा स्ट्रीप्स देण्यात आल्या. तर इंडिया अक्षर भगव्या रंगात छापण्यात आले होते. 

7/9

2015 वर्ल्ड कप

2015 मध्ये जर्सीतून तिरंगा गायब झाला. प्लेन ब्लू टीशर्टवर पुढच्या बाजूला भगव्या रंगात इंडिया लिहिण्यात आलं होतं. यावेळच्या वर्ल्ड कपचं वैशिष्ट्य म्हणजे यावेळची जर्सी रिसाइकल्ड प्लास्टिकच्या बाटल्यांपासून बनवण्यात आली होती. 

8/9

2019 वर्ल्ड कप

चमकदार निळ्या रंगाच्या जर्सीत भगव्या रंगाचाही वापर करण्यात आला. जर्सीची कॉलर भगव्या रंगाची तर याच रंगात इंडियाही लिहिण्यात आलं होतं. भारताला सेमीफायनलमध्ये पराभव पत्करावा लागला होता. 

9/9

2023 वर्ल्ड कप

आता 5 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी बीसीसीआयने नवी जर्सी लाँच केली आहे. बीसीसीआयने एक व्हिडिओ जारी केला असून यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा दिसत आहे. खांद्यावर तीन स्ट्रीप आहेत. तर छातीवर बीसीसीआयचा लोगो असून त्यावर दोन स्टार आहेत.