'या' आहेत भारताच्या पहिल्या महिला फोटोजर्नलिस्ट, ज्यांना पतीकडून मिळाला फोटोग्राफीचा धडा
Homi Vyarawalla: आज वर्ल्ड फोटोग्राफी डे (World Photography Day) आहे. आजचा दिवस हा फारच खास आहे. त्यातून आपल्यासाठी फोटोंचे महत्त्व किती वेगळं आहे हे काही सांगायला नकोच. आज या औचित्यानं आपण जाणून घेऊया ते म्हणजे भारताच्या पहिल्यावहिल्या महिला फोटो पत्रकाराबद्दल. तुम्हाला त्यांना मिळालेली पहिली Assignment कोणती होती माहितीये?
Homi Vyarawalla: आपले सर्व आनंदाचे, मस्तीचे, प्रेमाचे आणि सुख-दु:खाचे क्षण हे टिपले जावेत आणि सोबतच ते आपल्याकडे असावेत अशी ही मानवी इच्छा साकार झाली ही फोटोंमुळे. जेव्हा फोटो नव्हते तेव्हा लोकं आपल्याला आरश्यात टिपायचे अथवा चित्रकलेतून पाहायचे. तेव्हा आपल्या मनात आपली प्रतिमा या माध्यमातून तयार करणे फारच रोमांचक असेल नाही? आज आपण हीच प्रतिमा सोशल मीडियावर आणि सेल्फीतून, Iphone च्या कॅमेऱ्यातून पाहतो. त्यामुळे स्वत:कडे पाहण्याचा आपला दृष्टीकोनही फार वेगळा आहे. फोटोंनी आपलं आयुष्य पुरतं बदलून टाकलं आहे. आज दररोज स्मार्ट फोनमुळे हजार फोटो आपण टिपू शकतो.