close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

#World Yoga Day 2019 : आता ट्रेंड 'जलयोगा'चा

आताच्या युगात योगाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

Jun 20, 2019, 13:59 PM IST

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योगाविद्या आणि योगसाधनेचे महत्व पटवून देत, २०१४ साली झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला आणि संयुक्त राष्ट्रांनी या प्रस्तावास मान्यता दिली. याच पार्श्वभुमीवर उद्या जगभरात 'योग दिवस' साजरा करण्यात येणार आहे. आताच्या युगात योगाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. योगसाधना अनेकजण करतात पण पाण्यात तासन् तास बसून एक व्यक्ती योगा करत असल्याचे समोर येत आहे. आग्रा येथील हरेश चतुर्वेदी यांनी चक्क पाण्यात झोपून योगा केला आहे.

1/5

अनेक योगा प्रकारांनंतर आता 'जलयोग' प्रसिद्धीस येत आहेत. 

2/5

गेल्या आठ वर्षांपासून हरेश चतुर्वेदी 'जलयोग' या योगा प्रकाराचा आभ्यास करत आहेत. ज्यामध्ये प्राणायाम, पद्मासन, ब्रह्मासन, गरुणासन  इत्यादी योगासनांचा समावेश आहे.   

3/5

कोणत्याही गोष्ट आत्मसात करण्यासाठी प्रयत्नांची गरज असते. हरेश रोज दोन तास योगाभ्यास करतात. त्यांच्याकडे असलेले योगाचे ज्ञान इतरांना देण्याचा त्यांचा मानस आहे.  

4/5

पाण्यावर योगा करण्याचे अनेक फायदे आहेत. योगा केल्याने व्यक्तीचा मानसिक तणाव, थकवा कमी होण्यास फायदा होतो. ह्रदय आणि फुफ्फुसांच्या आजारापासून योगा आपल्याला दूर ठेवतो.

5/5

सरकार त्यांच्या प्रयत्नांना बळ देईल असे हरेश यांचे स्वप्न आहे. ज्यामुळे ते त्यांच्यातील योगाचे ज्ञान पुढील पिठीला देतील. 'जलयोगा'ला राष्ट्रीय दर्जा देण्याचा त्यांचा मानस आहे.