जगातील 'या' देशात सर्वात स्वस्त पेट्रोल

देशात सध्या पेट्रोल (Petrol price) आणि डिझेलचे (Diesel price) दर गगनाला भिडले आहे. पण असे काही देश आहेत जिथे पेट्रोल एक रुपयांहूनही कमी दरात उपलब्ध आहे. जाणून घ्या अशा काही देशांबाबत जेथे पेट्रोलच्या किंमती सर्वात कमी आहेत.

Dec 27, 2019, 14:48 PM IST

जाणून घ्या अशा काही देशांबाबत जेथे पेट्रोलच्या किंमती सर्वात कमी आहेत. 

1/6

व्हेनेज्युएला  (venezuela) असा देश आहे, जेथे जगातील सर्वात स्वस्त पेट्रोल मिळतं. दक्षिण अमेरिकेतील व्हेनेज्युएलामध्ये पेट्रोलचा दर ७० पैसे प्रति लीटर इतका आहे. व्हेनेज्युएलामध्ये सर्वात मोठे तेलाचे साठे आहेत. त्यामुळे पेट्रोलचा भावही कमी आहे.

2/6

जगातील दुसऱ्या क्रमांकावर सर्वात स्वस्त पेट्रोल ईराणमध्ये  (Iran) विकलं जातं. ईराणमध्ये एक लीटर पेट्रोलची किंमत ८.५५ रुपये इतकी आहे.   

3/6

सूडानमध्येही (Sudan) पेट्रोलचे दर कमी आहेत. एक लीटर पेट्रोलची किंमत १२.११ रुपये इतकी आहे. सूडान तिसऱ्या क्रमांकावरील सर्वात स्वस्त पेट्रोल विकणारा देश आहे.  

4/6

चौथ्या क्रमांकावर सर्वात स्वस्त पेट्रोलचे दर असणारा देश अल्जीरिया आहे. अल्जीरियामध्ये पेट्रोल २४.७७ प्रति लीटर इतकं आहे.

5/6

स्वस्त पेट्रोल असणाऱ्या देशांमध्ये कुवेत पाचव्या क्रमांकावर आहे. कुवेतमध्ये एक लीटर पेट्रोलसाठी २४.०६ रुपये मोजावे लागतात.

6/6

भारतात सध्या पेट्रोलचा दर ७५ रुपये प्रति लीटरवर पोहचला आहे. तर डिझेलच्या दरांतही गेल्या काही दिवसांपासून वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय.