WPL Auction : WPL मध्ये 'या' महिला खेळाडूंना कोटींची बोली, जाणून घ्या

WPL Expensive Players: महिला प्रीमियर लीग 2023 (WPL 2023) लिलावात सहभागी झालेल्या 448 खेळाडूंपैकी फक्त 90  खेळाडूच भाग्यवान असतील. या स्पर्धेत एकूण 5 संघ सहभागी होत आहेत. अशा परिस्थितीत सर्व फ्रँचायझींकडे 90 खेळाडूंवर खर्च करण्यासाठी 60 कोटी रुपये आहेत. 

Feb 13, 2023, 21:19 PM IST

WPL Expensive Players: भारतात पहिल्यांदाच होणाऱ्या महिला IPL (WPL 2023 Auction) चा लिलाव आजपासून सुरू झाला. या लिलावात आतापर्यंत 34 महिला खेळाडूंना संघाने विकत घेतले आहे.  या लिलावात सर्वांत महागड्या महिला खेळाडू कोणत्या ठरल्या आहेत. हे जाणून घेऊय़ात.

1/10

टीम इंडियाची स्टार फलंदाज स्मृती मंधानाला आरसीबीने 3.4 कोटी रुपयांना संघात सामील केले. या लिलावात ती सर्वात महागडी खेळाडू होती.

2/10

मुंबई इंडियन्सने इंग्लंडच्या नताली नताली सिव्हरला (Natalie Sciver) 3.2 कोटी रूपयांना ताफ्यात घेतले. 

3/10

ऑस्ट्रेलियाचा डॅशिंग क्रिकेटर ऍशले गार्डनरलाही 3.2 कोटीची बोली लागली. गुजरातने तिला संघात समाविष्ट केले.

4/10

यूपी वॉरियर्सने भारताची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मावर 2.6 कोटींची बोली लावून संघात स्थान दिले. 

5/10

टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा पराभव करणाऱ्या जेमिमाला 2.2 कोटींना दिल्लीने संघात घेतले आहे. 

6/10

युवा स्फोटक सलामीवीर शेफाली वर्माला दिल्लीने 2 कोटी रुपयांना खरेदी केले.

7/10

ऑस्ट्रेलियाची प्रसिद्ध क्रिकेटर बेथ मुनी हिला 2 कोटी रुपये मिळाले आहेत. गुजरातने तिचा संघात समावेश केला.

8/10

मुंबईने पूजा वस्त्राकरसाठी 1.9 कोटी खर्च केले आणि तिला संघात घेतले.

9/10

युवा यष्टिरक्षक रिचा घोषचा बंगळुरूने 1.9 कोटींमध्ये संघात समावेश केला.

10/10

मुंबई इंडियन्सने हरमनप्रीत कौरवर सर्वोत्तम बोली लावली. 1.8 कोटीमध्ये तिला संघात स्थान देण्यात आले.