दिसतेय सायकल, पण ही आहे E-bike; फिचर्स पाहून खरेदी करण्यासाठी धाव माराल

मुंबई : बाईक्सच्या विश्वातील सर्वात लोकप्रिय आणि नामांकित असलेल्या Yamaha कंपनीच्या 3 ई-बाईक्सचं अनावरण नुकतचं पार पडलं आहे. लवकरच या बाईक्स खरेदीसाठी बाजारपेठेत उपलब्ध होतील. या बाईक्सच्या फीचर्सबद्दल जाणून घ्या...

Oct 08, 2022, 13:56 PM IST
1/5

Yamaha Electric Bikes

यामाहा कंपनीकडून 3 ई-बाईक्सचं अनावरण केलं आहे. यामध्ये Moro 07 ई-बाईक Mountain, Wabash RT ई-बाईक Gravel आणि Crosscore RC ई-बाइक एका Urban Commuting बाईकचा समावेश आहे. यामाहाची पहिली बाईक, मोपेड आणि इतर मोबिसिटी मशीन्समध्ये लाईनअपचं सादरीकरण करण्याची घोषणा केली. कंपनीला आता ई-मोबिलिटी सेगमेंटमध्ये पूर्णपणे पाय रोवायचे आहेत.

2/5

Moro 07

Moro 07 मध्ये विशेष ड्युअल टोन फ्रेम देण्यात आली आहे. या बाईकमध्ये PW-X3 इलेक्ट्रिक इंजिन उपलब्ध आहे. PW-X3 हे हलकं पण शक्तिशाली ड्राइव्ह युनिट आहे जे झटपट टॉर्क निर्माण करण्यासाठी झिरो कॅडेन्स तंत्रज्ञान वापरलं जातं. त्याची टॉप स्पीड 15.5mph (अंदाजे 24.9 किमी/तास) आहे. यात 500Wh ची बॅटरी आणि Maxxis 27.5-इंच टायर आहेत.

3/5

Wabash RT

या ई-बाईकबद्दल बोलायचे झाले तर तिला एक मजबूत फ्रेम मिळत आहे. ही PW-ST ड्राइव्ह युनिट असलेली हलकी बाईक आहे. युनिटमध्ये झिरो कॅडेन्स तंत्रज्ञान आहे आणि 500Wh बॅटरी देखील आहे. त्याचा टॉप स्पीड 28mph म्हणजेच सुमारे 45 किलोमीटर प्रति तास आहे. त्याची मोटर 250W पॉवर आणि 70Nm टॉर्क जनरेट करते.

4/5

Crosscore RC

क्रॉसकोअर आरसीला शिमॅनो गिअर्सचा वेगळा सेट मिळतो. शहरी भागात चालवण्यासाठी ही बाईक योग्य आहे. त्याची टॉप स्पीड सुद्धा 28mph आहे म्हणजेच सुमारे 45 kmph आहे, Wabash RT प्रमाणेच. या ई-बाईकची मोटर 250W चा पॉवर आणि 85Nm टॉर्क देते. ई-बाईक ईसीओ, स्टँडर्ड, हाय, एमटीबी, एक्स्ट्रा-पॉवर, ऑटोमॅटिक, वॉक असिस्ट मोडला सपोर्ट करते.

5/5

Other details

यामाहा या वर्षाच्या अखेरपर्यंत या तीन इलेक्ट्रिक बाईक्स काही ठरावीक बाजारपेठांमध्ये लॉन्च करणार आहे. या तिन्ही बाईक वेगवेगळ्या रंगांच्या पर्यांयांमध्ये खरेदी करता येणार आहेत. स्टायलिश डिझाईनसोबतच या बाईक्सचे फीचर्सही यूजर्सना भुरळ घालणार आहेत.