Year Ender 2022: शेन वॉर्नपासून एंड्रयू सायमंड्सपर्यंत; क्रिकेटच्या 'या' दिग्गजांनी घेतला जगाचा निरोप

Year Ender 2022: यंदाच्या वर्षी जगातील अनेक महान क्रिकेटर जगाला अलविदा म्हणून गेले. यामध्ये महान क्रिकेटपटूंचा देखील समावेश होता. ऑस्ट्रेलिया क्रिकेट प्रेमींसाठी यंदाचं वर्ष फार वाईट गेलं. ऑस्ट्रेलिया क्रिकेटमधील 3 दिग्गज खेळांडूंचं यंदाच्या वर्षी निधन झालं.

Dec 28, 2022, 23:08 PM IST
1/5

शेन वॉर्न- ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नचे यावर्षी वर्षी निधन झाले. थायलंडमध्ये सुट्टी घालवण्यासाठी गेला असता त्याला हृदयविकाराचा झटका आला. अशावेळी त्याचा मृत्यू झाला.  

2/5

रोडनी मार्श- ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू रॉड मार्श यांचे 74 व्या वर्षी निधन झाले. मार्श यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर ते कोमात गेले होते. काही दिवस कोमात राहिल्यानंतर त्यांचं निधन झालं.

3/5

एंड्रयू सायमंड्स- ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचं त्याच्या वयाच्या 46 व्या वर्षी निधन धालं. टाऊन्सविलेमध्ये एका कार अपघातात सायमंड्सचा मृत्यू झाला.

4/5

असद रऊफ- पाकिस्तानचे माजी अंपायर असद रऊफ यांनी देखील याच वर्षी जगाचा निरोप घेतला. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या रऊफ यांचा मृत्यू झाला.

5/5

हैदर अली- भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमधील प्रसिद्ध खेळाडू राहिलेले हैदर अली यांचं यावर्षी निधन झालं. वयाच्या 79 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.