जिंकलंस! लॉकडाऊनमध्ये या कलाप्रेमी तरुण बँकरनं केलेली किमया एकदा पाहाच

Sep 18, 2020, 15:22 PM IST
1/16

जिंकलंस! लॉकडाऊनमध्ये या कलाप्रेमी तरुण बँकरनं केलेली किमया एकदा पाहाच

गेल्या काही महिन्यांपासून कोरोना व्हायरसनं साऱ्या जगभरात थैमान घातलं आहे. सुरुवातीला चीन, इटली, अमेरिका अशा राष्ट्रांमध्ये झपाट्यानं पसरलेली ही लाट पाहता पाहता भारतातही धडकली. 

2/16

जिंकलंस! लॉकडाऊनमध्ये या कलाप्रेमी तरुण बँकरनं केलेली किमया एकदा पाहाच

कोरोनाची लाट भारतात आली आणि भविष्यातील संभाव्य संकटांचा अंदाज घेत सुरुवातीपासूनच काही सावधगिरीची पावलं उचलली गेली. त्यातीलच एक पाऊल होतं लॉकडाऊनचं. सुरुवातीचे काही महिने अगदी सक्तीचं लॉकडाऊन साऱ्या देशानं पाळलं. 

3/16

जिंकलंस! लॉकडाऊनमध्ये या कलाप्रेमी तरुण बँकरनं केलेली किमया एकदा पाहाच

अनेक सेवा नाममात्र प्रमाणात सुरु होत्या. शहरंच्या शहरं भकास पडली होती. निर्मनुष्य वसाहती, रस्ते असं एक विदारक चित्र साऱ्यांचं मन हेलावून जात होतं.   

4/16

जिंकलंस! लॉकडाऊनमध्ये या कलाप्रेमी तरुण बँकरनं केलेली किमया एकदा पाहाच

लॉकडाऊनच्या या काळात अनेकांनी स्वत:च्या कुटुंबालाही पुरेसा वेळ दिला. त्यांची काळजीही घेतली. मुळात हेच अपेक्षित होतं. 

5/16

जिंकलंस! लॉकडाऊनमध्ये या कलाप्रेमी तरुण बँकरनं केलेली किमया एकदा पाहाच

कोरोनापासून दूर राहण्याच्या याच प्रयत्नांमध्ये अनेकांनी हाताशी असलेल्या मोकळ्या वेळाचं सुरेख अशा संधीत रुपांतर केलं. 

6/16

जिंकलंस! लॉकडाऊनमध्ये या कलाप्रेमी तरुण बँकरनं केलेली किमया एकदा पाहाच

एरव्ही वेळ मिळत नाही, म्हणून सतत तक्रार करणाऱ्या अनेक मंडळींनी, नोकरदार वर्गानं आपले छंद जोपासत, कलागुणांना वाव देत स्वत:चीच कला आणखी कशी बहरेल यावर भर दिला. 

7/16

जिंकलंस! लॉकडाऊनमध्ये या कलाप्रेमी तरुण बँकरनं केलेली किमया एकदा पाहाच

अशाच असंख्य मंडळींपैकी एक म्हणजे नितीन सदाशिव नारकर. 

8/16

जिंकलंस! लॉकडाऊनमध्ये या कलाप्रेमी तरुण बँकरनं केलेली किमया एकदा पाहाच

मुळात बँकर असणारा, Axis बँकेत ऑपरेशन हेड या पदावर कार्यरत असणाऱ्या नितीननं आवड म्हणून चित्रकलेला कायम प्राधान्य दिलं. 

9/16

जिंकलंस! लॉकडाऊनमध्ये या कलाप्रेमी तरुण बँकरनं केलेली किमया एकदा पाहाच

पण, काही कारणास्तव आणि दैनंदिन जीवनाच्या या चक्रामध्ये ही कला त्याच्यापासून काहीशी दुरावली होती. पण, मनानं मात्र तो या कलेच्या अवतीभोवतीच होता. 

10/16

जिंकलंस! लॉकडाऊनमध्ये या कलाप्रेमी तरुण बँकरनं केलेली किमया एकदा पाहाच

परिणामी तब्बल १०-१५ वर्षांनंतर त्यानं पुन्हा एकदा मिळालेल्या या वेळेला सदकारणी लावत चित्रकला पुन्हा सुरु केली. अधिक जिद्दीनं आणि चिकाटीनं त्यानं कुंचल्यातील रंग, मनातील विचार, डोक्यातील कल्पना आणि अर्थातच त्याच्यात दडलेल्या कलेला मोकळं केलं. 

11/16

जिंकलंस! लॉकडाऊनमध्ये या कलाप्रेमी तरुण बँकरनं केलेली किमया एकदा पाहाच

एका ध्यासानं झपाटलेल्या या कलाकारानं कॅन्व्हास, कागदावर अशा काही छटा ओढल्या की पाहता पाहता, अनेकांचेच डोळे दीपले. 

12/16

जिंकलंस! लॉकडाऊनमध्ये या कलाप्रेमी तरुण बँकरनं केलेली किमया एकदा पाहाच

व्यक्तीचित्रांपासून ते अगदी देवदेवतांच्या चित्रांपर्यंत प्रत्येक चित्रात त्यानं स्वत:ला झोकून दिलं. 

13/16

जिंकलंस! लॉकडाऊनमध्ये या कलाप्रेमी तरुण बँकरनं केलेली किमया एकदा पाहाच

स्केच, फ्री हँड पेंटींगमधले बारकावे टीपण्यासाठी कमालीची आकलनशक्ती आणि काहीतरी नवं शिकण्यासाठी आणि ते अगदी योग्य पद्धतीनं शिकण्यासाठी नितीन सातत्यानं प्रयत्न करत राहिला. 

14/16

जिंकलंस! लॉकडाऊनमध्ये या कलाप्रेमी तरुण बँकरनं केलेली किमया एकदा पाहाच

सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची ही कला परिचयातील मंडळींपर्यंत पोहोचली आणि यापुढंही पोहोचत राहिल. 

15/16

जिंकलंस! लॉकडाऊनमध्ये या कलाप्रेमी तरुण बँकरनं केलेली किमया एकदा पाहाच

सध्या तो या कलेच्या प्रवाहातच स्वत:ला झोकून देत आहे. सोबतच नोकरीची जबाबदारीही पार पाडत आहे. या साऱ्यामध्ये एक कलाकार म्हणून आता मात्र तो या कलेशी दुरावा कधीच करणार नाही, असंसुद्धा तितक्याच आत्मियतेनं सांगतो. 

16/16

जिंकलंस! लॉकडाऊनमध्ये या कलाप्रेमी तरुण बँकरनं केलेली किमया एकदा पाहाच

नितीननं लॉकडाऊनकाळात त्याच्यातील कलाकाराला आणि कलागुणांना वाव देत साकारलेला हा कलेचा नजराणा पाहून, क्या बात!, अशीच उत्स्फूर्त प्रतिक्रिया सध्या अनेकजण देत आहेत. (सर्व छायाचित्रे- नितीन सदाशिव नारकर; इन्स्टाग्राम- @nitinsadashivra)