मुलींनी बिनधास्तपणे करायला हव्यात या ३ गोष्टी

लोक काय म्हणतील, लोक काय विचार करतील? हे प्रश्न आपल्याला नेहमीच सतावत असतात. 

Updated: May 24, 2018, 05:49 PM IST
मुलींनी बिनधास्तपणे करायला हव्यात या ३ गोष्टी

मुंबई : लोक काय म्हणतील, लोक काय विचार करतील? हे प्रश्न आपल्याला नेहमीच सतावत असतात. यामुळेच अनेकदा आपण निर्णय घेताना कचरतो. मुलींच्या बाबतीत हे नेहमीच होते. आपण हे पाऊल उचलले तर लोक काय म्हणतील, काय विचार करतील हा विचार त्यांना सत सतावत असतो. मात्र प्रत्येक वेळी लोकांच्या मनाचा विचार कऱण्याची गरज नाहीये. अनेकदा तुम्हाला जे वाटते ते करावे. बिनधास्तपणे काही गोष्टी कराव्यात. ज्यामुळे त्या न केल्याचे दु:ख नंतर होणार नाही. मुलींनी खालील तीन गोष्टी बिनधास्तपणे कराव्यात

१. खावेसे वाटेल ते बिनधास्त खावे - अनेकदा लोक खाण्यापिण्याच्या बाबत अनेक सवाल उपस्थित करतात. हे का खावे, इतकंच का खायचं, जर कमी खात जा. मात्र लोकांच्या या वांरवार केल्या जाणाऱ्या सूचनांकडे दुर्लक्ष करा. लोक आहेत ते तर बोलणारंच. मात्र त्यासाठी तुम्ही तुमचं मन मारण्याची गरज नाहीये. तुम्हाला हवे ते बिनधास्त खा. ज्याला जितकी भूक लागते तितकी ती व्यक्ती खाते. यासाठी लाजण्याची काय गरज.

२. एखाद्या मुलीच्या हाता-पायांवर केस असल्यास काहींना ते किळसवाणे वाटते. किती घाणेरडी आहे ही...साधं वॅक्सही करता येत नाही का? अशा प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिले जाते. मात्र तुम्हाला जर वॅक्स करणे जमलं नसेल तर त्यात लाजायचे काय?

३. घराचे सामान आणण्यासाठी बाजारातच जाण्याची गरज नसते. तुम्ही घरबसल्या सामान ऑर्डर करु शकता. तुमचाही काही खाजगी वेळ असतो. घरातील सामान वा वाणसामान तुम्ही ऑनलाईनही मागवू शकता.