1/13
अग्निपथ
आत्तापर्यंत कॅट सगळ्यांत जास्त मागणी असणारी बॉलिवूडमधील हिरोईन बनली. प्रत्येक चित्रपट निर्मात्याला कतरिनानं आपल्या चित्रपटात छोटासा तरी रोल करावा... मग, तीन ते चार मिनिटांचं आयटम साँग का असेना... यासाठी धडपड सुरू होती. चित्रपटनिर्माता करण जोहरही त्यापैकी एक... अर्थातच, ‘अग्निपथ’ या आपल्या महत्त्वकांक्षी प्रोजेक्टमध्ये त्यानं कतरिनाला एक खास ‘आयटम साँग’ करायची ऑफर दिली... ‘चिकनी चमेली’ पडद्यावर झळकली आणि अनेकांची झोप उडाली.
2/13
3/13
जिंदगी ना मिलेगी दोबारा
एक छोटासा रोल... तोही ‘डायव्हींग इन्स्ट्रक्टर’चा... पण, या चित्रपटातील बाईक चालवणारी कतरिना मुख्य अभिनेत्यांइतकाच भाव खाऊन गेली. झोया अख्तर दिग्दर्शित ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटानं सगळ्यांनाच मंत्रमुग्ध करून ठेवलं. ऋतिक रोशनबरोबर रोमान्स करताना दिसणारी कतरिनाचा आत्मविश्वास वाखाणण्याजोगा होता.
4/13
तीस मार खान
तिच्या आवडत्या सहकलाकाराबरोबर... अक्षय कुमारसोबत तिला काम करण्याची पुन्हा एकदा संधी दिली फराह खान दिग्दर्शित ‘तीस मार खान’नं... हा चित्रपट पडेल ठरला असला तरी या चित्रपटातली एक गोष्ट सगळ्यांच्याच लक्षात राहिलीय... ती म्हणजे ‘शीला की जवानी’ हे कतरिना कैफवर चित्रीत झालेलं आयटम साँग... या गाण्यामुळेच आणि कतरिनामुळेच हा चित्रपट चालला, याबद्दल कुणाचंही दुमत असणार नाही. या गाण्यावर थिरकणाऱ्या कतरिनानं अनेक अभिनेत्रींना मागे टाकलं होतं.
5/13
राजनीती
तिच्या अभिनयाचा आत्तापर्यंतचा प्रवास बघता दिग्दर्शक प्रकाश झा यांनी कतरिनासमोर राजनीतीच्या माध्यमातून आणखी एक आव्हान निर्माण करून दिलं. ‘महाभारता’वर आधारित हा चित्रपट सध्याच्या राजकारण अधोरेखित करत होता. एका कणखर महिलेची भूमिका निभावण्याची जबाबदारी आता कतरिनावर पडली होती. कतरिनानं ही जबाबदारी देखील मोठ्या खुबीनं पेलली. एक विदेशी अभिनेत्री असलेल्या कतरिनाला या चित्रपटातील हिंदी संवाद एका राजकारणीच्या भूमिकेतून कसे पेलणार? हा अनेकांच्या मनात प्रश्न होता. पण, चित्रपट पडद्यावर झळकला आणि कतरिनाची या भूमिकेमागची मेहनत सर्वांच्याच नजरेत भरून उरली. तिच्या संवादफेकीनं... तेही शुद्ध हिंदीत... अनेकांना आश्चर्याचा झटका दिला होता.
6/13
अजब प्रेम की गझब कहानी
या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदा अभिनेता रणबीर कपूर आणि कतरिनाची जोडी प्रेक्षकांसमोर आली. राजकुमार संतोषी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला ‘अजब प्रेम की गझब कहानी’ हा सिनेमा म्हणजे अवखळ हास्याचा उत्तम नमुना होता. या चित्रपटातून एका ख्रिश्चन मुलीची अवखळ भूमिकाही कतरिनानं उत्तम रितीनं पार पाडली.
7/13
न्यू यॉर्क
न्यू यॉर्कमधली कतरिनाची भूमिका तिनं आत्तापर्यंत निभावलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी होती. कबीर खान दिग्दर्शित ‘न्यू यॉर्क’ सिनेमातून कतरिनाची अभिनय क्षमता पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर मोठ्या ताकदीनं दिसून आली. अर्थातच तिच्या लूकनं पुन्हा एकदा सगळ्यांचेच डोळे खिळवून ठेवले होते. ‘चित्रपटातील सजावटीची बाहुली’ म्हणून टीका करणाऱ्या टीकाकारांना तिनं चांगलंच प्रत्युत्तर दिलं होतं.
8/13
सिंग इज किंज
या चित्रपटातली कतरिना आणि तिच्यावर चित्रीत झालेली गाणी खूपच लोकप्रिय ठरली. ‘जी करदा...’ आणि ‘तेरी ओर’ गाताना प्रत्येकाच्या डोळ्यासमोर होती ती कतरिनाच... याही चित्रपटाची जमेची एक बाजू म्हणजे अक्षय कुमार आणि कतरिनाची जोडी. त्यामुळे हा सिनेमा ब्लॉकबस्टर फिल्म्सच्या यादीत जाऊन बसला. बॉक्स ऑफिसवर कतरिनाचं हे सहावं यश ठरलं. २००८ या वर्षात सर्वात जास्त कमाई करणाऱ्या फिल्म्समध्ये या सिनेमाचा तिसरा क्रमांक होता.
9/13
रेस
‘वेलकम’च्या यशानंतर अब्बास मस्तान यांनी कतरिनाला ‘रेस’ या चित्रपटासाठी कतरिनाला एक नवीन ऑफर दिली होती. या चित्रपटात कतरिनाला नकारात्मक भूमिका पार पाडायची होती. एव्हाना हिंदीची बाराखडी गिरवणाऱ्या कतरिनासाठी हे एक आव्हानच होतं. पण, पुन्हा एकदा कतरिनानं आपला जलवा दाखवला आणि ‘जरा जरा टच मी...’ या गाण्यावर थिरकणारी कतरिना सगळ्यांच्याच अपेक्षेस पात्र ठरली. या चित्रपटानंतर भारतातल्या प्रत्येक बॅचलरच्या मनात घर कतरिनानं आपलं बस्तान बसवलं होतं.
10/13
वेलकम
अक्षय आणि कतरिनाची जोडीनं पुन्हा एकदा ‘वेलकम’च्या माध्यमातून पडद्यावर एकच धमाल उडवून दिली. चित्रपट समीक्षकांनी या चित्रपटाला ‘टुकार’ असं विशेषण दिलं असतानाही या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवली होती. या चित्रपटानंतर बॉलिवूडमधल्या टॉपच्या अभिनेत्रींमध्ये कतरिनाचंही नाव दिसू लागलं. मूळ ब्रिटीश असलेल्या कतरिनानं आत्तापर्यंत सगळ्याच चित्रपटनिर्मात्यांचं लक्ष आपल्याकडे खेचून घेतलं होतं.
11/13
नमस्ते लंडन
‘ऑनस्क्रीन’ फारशी कमाल न दाखवताही आपल्या मोहक सौंदर्याच्या जोरावर कतरिनानं अनेकांना मोहिनी घातली होती. पण, तिच्यातली अभिनयक्षमता पहिल्यांदा ठळ्ळक झाली ती ‘नमस्ते लंडन’ या चित्रपटानंतर... विपूल शहा निर्मित ‘नमस्ते लंडन’ या २००७ साली पडद्यावर झळकलेल्या चित्रपटातूनच कतरिनाच्या करिअरची खरी सुरुवात झाली, असं अनेक चित्रपट समीक्षकांना वाटतं. या चित्रपटानं बराच गल्ला गोळा केलाच सोबतच हा चित्रपट टीकाकारांच्या पसंतीलाही पात्र ठरला. या चित्रपटात दिसलेली कतरिना आणि अक्षय कुमारची जोडीही अनेकांना भावली आणि नंतर या जोडीनं बॉलिवूडमध्ये एकच धमाल उडवून दिली.
12/13
मैंने प्यार क्यों किया
‘बॉक्स ऑफिस’वर या चित्रपटानं किती गल्ला गोळा केला यापेक्षा ‘मैंने प्यार क्यों किया’ हा सिनेमा लक्षात राहिला तो, कतरिना कैफ आणि सलमान खान या जोडगोळीच्या ऑनलाईन केमिस्ट्रीमुळं... यानंतर चर्चा सुरू झाल्या त्या कतरिना आणि सलमान यांच्या जवळकिच्या संबंधांचे... यामुळे गॉसिप्स मॅगझीनच्या हाती तर मोठा खजानाच हाती लागला होता. गोष्ट त्यांच्या लग्नापर्यंत येऊन ठेपली होती पण काही काळानंतर कतरिनानं स्वत:च या सर्व गोष्टी अफवा असल्याचं स्पष्ट केलं. पण, अजूनही कतरिनाच्या मनात सलमानबद्दल एक हळवा कोपरा आहे, हे तर ती स्वत:ही अमान्य करताना दिसत नाही, हे विशेष.
13/13