1/6
स्पष्ट नाखूशी...
अमेरिकन जिमनॅस्ट मायकेला मारोनी हिनं वॉल्ट फायनल मॅचमध्ये रजत पदक मिळवलं... आणि हेच पदक घेताना जेव्हा ती पोडीयमवर आली तेव्हा तिचा काढला गेलेला एक फोटो नेटिझन्सनं खूपच लाईक केलाय. या फोटोतून पदक स्वीकारताना ती नाखूश असल्याचं तिच्या चेहऱ्याच्या हावभावांवरून स्पष्ट दिसून येतंय. ‘मायकेला इज नॉट इम्प्रेस्ड’ या नावाचा ब्लॉगही तितकाच लोकप्रिय झाला.
यानंतर नोव्हेंबर २०१२ मध्ये तिनं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची व्हाईट हाऊसवर जाऊन भेट घेतली. तिची ही अदा ओबामांनाही इतकी आवडली होती की ओबामांनीही तिच्याचसारखा चेहरा केला.
2/6
कोनी २०१२
युगांडामध्ये सुरू असलेला संघर्ष या व्हिडिओमध्ये चित्रीत करण्यात आलाय. एका ‘इनव्हिझिबल चिल्ड्रन’ नावाच्या सामाजिक संघटनेनं लॉर्डस् रेसिसन्ट आर्मी (LRA)चा एक नेता युसूफ कोनी याच्या अटकेची दृश्यं या व्हिडिओमध्ये दाखविली आहेत.
केवळ सहा दिवसांत १०० करोडचा टप्पा या व्हिडिओनं पार केला होता. इतक्या झपाट्यानं सोशल मिडीयाच्या साहाय्यानं इतक्या लोकांपर्यंत पोहचणारा हा पहिलाच व्हिडिओ ठरला.
3/6
ओबामा-मिशेल यांची घट्ट मिठी
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावर पुन्हा एकदा संधी मिळाली आणि बराक ओबामांनी सर्व काही विसरून आपली पत्नी मिशेल यांना मारलेली घट्ट मिठी... आणि एक क्लिक... होय, हाच फोटो नेटीझन्ससाठी ‘लव्ह सिम्बॉल’ही बनलाय.
ट्विटरवर हा फोटो आत्तापर्यंत सर्वात जास्त वेळा शेअर केलेला फोटो ठरलाय. जस्टीन बायबर आणि त्याच्या चेन फास्ट फूडलाही या फोटोनं मागे टाकलं. एव्हढंच नाही तर फेसबुकवरदेखील याच फोटोनं आत्तापर्यंतचे सर्वात जास्त म्हणजेच जवळजवळ ४.५ करोड लाईक्स मिळवलेत.
स्काऊट नावाच्या फोटोग्राफरनं हा क्षण टिपला होता, त्याच्या म्हणण्यानुसार, ‘या फोटोमधून मिशेल आणि ओबामांचं एकमेकांबद्दलचं प्रेम आणि आदर दिसून येतोय.’
4/6
‘आजोबा’ रॅम्प वॉकवर...
आपल्या वयाची ७२ वर्ष पूर्ण करणारे एका चीनी आजोबांना ‘सुपरमॉडेल’ तरुणीच्या वेशात रॅम्पवॉकवर चालताना पाहून अनेकांना हायसं वाटलं होतं. खऱ्याखुऱ्या सुपरमॉडेल तरुणीही या आजोबांसमोर फिक्या वाटत होत्या. आपल्या नातीच्या रिटेल स्टोअरसाठी या आजोबांनी हा अवतार धारण केला होता.
७२ उन्हाळे-पावसाले बघितलेल्या लियू झिंनपिंग यांनी आपल्या नातीच्या यूकायूच्या पब्लिसिटीसाठी केलेली ही एक गंमत होती. पण यामुळे ‘यूकायू’सोबत आजोबांच्या या अवतारालाही देशोदेशीच्या नेटिझन्सनं उचलून धरलं.
5/6
गन्गनम स्टाईल
एका व्हिडिओमध्ये एक जाडा... साऊथ कोरिअन्ससारखा दिसणारा माणूस... घोड्यावर बसल्याप्रमाणे नाचतोय... आणि याच स्टाईलला नाव दिलं गेलं गन्गनम स्टाईल... रॅपर पीएसवायच्य या गन्गनम स्टाईलनं यू ट्यूबवर सर्वाधिक म्हणजेच जवळजवळ २२० करोडच्या आसपास हिटस् मिळवल्यात आणि आकड्यांची ही बेरीज अजूनही सुरूच आहे.
नोव्हेंबर २०१२ मध्ये या व्हिडिओची क्रेझ टीपेला पोहचलेली दिसली होती. भारतातही जो पाहावा तो गन्गनम स्टाईलवर फिदा झालेला दिसत होता. या व्हिडिओमध्ये असं काय होतं, हे काही आता वेगळं सांगायची गरज राहिलेली नाहीय. अर्थातच तुम्ही तो पाहिला असेल. त्यासाठी तुम्हाला कोरियन भाषा येत असल्याची गरज भासली नसेल. पण, तरीही हे गाणं आणि गायकाला त्याच्या साथीदारांनी दिलेली कोरस त्यानंतरही बराच काळ तुमच्या डोक्यात ‘गन्गनम स्टाईल’नं दंगा करत असेल.
आणि जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्कीच तुम्ही काही तरी मिस् करताय...
6/6