ICC T-20 - घातक फलंदाज

Sep 18, 2012, 22:04 PM IST
1/8

ब्रँडन मॅकलमब्रँडन मॅकलम हा न्यूझीलंडचा खतरनाक आघाडीचा फलंदाज टी-२०मध्ये धडाकेबाज फलंदाजीसाठी नावाजलेला आहे. टी-२०मध्ये त्याचा ३४ चा अव्हरेज आहे. कोणत्याही गोलंदाजीला फोडून काढण्याची कमाल तो करू शकतो. एक शतक आणि आठ अर्धशतक त्याच्या नावावर आहेत.

ब्रँडन मॅकलम
ब्रँडन मॅकलम हा न्यूझीलंडचा खतरनाक आघाडीचा फलंदाज टी-२०मध्ये धडाकेबाज फलंदाजीसाठी नावाजलेला आहे. टी-२०मध्ये त्याचा ३४ चा अव्हरेज आहे. कोणत्याही गोलंदाजीला फोडून काढण्याची कमाल तो करू शकतो.

एक शतक आणि आठ अर्धशतक त्याच्या नावावर आहेत.

2/8

तिलकरत्ने दिलशानस्फोटक फलंदाज म्हणून दिलशानची ओळख आहे. त्याच्या अनोख्या पल्लू स्कूपमुळे तो जबरदस्त फेमस झाला. त्याच्या या फटक्यामुळे अनेक बॉलर्सला कशी गोलंदाजी करावी हेच कळत नाही. त्याचा २००९मधील फॉर्म जबरदस्त होता. गेल्या काही वर्षांपासून दिलशान श्रीलंकन क्रिकेटचा महत्त्वाचा घटक बनला आहे. तसेच त्याचे क्षेत्ररक्षणही श्रीलंकेच्या विजयात अनेकदा मोलाचे ठरते. त्याची गोलंदाजीही त्याचे अष्टपैलूत्व सिद्ध करते. दिलशानला यंदा घरात खेळण्याचा फायदा मिळणार आहे.

तिलकरत्ने दिलशान


स्फोटक फलंदाज म्हणून दिलशानची ओळख आहे. त्याच्या अनोख्या पल्लू स्कूपमुळे तो जबरदस्त फेमस झाला. त्याच्या या फटक्यामुळे अनेक बॉलर्सला कशी गोलंदाजी करावी हेच कळत नाही. त्याचा २००९मधील फॉर्म जबरदस्त होता.

गेल्या काही वर्षांपासून दिलशान श्रीलंकन क्रिकेटचा महत्त्वाचा घटक बनला आहे. तसेच त्याचे क्षेत्ररक्षणही श्रीलंकेच्या विजयात अनेकदा मोलाचे ठरते. त्याची गोलंदाजीही त्याचे अष्टपैलूत्व सिद्ध करते.

दिलशानला यंदा घरात खेळण्याचा फायदा मिळणार आहे.

3/8

एबी डिव्हिलिअर्सदक्षिण आफ्रिकेचा हा धडाकेबाज फलंदाज यंदाच्या आयपीएलमध्ये बंगळुरूकडून खेळताना त्याने अनेक सामन्यांमध्य एकहाती विजय मिळवून दिला आहे. आपल्या धडाकेबाज खेळीने तो प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात नेहमी यशस्वी होतो. आयपीएलच्या यंदाच्या सिझनमध्ये त्याने आपल्याच संघातील डेल स्टेनला एका षटकात १७ धावा फटकावण्याची किमया प्रेक्षकांच्या अजून स्मरणात आहे. चेंडूला अत्यंत सफाईदारपणे टोलविण्याची किमया डिव्हिलिअर्स करू शकतो. ३७ सामने खेळलेल्या डिव्हिलअर्सने यंदा आपला फॉर्म कायम राखला तर संघाला जेतेपद मिळू शकते.

एबी डिव्हिलिअर्स

दक्षिण आफ्रिकेचा हा धडाकेबाज फलंदाज यंदाच्या आयपीएलमध्ये बंगळुरूकडून खेळताना त्याने अनेक सामन्यांमध्य एकहाती विजय मिळवून दिला आहे. आपल्या धडाकेबाज खेळीने तो प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात नेहमी यशस्वी होतो.

आयपीएलच्या यंदाच्या सिझनमध्ये त्याने आपल्याच संघातील डेल स्टेनला एका षटकात १७ धावा फटकावण्याची किमया प्रेक्षकांच्या अजून स्मरणात आहे.

चेंडूला अत्यंत सफाईदारपणे टोलविण्याची किमया डिव्हिलिअर्स करू शकतो. ३७ सामने खेळलेल्या डिव्हिलअर्सने यंदा आपला फॉर्म कायम राखला तर संघाला जेतेपद मिळू शकते.

4/8

उमर अकमलउमर अकमलच्या उपस्थितीने पाकिस्तानची मध्य फळी चांगलीच मजबूत झाली आहे. त्याने आपल्या एकट्याच्या जीवावर अनेक सामन्यात पाकिस्तानला विजय मिळवून दिला आहे. शाहीद आफ्रिदीच्या खराब फॉर्ममुळे पाकिस्तान अकमलवर खूपच अवलंबून आहे. अकमलने आपल्या तिसऱ्या वन डेमध्ये शतक झळकावले होते. तर टी-२०मध्ये त्याच्या नावावर ४ अर्धशतक आहेत. दबावाच्या परिस्थितीत खेळी करण्याचा त्याचा हातखंडा आहे. पाकिस्तान दुसऱ्यांदा विश्व विजेता होण्यासाठी अकमलची खेळी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

उमर अकमल

उमर अकमलच्या उपस्थितीने पाकिस्तानची मध्य फळी चांगलीच मजबूत झाली आहे. त्याने आपल्या एकट्याच्या जीवावर अनेक सामन्यात पाकिस्तानला विजय मिळवून दिला आहे. शाहीद आफ्रिदीच्या खराब फॉर्ममुळे पाकिस्तान अकमलवर खूपच अवलंबून आहे.

अकमलने आपल्या तिसऱ्या वन डेमध्ये शतक झळकावले होते. तर टी-२०मध्ये त्याच्या नावावर ४ अर्धशतक आहेत. दबावाच्या परिस्थितीत खेळी करण्याचा त्याचा हातखंडा आहे.

पाकिस्तान दुसऱ्यांदा विश्व विजेता होण्यासाठी अकमलची खेळी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

5/8

इऑन मॉर्गनटी-२० च्या सध्याच्या रँकिंगमध्ये इऑन मॉर्गन याने पहिला क्रमांक पटकावला आहे. आर्यलंडमध्ये जन्मलेला हा इंग्लिशमन इनोव्हेटिव्ह फटके मारण्यात पटाईत आहे. त्यामुळेच पॉल कॉलिंगवुडची रिप्लेसमेंट म्हणून त्याने इंग्लिश संघात आपले स्थान कायम ठेवले आहे. मॉर्गने टी-२०मध्ये ३८ चा जबरदस्त अव्हरेज ठेवला आहे. पीटरसन नसलेल्या इंग्लड संघात मॉर्गनचे स्थान महत्त्वाचे आहे.

इऑन मॉर्गन


टी-२० च्या सध्याच्या रँकिंगमध्ये इऑन मॉर्गन याने पहिला क्रमांक पटकावला आहे. आर्यलंडमध्ये जन्मलेला हा इंग्लिशमन इनोव्हेटिव्ह फटके मारण्यात पटाईत आहे. त्यामुळेच पॉल कॉलिंगवुडची रिप्लेसमेंट म्हणून त्याने इंग्लिश संघात आपले स्थान कायम ठेवले आहे.

मॉर्गने टी-२०मध्ये ३८ चा जबरदस्त अव्हरेज ठेवला आहे. पीटरसन नसलेल्या इंग्लड संघात मॉर्गनचे स्थान महत्त्वाचे आहे.

6/8

डेव्हिड वॉर्नरवॉर्नर हा गेल आणि सेहवाग प्रमाणे अत्यंत खतरनाक फलंदाज आहे. वॉर्नर जेव्हा फॉर्मात असतो त्यावेळी गोलंदाजाना पळता भूई थोडी पडते.वॉर्नर हा टी-२० स्पेशालिस्ट म्हणून समोर आला असला तरी त्यांनी आपले अस्तित्व तीनही फॉर्मटमध्ये सिद्ध केले आहे. परंतु, सेहवाग प्रमाणे यानेही टी-२० मध्ये अद्याप शतक ठोकले नाही. वॉर्नर हा स्विच हीट मारण्यातही हातखंडा राखतो. यंदा पाकिस्तान विरोधात वन डेमध्ये अपयशी ठरला. परंतु या वर्ल्ड कपमध्ये त्याच्यावरही नजरा असणार आहे.

डेव्हिड वॉर्नर


वॉर्नर हा गेल आणि सेहवाग प्रमाणे अत्यंत खतरनाक फलंदाज आहे. वॉर्नर जेव्हा फॉर्मात असतो त्यावेळी गोलंदाजाना पळता भूई थोडी पडते.
वॉर्नर हा टी-२० स्पेशालिस्ट म्हणून समोर आला असला तरी त्यांनी आपले अस्तित्व तीनही फॉर्मटमध्ये सिद्ध केले आहे. परंतु, सेहवाग प्रमाणे यानेही टी-२० मध्ये अद्याप शतक ठोकले नाही.

वॉर्नर हा स्विच हीट मारण्यातही हातखंडा राखतो. यंदा पाकिस्तान विरोधात वन डेमध्ये अपयशी ठरला. परंतु या वर्ल्ड कपमध्ये त्याच्यावरही नजरा असणार आहे.

7/8

वीरेंद्र सेहवागटेस्ट असो, वन डे असो किंवा टी-२० सेहवाग हा क्रिकेटच्या तीनही प्रकारांमध्ये गोलंदाजींची भंबेरी उडविण्याची क्षमता राखतो. सेहवागची आपली वेगळीच स्टाइल आहे. हात आणि डोळ्यांचा समन्वय साधून तो चेंडू सीमापार करण्याचा सपाट लावतो.भारताने जिंकलेल्या २००७ च्या विश्व चषकात त्याने गंभीरच्या साथीने महत्त्वपूर्ण भागिदारी केल्या आहेत. तसेच या वर्षातही त्याने हा धडाका कायम ठेवला आहे. भारताचा जबरदस्त सुरूवात करून देण्यासाठी सेहवागची भूमिका महत्त्वाची आहे. सेहवागने २०१२मध्ये झालेल्या आयपीएल सामन्यांमध्ये त्याने लागोपाठ पाच अर्धशतक झळकावले आहेत. परंतु, तो टी-२०मध्ये अद्याप शतक झळकवू शकला नाही. सराव सामन्यात त्याचा फॉर्म पाहता तो यंदा टी-२०मध्ये शतक झळकावू शकतो.

वीरेंद्र सेहवाग
टेस्ट असो, वन डे असो किंवा टी-२० सेहवाग हा क्रिकेटच्या तीनही प्रकारांमध्ये गोलंदाजींची भंबेरी उडविण्याची क्षमता राखतो. सेहवागची आपली वेगळीच स्टाइल आहे. हात आणि डोळ्यांचा समन्वय साधून तो चेंडू सीमापार करण्याचा सपाट लावतो.
भारताने जिंकलेल्या २००७ च्या विश्व चषकात त्याने गंभीरच्या साथीने महत्त्वपूर्ण भागिदारी केल्या आहेत. तसेच या वर्षातही त्याने हा धडाका कायम ठेवला आहे. भारताचा जबरदस्त सुरूवात करून देण्यासाठी सेहवागची भूमिका महत्त्वाची आहे.

सेहवागने २०१२मध्ये झालेल्या आयपीएल सामन्यांमध्ये त्याने लागोपाठ पाच अर्धशतक झळकावले आहेत. परंतु, तो टी-२०मध्ये अद्याप शतक झळकवू शकला नाही.

सराव सामन्यात त्याचा फॉर्म पाहता तो यंदा टी-२०मध्ये शतक झळकावू शकतो.

8/8

क्रिस गेलरन मशिन... धावांचा पाऊस पाडणारे रन मशिन.... प्रतिस्पर्धी टीमच्या गोलंदाजांना आपण क्रीस गेलबद्दल विचारलं तर त्यांच्या तोंडून हे उत्तर येईल... क्रिस गेल रन मशिन....क्रिस गेलला रेकॉर्ड करणे आवडते. पहिल्या टी-२० विश्व चषकाच्या शुभारंभाच्या सामन्यात गेलने तेच केले आणि दक्षिण आफ्रिकेविरोधातील या सामन्यात तडाखेबंद फलंदाजी करत त्याने ११७ धावा कुटल्या आणि तो बनला टी-२० सामन्यात शतक झळकावणारा पहिला क्रिकेटपटू....खराब फॉर्म आणि वेस्ट इंडिज क्रिकेट सोबत झालेला वादानंतर आता क्रिस गेल आता पुन्हा सज्ज झाला आहे, आपली शस्त्र पारजून.... त्याने गेल्या दोन आयपीएल सिझनमध्येही धडाकेबाज कामगिरी केली आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात क्रिस गेलची जबरदस्त कामगिरी आहे. लसिथ मलिंगाप्रमाणे टी-२०मध्ये मनोरंजन करण्याची ताकद गेलमध्येही आहे. गेलने आतापर्यंत २३ सामन्यांत देशाचे प्रतिनिधीत्व केले आहे, परंतु, त्याचा १४३ चा जबरदस्त स्ट्राइक रेट आहे. गेल यंदाच्या वर्ल्ड कपमध्येही चमत्कार घडवू शकतो.

क्रिस गेल
रन मशिन... धावांचा पाऊस पाडणारे रन मशिन.... प्रतिस्पर्धी टीमच्या गोलंदाजांना आपण क्रीस गेलबद्दल विचारलं तर त्यांच्या तोंडून हे उत्तर येईल... क्रिस गेल रन मशिन....

क्रिस गेलला रेकॉर्ड करणे आवडते. पहिल्या टी-२० विश्व चषकाच्या शुभारंभाच्या सामन्यात गेलने तेच केले आणि दक्षिण आफ्रिकेविरोधातील या सामन्यात तडाखेबंद फलंदाजी करत त्याने ११७ धावा कुटल्या आणि तो बनला टी-२० सामन्यात शतक झळकावणारा पहिला क्रिकेटपटू....

खराब फॉर्म आणि वेस्ट इंडिज क्रिकेट सोबत झालेला वादानंतर आता क्रिस गेल आता पुन्हा सज्ज झाला आहे, आपली शस्त्र पारजून....

त्याने गेल्या दोन आयपीएल सिझनमध्येही धडाकेबाज कामगिरी केली आहे.

क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात क्रिस गेलची जबरदस्त कामगिरी आहे. लसिथ मलिंगाप्रमाणे टी-२०मध्ये मनोरंजन करण्याची ताकद गेलमध्येही आहे. गेलने आतापर्यंत २३ सामन्यांत देशाचे प्रतिनिधीत्व केले आहे, परंतु, त्याचा १४३ चा जबरदस्त स्ट्राइक रेट आहे. गेल यंदाच्या वर्ल्ड कपमध्येही चमत्कार घडवू शकतो.