तिरंग्याच्या रंगात फेसबुक प्रोफाईल फोटो बदलण्या अगोदर हे प्रश्न स्वत:ला विचाराच...

ला विचाराच...

Sep 29, 2015, 11:59 AM IST
1/6

'डिजीटल इंडिया'द्वारे ५०० रेल्वे स्टेशन्सवर मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 'नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क'चा विस्तार करून ६० हजार गावांनाही मोफत इंटरनेटची सुविधा मिळेल असं सांगण्यात येतंय. यासाठी गुगलची मदत घेण्यात आलीय. पण, 'गूगल'च का? आपल्या देशातील शहरांत वाय-फाय उपलब्ध करून देण्यासाठी आपल्या देशात इंजिनिअर्सची कमतरता आहे?

2/6

मोदींचा 'डिजीटल इंडिया' हा अजेंडा कौतुकास्पद आहे... जबाबदार, पारदर्शक, कार्यक्षम शासननिर्मितीसाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा आहेच... पण, यासाठी सगळ्या नेटिझन्सच्या प्रायव्हसीचा भंग होणार आहे का? मोदींचा 'डिजीटल इंडिया' हा कार्यक्रम पेपरवर्क कमी करून सगळे डॉक्युमेंटस ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात मदत करतील. पण, यामुळे तुमचा कोणतीही डिजीटल माहिती सुरक्षित असेल? याची खात्री सरकार कशी देणार? कारण, यामुळे सरकारला तुमची कोणतीही माहिती तुमच्या परवानगीशिवाय सहज उघडून पाहता येणार आहे.

3/6

इंटरनेट जगतावर राज्य गाजवण्यासाठी मार्क झुकरबर्गचा अजेंडा असलेल्या 'internet.org'ला आपण आंधळेपणानं पाठिंबा देतोय का?

इंटरनेट जगतावर राज्य गाजवण्यासाठी मार्क झुकरबर्गचा अजेंडा असलेल्या 'internet.org'ला आपण आंधळेपणानं पाठिंबा देतोय का?

4/6

तुमचा फेसबुक फोटो तिरंग्याच्या रंगात बदलून तुम्ही 'डिजीटल इंडिया'ला पाठिंबा देताय म्हणजे नेमकं काय करताय? फेसबुकवर फोटो बदलून आपला देश 'डिजीटल इंडिया' होणार आहे का? मोठ्या कंपन्यांचा असा कोणता फोर्स आहे जो तुम्हाला 'internet.org' वापरण्यासाठी प्रवृत्त करतोय?

5/6

भारतासहीत संपूर्ण जगभर गाजत असलेल्या 'नेट न्यूट्रॅलिटी' सोबतच फेसबुकचा अजेंडा असलेला 'इंटरनेट डॉट ओआरजी'चा मुद्दाही बराच गाजतोय. 

या सगळ्या तांत्रिक गोष्टी जरी एखाद्याला समजत नसतील.... तरी, या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही आपला फेसबुकचा प्रोफाईल फोटो तिरंग्याच्या रंगात बदलण्या अगोदर हे काही प्रश्न स्वत:ला विचारायलाच हवेत.... 

भारतासहीत संपूर्ण जगभर गाजत असलेल्या 'नेट न्यूट्रॅलिटी' सोबतच फेसबुकचा अजेंडा असलेला 'इंटरनेट डॉट ओआरजी'चा मुद्दाही बराच गाजतोय.  या सगळ्या तांत्रिक गोष्टी जरी एखाद्याला समजत नसतील.... तरी, या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही आपला फेसबुकचा प्रोफाईल फोटो तिरंग्याच्या रंगात बदलण्या अगोदर हे काही प्रश्न स्वत:ला विचारायलाच हवेत.... 

6/6

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एका मोठ्या सोशल वेबसाईटचा - फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग एकमेकांची भेट घेतात... तेव्हा साहजिकच अनेक भुवया उंचावतात. 

त्यानंतर, नमोंच्या 'डिजीटल इंडिया' या कॅम्पेनसाठी मार्क झुकरबर्ग धावून येतो आणि तिरंग्याच्या रंगात स्वत:चा फोटो बदलून टाकतो... 'फेसबुक'वासियांनाही असंच करण्याचं आणि 'डिजीटल इंडिया'ला पाठिंबा देण्याचं आवाहन करतो. नेटिझन्सही लगेचच गावागावांत इंटरनेट उपलब्ध होऊ शकेल यासाठी मोठ्या मनानं 'डिजीटल इंडिया'ला पाठिंबा दर्शवण्यासाठी आपला प्रोफाईल फोटो तिरंग्याच्या रंगात रंगवतात.

आणि मग या फोटोंमागे फेसबुकनं 'इंटरनेट डॉट ओआरजी' हा कोड छुप्या पद्धतीनं वापरल्याचं समोर येतं. वादळ उठल्यानंतर ही इंजिनिअरची चूक होती असं सांगून सारवासारवीचा प्रयत्नही होतो. 

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एका मोठ्या सोशल वेबसाईटचा - फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग एकमेकांची भेट घेतात... तेव्हा साहजिकच अनेक भुवया उंचावतात.  त्यानंतर, नमोंच्या 'डिजीटल इंडिया' या कॅम्पेनसाठी मार्क झुकरबर्ग धावून येतो आणि तिरंग्याच्या रंगात स्वत:चा फोटो बदलून टाकतो... 'फेसबुक'वासियांनाही असंच करण्याचं आणि 'डिजीटल इंडिया'ला पाठिंबा देण्याचं आवाहन करतो. नेटिझन्सही लगेचच गावागावांत इंटरनेट उपलब्ध होऊ शकेल यासाठी मोठ्या मनानं 'डिजीटल इंडिया'ला पाठिंबा दर्शवण्यासाठी आपला प्रोफाईल फोटो तिरंग्याच्या रंगात रंगवतात. आणि मग या फोटोंमागे फेसबुकनं 'इंटरनेट डॉट ओआरजी' हा कोड छुप्या पद्धतीनं वापरल्याचं समोर येतं. वादळ उठल्यानंतर ही इंजिनिअरची चूक होती असं सांगून सारवासारवीचा प्रयत्नही होतो.