Chanakya Niti: अशी पत्नी आयुष्य उद्ध्वस्त करते! जाणून घ्या चाणक्य नीति

राजकारण, अर्थशास्त्र याबाबतचे महत्त्वाचे ज्ञान देणाऱ्या आचार्य चाणक्यांनी व्यावहारिक जीवनातील महत्त्वाच्या गोष्टीही आपल्या नीतिशास्त्रात सांगितल्या आहेत.

Updated: Jun 30, 2022, 02:17 PM IST
Chanakya Niti: अशी पत्नी आयुष्य उद्ध्वस्त करते! जाणून घ्या चाणक्य नीति title=

Chanakya Niti for Women: राजकारण, अर्थशास्त्र याबाबतचे महत्त्वाचे ज्ञान देणाऱ्या आचार्य चाणक्यांनी व्यावहारिक जीवनातील महत्त्वाच्या गोष्टीही आपल्या नीतिशास्त्रात सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रात स्त्रियांची वैशिष्ट्ये सांगितली आहेत. यानुसार, महिलांमध्ये चांगल्या गोष्टी आयुष्यच नाही तर नातेसंबंधही वाढवते. काही दोष तिच्या जोडीदारांना मोठ्या संकटात टाकतात. चाणक्य नीतिमध्ये स्त्रियांशी संबंधित अशा गुण आणि अवगुणांबद्दल सांगितले आहे, जाणून घेऊयात.

चाणक्य नीतिमध्ये स्त्रियांची वैशिष्ट्ये सांगितली आहेत. जी पत्नी आपल्या पतीवर खूप प्रेम करते, तिने नेहमी त्याच्याशी खरे बोलावे आणि बिकट परिस्थितीत पतीला साथ दिली पाहिजे. अशा पत्नीच्या सहवासामुळे पतीचे आयुष्य बदलून जाते. पतीला प्रत्येक क्षेत्रात यश मिळते.

जेव्हा पतीकडे पैसा नसतो, आदर मिळत नसतो, संकटात असतो आणि तरीही पत्नी त्याला साथ देत असेल. तर अशा पत्नीचा खूप आदर केला पाहिजे. अशी पत्नी नशीबवान लोकांना मिळते.

पत्नीचे आचरण चांगले नसेल, तर ती कुटुंबाच्या बदनामीचे कारण बनते. अशा स्त्रीची संगत चांगले आयुष्य उध्वस्त करू शकते.

पत्नी जर असमाधानी, भांडखोर, धीरगंभीर आणि असंस्कृत असेल तर असा कुटुंबाला उद्ध्वस्त होण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही. अशा कुटुंबात कधीही शांती आणि आनंद असू शकत नाही.