Dasara 2022 : दसऱ्याला आपट्याची पानं सोनं म्हणून का वाटतात?

Apta Leaf : दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने सोने (Gold) म्हणून दिली जातात. 

Updated: Oct 5, 2022, 10:19 AM IST
Dasara 2022 : दसऱ्याला आपट्याची पानं सोनं म्हणून का वाटतात?  title=
dasara 2022 gold apta leaf nmp

Dasara 2022 : आज विजयादशमी (Vijaydashmi 2022) म्हणजे दसरा (Dasara 2022)...साडेतीन मुहूर्तांपैकी एक अशा दिवशी आज सोने खरेदी केलं जातं. भारतात आजचा दिवस खूप खास असतो. महाराष्ट्रात आजच्या दिवशी एकमेकांना आपट्याची पाने (aapta leaf) देण्याची म्हणजे लुटण्याची परंपरा आहे. याशिवाय पाटी पूजन, सरस्वती पूजन आणि शस्त्रास्त्रांची पूजा करण्याची प्रथा आहे. 

दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने सोने (Gold) म्हणून दिली जातात. दसऱ्याला धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा याचं प्रतीक म्हणून सोनं म्हणजेच आपट्याची पाने, पाटी-पुस्तके अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रास्त्रांचं पूजन करण्यात येते. (dasara 2022 gold apta leaf nmp)

काय आहे आख्यायिका

श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून त्याचा वध दसऱ्याच्या दिवशी केला होता. यामुळे या दिवसाला विजयादशमी असे म्हटले जाते. पांडवांनी अज्ञातवासात जाण्यापूर्वी आपली शस्त्रे शमीच्या झाडावरील एका ढोलीत लपवून ठेवली होती. त्यापैकी धनुष्य आणि काही बाण बृहन्नडेच्या रूपात असलेल्या अर्जुनाने विराटाच्या गाई सोडवून आणण्यासाठी वापरले आणि त्या कामगिरीनंतर परत झाडावर ठेवून दिले अशी आख्यायिका आहे. त्यामुळे दसऱ्याला आपट्याचा पानाचे महत्त्व आहे. 

आपट्याच्या पाने आरोग्यासाठी गुणकारी

आपट्याची पाने आरोग्यासाठी फायदेशीर असते. या झाडाची पाने फुले, बिया, सालं औषध म्हणून वापरली जातात. आपट्याला 'अश्मंतक' म्हणूनही ओळखलं जातं. 

महाराष्ट्रात आपट्याची पानं म्हणजे सोनं

अशी मान्यता आहे की, पूर्वीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) मावळे मोहिमेवर गेल्यानंतर शत्रूचा प्रदेश जी काही संपत्ती लुटून आणतं होते ते घरी देवासमोर ठेवतं असे. या घटनेची आठवण राहावी म्हणून महाराष्ट्रात दसऱ्याला इष्टमित्रांना, आप्तेष्टांना, नातेवाईकांना आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याची परंपरा आहे.