Devshayani Ekadashi 2022 Shubh Muhurat: एकादशीचा उपवास हा हिंदू धर्मातील सर्व कठीण उपवासांपैकी एक आहे. या दिवशी व्रत केल्यास भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षात एकादशीचे व्रत केले जाते. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी १० जुलै रोजी आहे. या दिवशी देवशयनी एकादशी येते. शास्त्रानुसार भगवान विष्णू या दिवसापासून चार महिने योग निद्रेत जातात. आणि कार्तिक महिन्यातील एकादशीला निद्रारुपातून जागे होतात.
यामुळे देवशयनी एकादशीचे महत्त्व अधिक आहे. यावेळी देवशयनी एकादशी रविवारी, 10 जुलै रोजी आहे. रविवार असल्याने या दिवशी रवि योग तयार होत आहे. यासोबतच या दिवशी शुभ योग आणि शुक्ल योगही तयार होत आहेत. या दिवसाचा शुभ काळ आणि शुभ योगांबद्दल जाणून घेऊया.
देवशयनी एकादशीचा शुभ योग
देवशयनी एकादशीच्या दिवशी अनेक शुभ योग तयार होत आहेत. देवशयनी एकादशीच्या दिवशी रवियोग, शुभ योग आणि शुक्ल योग तयार होत आहेत. या दिवशी रवि योग पहाटे 5.32 पासून सुरू होऊन सकाळी 9.56 पर्यंत राहील. त्याचबरोबर सूर्योदयाने शुभ योग सुरू होईल. तसेच तो संपल्यावर शुक्ल योग सुरू होईल.
देवशयनी एकादशी शुभ मुहूर्त 2022
आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी 9 जुलै रोजी दुपारी 4:40 ते रविवार 10 जुलै रोजी दुपारी 2:14 वाजेपर्यंत असेल. उदयतिथी निमित्त देवशयनी एकादशी 10 जुलै रोजी साजरी केली जाणार आहे.
देवशयनी एकादशी पूजा पद्धत
देवशयनी एकादशीचे व्रत ठेवण्याचा विचार करत असाल तर सकाळी उठून स्नान वगैरे आटोपून घरातील मंदिरात दिवा लावावा. भगवान विष्णूंना गंगाजलाने अभिषेक करा. तसेच त्यांना तुळशीची पानं आणि फुले अर्पण करा. शक्य असल्यास, उपवास ठेवा. एकादशी व्रताची कथा वाचा किंवा ऐका. यानंतर भगवान विष्णूची पूजा करून त्यांना भोग अर्पण करा. भगवान विष्णूंना भोग अर्पण करताना लक्षात ठेवा की भोगामध्ये फक्त सात्विक गोष्टींचा समावेश करावा. यासोबतच तुळशीची पानं नैवद्यात ठेवावी. तुळशीशिवाय भगवान विष्णू भोग स्वीकारत नाहीत. या दिवशी भगवान विष्णूसोबत देवी लक्ष्मीची पूजा करा. एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूचे जास्तीत जास्त ध्यान करावे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. याची पुष्टी ZEE 24 TAAS करत नाही.)