'या' गोष्टींना चुकूनही पाय लावू नका; अन्यथा..., जाणून घ्या काय सांगते Chanakya Niti

आचार्य चाणक्य यांनी अनेक दैनंदिन बाबींचा उलगडा आपल्या नीतिशास्त्रात केला आहे. आजही त्यांनी मांडलेली मतं तंतोतंत लागू होतात.

Updated: Aug 17, 2022, 05:33 PM IST
'या' गोष्टींना चुकूनही पाय लावू नका; अन्यथा..., जाणून घ्या काय सांगते Chanakya Niti title=

Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी अनेक दैनंदिन बाबींचा उलगडा आपल्या नीतिशास्त्रात केला आहे. आजही त्यांनी मांडलेली मतं तंतोतंत लागू होतात. त्यामुळे आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रातील गोष्टींवर लोकांचा विश्वास बसतो. आचार्य चाणक्य यांनी जीवनात शांतता आणि यशस्वी जीवनाबाबतही उलगडा केला आहे. आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रातील एका श्लोकात सांगितले आहे की, काही गोष्टींना पाय लावणं अशुभ ठरतं. या गोष्टींना पाय लावल्याने माणसाचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. जीवनातील सुख-शांती नष्ट होते. चला जाणून घेऊया, या गोष्टी कोणत्या आहेत. 

अग्नी- आचार्य चाणक्य म्हणतात की, आगीवर पाय ठेवणे अशुभ आहे. शुभ कार्यात अग्नीची पूजा केली जाते. अनेक पूजाविधींमध्ये अग्नीला साक्षी ठेवलं जातं. अशा स्थितीत अग्नीवर पाय ठेवल्याने अशुभ परिणाम मिळतात.

वृद्ध- ज्येष्ठांचा कायम आदर केला पाहिजे, असं सांगितलं जातं. चरणस्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा. त्यांना चुकूनही पाय लावू नये. त्यांना पाय लावल्याने पाप लागते, असं बोललं जातं. ज्या घरात वडीलधाऱ्यांचा आदर केला जात नाही, त्या घरात सुख-समृद्धी  येत नाही. अशा घरात माता लक्ष्मीही वास करत नाही आणि रागावून निघून जाते.

गुरू- धार्मिक ग्रंथांमध्ये गुरूला आई-वडिलांपेक्षा वरचे स्थान दिले आहे, अशा स्थितीत गुरूंचा अनादर हा ईश्वराचा अनादर मानला जातो. चाणक्याच्या मते, गुरुंचा नेहमी आदर केला पाहिजे. त्यांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घ्यावा. कोणत्याही शुभ कार्यापूर्वी गुरुंचा आशीर्वाद घेतल्याने व्यक्तीला प्रत्येक कार्यात यश मिळते.

कन्या - हिंदू धर्मात मुलींना देवीचे रूप मानले जाते.  मुलीला पाय लावणे म्हणजे देवीला पाय लावण्यासारखे आहे. मुलीला चुकून पाय लागला तर माफी मागावी. असं न केल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता.

गाय- गायीला हिंदू धर्मात पूजनीय स्थान आहे. अशा स्थितीत गायीला पाय लावल्याने मनुष्य पाप लागतं. गाय घराबाहेर आल्यावर हाकलून देऊ नका, तिला भाकर द्या आणि गायीच्या पाठीला स्पर्श करून आशीर्वाद घ्या.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)