दसऱ्याच्या दिवशी 'या' 3 गोष्टींचे करा गुप्त दान, आयुष्यात येईल सुख आणि समृद्धी

जाणून घ्या कोणत्या गोष्टींच करू शकता दान...

Updated: Oct 1, 2022, 06:50 PM IST
दसऱ्याच्या दिवशी 'या' 3 गोष्टींचे करा गुप्त दान, आयुष्यात येईल सुख आणि समृद्धी title=

मुंबई : हिंदू धर्मात दसरा हा सण नवरात्रीनंतरच्या दहाव्या दिवशी मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो. यावर्षी दसरा 5 ऑक्टोबर 2022 रोजी साजरा केला जाणार आहे. याला विजयादशमी असेही म्हणतात. अधर्मावर धर्माच्या विजयाचे प्रतीक असलेला हा सण दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो. या उत्सवाशी अनेक कथा निगडित आहेत.

एका पौराणिक कथेनुसार, या दिवशी भगवान श्री रामांनी माता सीतेला रावणापासून वाचवलं आणि त्याचा वध केला, म्हणून आजही दसऱ्याच्या दिवशी आपण रावणाच्या पुतळ्याचे दहन करून हा सण साजरा करतो. या दिवशी माँ दुर्गेने महिषासुराचा वध केला असे मानले जाते. अशा स्थितीत ज्योतिषशास्त्रानुसार या शुभ मुहूर्तावर पूजा, दान इत्यादींना खूप महत्त्व देण्यात आलं आहे. या दिवशी सुंदरकांड पठण केल्यानं मानसिक आजारांपासून मुक्ती मिळते, तर दुसरीकडे गुप्त दान केल्यानं जीवनात सुख-समृद्धी येते. दसऱ्याला काय दान करावे ते जाणून घेऊया...

 दसऱ्याच्या दिवशी या 3 गोष्टींचे गुप्त दान केल्यानं जीवनात सुख-समृद्धी येते

दसरा किंवा विजयादशमीच्या दिवशी रावण दहनाची परंपरा वर्षानुवर्षे जुनी आहे. दुसरीकडे ज्योतिषशास्त्रानुसार दसऱ्याच्या दिवशी रावण दहनानंतर दान करणं अत्यंत शुभ मानले जातं. यासाठी दसऱ्याच्या दिवशी अन्न, पाणी, वस्त्र यांचं गुप्त दान करावं. याशिवाय विजयादशमीच्या दिवशी संध्याकाळी देवी लक्ष्मीचे स्मरण करून एखाद्या मंदिरात झाडू दान करा. असे मानले जाते की यामुळे जीवनात संपत्ती आणि सुख-समृद्धी येते.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)