वर्षाच्या अखेरीस बनणार गजकेसरी आणि गुरु पुष्य योग; 'या' राशींना मिळू शकतो बंपर लाभ

तज्ज्ञांच्या मते, वर्षाच्या शेवटी गजकेसरी आणि गुरु पुष्य योग तयार झाल्यामुळे काही राशीच्या लोकांना लाभ मिळू शकणार आहे.

सुरभि जगदीश | Updated: Dec 16, 2023, 07:35 AM IST
वर्षाच्या अखेरीस बनणार गजकेसरी आणि गुरु पुष्य योग; 'या' राशींना मिळू शकतो बंपर लाभ title=

ज्योतिषशास्त्रानुसार, एका विशिष्ट कालावधीनंतर ग्रह विशिष्ट कालावधीनंतर आपली राशी बदलतात. अशा स्थितीत वर्षाच्या शेवटी म्हणजेच 31 डिसेंबरला गुरु ग्रह मेष राशीत मार्गस्थ होणार आहे. अशा परिस्थितीत नवीन वर्षात अनेक राशींच्या लोकांच्या आयुष्यात आनंद येणार आहे. अशावेळी गुरु मार्गी झाल्यामुळे गजकेसरी योग तयार होणार आहे. यासोबतच गुरु पुष्य नक्षत्रही या दिवशी आहे. अशा स्थितीत काही राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकणार आहे. 

तज्ज्ञांच्या मते, वर्षाच्या शेवटी गजकेसरी आणि गुरु पुष्य योग तयार झाल्यामुळे काही राशीच्या लोकांना लाभ मिळू शकणार आहे. हिंदू कॅलेंडरनुसार पुष्य नक्षत्र 29 डिसेंबरला पहाटे 1 वाजता सुरू होत असून 30 डिसेंबरला पहाटे 3.10 वाजता समाप्त होणार आहे. 

मेष रास (Mesh Zodiac)

गजकेसरीसोबतचा गुरु पुष्य योग या राशीच्या लोकांसाठी विशेष ठरू शकणार आहे. प्रलंबित कामं पूर्ण होतील. नोकरदार लोकांबद्दल बोलल्यास तुमच्या कामाचं कौतुक होणार आहे. व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. तुम्हाला मोठी जबाबदारी मिळू शकणार आहे. व्यवसायाच्या क्षेत्राबद्दल बोलायचं झाल्यास मेहनतीचे पूर्ण फळ मिळू शकणार आहे. कोणताही महत्त्वाचा निर्णय तुम्ही स्वतः घेऊ शकता. 

सिंह रास (Singh Zodiac)

गजकेसरी आणि गुरु पुष्य योगामुळे अध्यात्माकडे तुमचा कल वाढेल. गुरु पुष्य योगाचा तुमच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडणार आहे. ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकणार आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनात सुरू असलेल्या समस्याही संपणार आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे लोक यश मिळवू शकतात. या राशीच्या लोकांना अपेक्षित पदोन्नती किंवा पगारात वाढ होऊ शकते.

धनु रास (Dhanu Zodiac)

धनु राशीच्या लोकांसाठी 2024 हे वर्ष खूप चांगले ठरू शकणार आहे. कौटुंबिक जीवनातील समस्या संपुष्टात येणार आहे. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या काळात असे करणे फायदेशीर ठरू शकते. मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )