Gajkesari Yog: ज्योतिष शास्त्रानुसार, चंद्र हा सर्वात वेगाने फिरणारा ग्रह मानला जातो. चंद्र हा एका राशीत सुमारे सहा दिवस राहतो. चंद्राच्या राशीत बदलामुळे त्याचा कोणत्या ना ग्रहाशी ग्रहाशी संयोग होत असतो. त्याचप्रमाणे गुरू आणि चंद्राचा संयोग अत्यंत शुभ मानला जातो.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, चंद्राने 29 सप्टेंबर रोजी रात्री 9:08 वाजता मीन राशी सोडून मेष राशीत प्रवेश केला आहे. यावेळी 2 ऑक्टोबर रोजी 12.14 पर्यंत या राशीत राहणार आहे. देवांचा गुरू ग्रह मेष राशीमध्ये आधीपासूनच आहे. अशा स्थितीत गजकेसरी योग तयार होणार आहे.
दरम्यान गजकेसरी योगाची निर्मिती अनेक राशीच्या लोकांच्या जीवनात बदल घडवणार आहे. गजकेसरी योग तयार झाल्यामुळे कोणत्या राशींना विशेष लाभ होणार आहे हे पाहूया.
या राशीत गुरू वक्री अवस्थेत आहे. चंद्राच्या आगमनाने गजकेसरी योग तयार होणार आहे. या शुभ योगाच्या निर्मितीमुळे अनेक राशीच्या लोकांच्या जीवनात आनंदच येऊ शकतो. धनवृद्धीमुळे दीर्घकाळ प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडणार आहे. नोकरदार लोकांना त्यांच्या सध्याच्या नोकरीत त्यांच्या इच्छेनुसार बढती आणि पगारवाढ मिळणार आहे.
मिथुन राशीच्या लोकांनाही गजकेसरी योग बनल्याने विशेष लाभ होईल. या गजकेसरी योग तयार झाल्यामुळे या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडणार आहेत. जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुम्हाला यश मिळू शकतं. समाजात मान-सन्मान वाढणार आहे.
सिंह राशीच्या व्यक्तींना गजकेसरी योगाच्या निर्मितीमुळे आनंद मिळणार आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्यासाठी तुम्ही सहलीला जाऊ शकता. छोट्या व्यवसायातही जास्त नफा मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशनही मिळू शकते. व्यवसायात प्रचंड यशासह करार केला जाऊ शकतो. व्यावसायिकांना अधिक नफा मिळविण्याच्या संधीही मिळू शकतात. विद्यार्थ्यांसाठी शिक्षणात यश मिळविण्याची ही वेळ असू शकते.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )