Guru Gochar: जुलै महिन्यात शनिनंतर गुरु ग्रह होणार वक्री, 'या' राशींसाठी अच्छे दिन!

29 जुलैपासून गुरु ग्रह वक्री होणार आहे. 119 दिवस गुरु ग्रह वक्री अवस्थेत राहणार आहे.

Updated: Jun 22, 2022, 12:32 PM IST
Guru Gochar: जुलै महिन्यात शनिनंतर गुरु ग्रह होणार वक्री, 'या' राशींसाठी अच्छे दिन! title=

Guru Gochar: ज्योतिषशास्त्रात ग्रह गोचर आणि नक्षत्रांना विशेष महत्त्व आहे. सूर्य आणि चंद्र ग्रह सोडले तर इतर सातही ग्रहही ठराविक कालावधीनंतर वक्री होत असतात. ग्रह वक्री होणं किंवा गोचरामुळे मानवी जीवनावर प्रभाव पडत असतो. हा बदल काही राशींसाठी शुभ, तर काही राशींसाठी अशुभ ठरतो. एप्रिल महिन्यात गुरु ग्रहाने स्वराशी असलेल्या मीन राशीत प्रवेश केला आहे. मात्र आता 29 जुलैपासून गुरु ग्रह वक्री होणार आहे. 119 दिवस गुरु ग्रह वक्री अवस्थेत राहणार आहे. देवगुरु बृहस्पती यांना ज्ञान, शिक्षण, संतती, वैवाहिक सुख, दान आणि वृद्धी यांचे कारक मानले जातात. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत या ग्रहाची स्थिती बलवान असते त्यांना जीवनातील सर्व सुख प्राप्त होते. काही राशींच्या लोकांवर गुरु ग्रहाच्या वक्री दशेचा शुभ प्रभाव पाहायला मिळेल. चला जाणून घेऊयात कोणत्या राशी आहेत.

वृषभ : या राशीत गुरू ग्रह अकराव्या भावात वक्री होणार आहे. या स्थानाला उत्पन्नाचे स्थान म्हणतात. त्यामुळे या काळात तुमचे उत्पन्न चांगले वाढू शकते. यासोबतच उत्पन्नाचे नवीन स्रोतही निर्माण होऊ शकतात. व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. तसेच, व्यवसाय करार देखील अंतिम केला जाऊ शकतो. ज्यामुळे तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. तुम्हाला तुमच्या कार्यशैलीत सुधारणा देखील पाहायला मिळेल.

मिथुन : गुरु ग्रह वक्री होताच या राशीला चांगले दिवस सुरू होतील. मिथुन राशीच्या दशम भावात गुरु ग्रह वक्री होणार आहे. या स्थानाला नोकरी, व्यवसाय आणि कामाचं स्थान म्हणतात. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तसेच पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. यासोबतच नवीन व्यावसायिक संबंधही निर्माण होऊन व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. 

कर्क : या राशीचा गुरु सहाव्या आणि नवव्या घराचा स्वामी आहे. गुरु ग्रह नवव्या घरात स्थित आहे. या काळात नशिबाची साथ मिळेल. व्यावसायिक आघाडीवर, नोकरीमध्ये प्रगती करण्यास हा काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे. तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात आणि ऑनसाइट संधी तुमच्या वाट्याला येऊ शकतात. वारसाहक्कातून तुम्हाला लाभाची चांगली संधी मिळू शकते.

कुंभ : या राशीच्या लोकांसाठी गुरु हा दुसऱ्या आणि अकराव्या घराचा स्वामी आहे. गुरु दुसऱ्या घरात स्थित होणार आहे. तुम्ही व्यवसायात असाल तर तुम्हाला चांगला फायदा होईल. आर्थिक बाजूने तुम्हाला फायदा होऊ शकतो. आर्थिक नियोजन करण्‍याची आवश्‍यकता आहे जेणेकरून ते सुज्ञपणे खर्च करता येईल. वैयक्तिक आघाडीवर, तुमच्या जोडीदाराशी काही मैत्रीपूर्ण संबंध असू शकतात.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE24TAAS याची पुष्टी करत नाही.)