सिंह राशीसाठी कसं असेल नवीन वर्ष २०१९ ?

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी २०१९ हे वर्ष कसं असेल?

Updated: Dec 31, 2018, 07:17 PM IST
सिंह राशीसाठी कसं असेल नवीन वर्ष २०१९ ?

मुंबई : 2019 हे वर्ष सिंह राशीच्या व्यक्तीसाठी कसं असेल? काय असेल सिंह राशीच्या व्यक्तींसाठी या वर्षात नवीन? करिअर, कौटुंबिक जीवन, आर्थिक स्थिती आणि आरोग्य नवीन वर्षात कसं असेल? जाणून घ्या.

राशी फळ : नव्या वर्षात व्यापार वाढेल. सिंह राशीच्या व्यक्तींचा सन्मान देखील वाढेल. प्राणी आणि गाडीपासून सावध राहण्याची गरज आहे. पराक्रम, शौर्य यातून यश मिळण्याचा योग आहे. या वर्षात फ्रेब्रुवारी सगळ्यात शुभ महिना असणार आहे.

करिअर- करिअरसाठी हे नवीन वर्ष तुमच्य़ासाठी उत्कृष्ठ असेल. व्यापार करताना मोठी गुंतवणूक कराल. अचानक काही फायदे होतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना देखील अनपेक्षित असा फायदा होईल.

आर्थिक स्थिती- आर्थिक बाजु देखील यंदा चांगली असेल. पैशांचा तुटवडा जाणवणार नाही. काही ठिकाणी पैसे अडकूण पडले असतील तर ते मिळतील. जमीन खरेदी करण्याचा योग आहे. 

आरोग्य - नवीन वर्षात आरोग्य सामान्य राहिल. ब्लड प्रेशरच्या रुग्णांना काळजी घ्यावी. डायबिटीजच्या रुग्णांना देखील अधिक काळजी घेण्याची गरज आहे. आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष करु नका.

सिंह राशीसाठी वर्ष चांगलं आहे. नोकरी आणि व्यापर दोन्हींमध्ये फायदा होईल. संपत्ती खरेदी करताना विकताना सावध राहा. मुलांवर खर्च वाढेल. काही गोष्टींना विलंब होऊ शकतो. पती-पत्नीमध्ये भेद होऊ शकतात. अशावेळी त्याला व्यवस्थित सांभाळा. काही ठिकाणी समज दाखवावी लागेल.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x