आजचे राशीभविष्य | बुधवार | 30 जानेवारी 2019

असा असेल तुमचा आजचा दिवस

Updated: Jan 30, 2019, 08:19 AM IST
आजचे राशीभविष्य | बुधवार | 30 जानेवारी 2019

मेष : व्यापाऱ्यांसाठी वेळ चांगली नाही आहे. कोणाला उधार पैसे देऊ नका. कोणते जुने उधार तुम्हाला टेन्शन देऊ शकते. नोकरदार वर्गाने संभाळून राहण्याची गरज आहे. कोणत्या तरी गोष्टीची काळजी लागून राहील. मानसिक तणाव वाढेल. जोडीदाराचा मूड कोणत्या तरी कारणामुळे बिघडू शकतो. ऋतूबदलामुळे होणाऱ्या आजारांपासून वाचा. खाण्यापिण्याची काळजी घ्या. 

वृषभ : ठरवलेली कामे पूर्ण कराल. अचानक धन लाभ होई. तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीत बदल होईल. मुलांकडून मदत मिळेल. तुमचे प्लानिंग मेहनतीने पूर्ण कराल आणि त्याचा फयदा देखील तुम्हाला मिळेल. मित्र आणि भावांचे सहकार्य मिळेल. जोडीदारासोबत प्रेम आणि सहकार्य कमीच मिळेल. 

मिथून : व्यवसायात अचानक धनलाभ होण्याचे योग आहेत. जोडीदाराची मदत मिळेल. जोडीदाराचा सल्ला तुमच्यासाठी उपयोगी ठरेल. तुम्हाला अचानक धनलाभ होईल. तुम्ही प्लानिंग करत असलेली कामे पूर्ण होतील. अडकलेला पैसा परत मिळेल. तुम्हाला काही चांगल्या संधी मिळू शकतात. किंवा गोड बोलून तुम्ही तुमची कामे पूर्ण करुन घेऊ शकता. आरोग्या बाबतीत काळजी वाटेल. खाण्यापिण्याची काळजी घ्या. 

कर्क : कामाच्या ठिकाणी वातावरण तुमच्या मनासारखे नसल्याने मूड खराब होण्याची शक्यता आहे. प्रेम जीवनात झालेल्या वादातून तोडगा निघणार नाही. वाद आणि स्पर्धा टाळण्याचा प्रयत्न करा. कोणावर अवलंबून राहू नका. आरोग्या संदर्भात चढ-उतार जाणवतील. रोजच्या कामाचा त्रास जाणवेल. ज्या कामांचे प्लानिंग केले होते ती कामे देखील पूर्ण होणार नाहीत. 

सिंह : तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. आज तुम्ही लोकांना प्रभावित करु शकाल. तुमच्या विचार करण्याची पद्धत लोकांना आवडेल. कोणत्या तरी चांगल्या बातमीची वाट पाहाल. प्रेम जीवनासाठी दिवस सामान्य राहील. जोडीदार तुमची भावना समजेल. सांधेदुखी तुम्हाला हैराण करेल. 

कन्या : परिवाराची मदत मिळेल. तुमची मानसिक स्थिती संतुलित राहील आणि यामुळे तुमच्या पारिवारीक आयुष्यातही आनंद मिळेल. कामे पूर्ण होऊ शकतात. आज तुम्हाला करिअर आणि गुंतवणूक क्षेत्रात काही चांगल्या संधी मिळू शकतात. पैसे आणि पारिवारीक स्थितीकडे तुम्हाला लक्ष द्यावे लागेल. आरोग्यात सुधार होऊ शकतो. बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेल्या आरोग्याच्या समस्या सुटतील.

तूळ : तुम्हाला मेहनतीने यश मिळेल. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. बढती मिळण्याची पू्र्ण शक्यता आहे. कोणत्याही प्रकारची संधी दवडू देऊ नका. तुम्ही ज्या कामात हात घालाल तिथे तुम्हाला मदत नक्की मिळेल. तुम्ही लोकांकडून काम करुन घेण्यात यशस्वी व्हाल. आज तुमचे आरोग्य सर्वसाधारण राहील.

वृश्चिक : पैशांच्या प्रकरणात तुम्हाला नुकसान होऊ शकते. काही कायदेशीर प्रकरणात तुम्ही अडकू शकता. वेळेवर लक्ष द्या. काही खास कामांसाठी जास्त मेहनत करावी लागेल. आज अचानक झालेल्या घटनाक्रमावर तात्काळ कोणता निर्णय घेऊ नका. तुमचे आरोग्य साधारण राहील. थोड दमायला होऊ शकत.

धनू : शेअर मार्केटची गुंतवणूक विचारपूर्वक करा. आज तुम्ही बॉस सोबतच्या संबधात सावधानता बाळगा. तुमच्या करियरमध्ये महत्त्वपूर्ण असणारी लोक तुम्हाला अडचणीत आणू शकतात. तुम्हाला तुमची बाजू मांडण्याचा पू्र्ण अधिकार राहील. ज्या कामाची अपेक्षा होती ते पूर्ण न झाल्याने तणाव जाणवेल. आज तुम्हाला थोडा धीर धरावा लागेल. शांततेत दिवस काढा. आरोग्य साधारण राहील.

मकर : तुम्हाला नुकसान होऊ शकतं. दिखावा आणि अवडंबर माजवू नका. परिवारात आर्थिक स्थिती संदर्भात काही भांडणे होऊ शकतात. जास्त जबाबदारी मिळेल. आज तुम्हाला पैशांच्या प्रकरणात सावधान आणि सतर्क राहावे लागेल. नाहीतर मोठे नुकसान होऊ शकते. तुम्ही थोडे त्रस्त रहाल. जोडीदाराच्या व्यवहारामुळे दु:खी व्हाल. आरोग्याच्या दृष्टीने ग्रह कमकुवत आहेत.

कुंभ : करियर संदर्भात काही चांगली बातमी मिळू शकते. विरोधकांवार प्रभाव पाडाल. जुनी भांडणे सोडवण्याचा प्रयत्न कराल आणि परिस्थिती आपल्या बाजूने कराल. नोकरदार वर्गासाठी वेळ चांगली आहे. आज नव्या लोकांची भेट होईल. तुम्हाला मदत मिळू शकेल. व्यवसायात काही नवे करण्यात यश मिळेल. आरोग्याच्या बाबतीत संभाळून राहा.

मीन : करियरशी संबंधीत निर्णय घेताना सावधानी बाळगा. विचार करुन गुंतवणूक करा. आज तुम्ही काही खास काम विसरु शकता. तुमच्या कामात चुका होऊ शकतात. दुसरी माणसे आपल्याकडचे काम तुम्हाला देऊ शकतात. आज तुम्ही गरजेपेक्षा जास्त काम कराल. लव लाईफमध्ये चढ-उतार येऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्या.