close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

राशीभविष्य | गुरुवार | २५ जुलै २०१९

असा असेल तुमचा आजचा दिवस

Updated: Jul 25, 2019, 12:17 PM IST
राशीभविष्य | गुरुवार | २५ जुलै २०१९

मेष : आज विचार करुनच निर्णय घ्या. काही कामात अडचणी येऊ शकतात. मेहनत जास्त करावी लागेल. नोकरी बदलण्याचा विचार मनात येऊ शकतो. कोणत्याही कामात घाई करु नका. आरोग्याची काळजी घ्या. नवा मोबाईल किंवा गाडी घेण्याचा विचार कराल. पैसे किंवा बचतीसाठी दुसऱ्या व्यक्तीचा सल्ला घ्या. गुंतवणूक करण्याआधीही सल्ला घ्या.जोडीदाराचा मूड चांगला असेल. वैवाहीक आयुष्य सुखाचे जाईल. 

वृषभ : काही चांगल्या संधी मिळतील. व्यवसायात फायदा होईल. नोकरदार वर्गाला बढती मिळण्याचे योग आहेत. सोबत काम करणाऱ्यांचे सहकार्य मिळेल. जोडीदाराची मदत मिळेल. अविवाहीत लोकांसाठी दिवस चांगला असेल. तुमच्या कामाच्या पद्धतीत बदल होऊ शकतो. कामात ताण तणावही होऊ शकतो. करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळू शकते. 

मिथुन : परिवार आणि मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. ग्रह तुमच्यासाठी खास आहेत. आज तुम्ही सक्रिय असाल. ऑफिसात नवी जबाबदारी मिळेल. अडकलेली कामे पूर्ण होतील. काही नवी लोकं तुमच्याशी जोडली जातील. तुम्हाला भावनात्मक मदत मिळेल. सामाजिक आणि सामूहिक कामासाठी अनेकांच्या भेटी घ्याव्या लागतील. तजेलपणा आणि स्फूर्ती जाणवेल. आरोग्य सुधारण्याचा योग आहे. 

कर्क : तुम्ही ऑफिसात काही लोकांना इम्प्रेस करु शकाल. नोकरी बदलण्याचा किंवा अधिक कमाईचा विचार कराल. यामध्ये तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. नवी सुरूवात करण्यात यशस्वी व्हाल. व्यवसायात नवे करार होतील. आत्मविश्वास वाढेल. पारिवारीक सुख आणि संतोष मिळेल. अपघात किंवा जखम होण्याची शक्यता आहे. संभाळून राहावे लागेल. 

सिंह : वरिष्ठांकडून मदत कमीच मिळेल आणि व्यवसायात देखील सावध राहावे लागेल. ऑफिस किंवा व्यवसायात जी कामे हातात घेतलात ती पूर्ण कराल. व्यवसायात काही अनूभवी लोकांची मदत घ्या. घाई करु नका. एकटे राहू नका. अर्धवट कामे पूर्ण करण्याच अडचणी येतील. आज मिळणारे पैसे भविष्यासाठी वाचवून ठेवा. जोडीदारासोबत प्रवासाचे योग आहेत किंवा कोणत्या तरी प्रोग्रामचे प्लानिंग करु शकता. 

कन्या : आज व्यवसाय किंवा नोकरीत काही मोठे निर्णय होऊ शकतात. पैशांच्या स्थितीत सुधारणा होईल. पगार वाढवण्याचा आणि खर्च कमी करण्याचा विचार कराल. आज नोकरी किंवा व्यवसायासंबंधीत मोठा निर्णय घेऊ शकाल. जोडीदाराकडून चांगले गिफ्ट मिळू शकेल. नोकरीमध्ये बदल किंवा बढतीचा योग आहे. आज कोणाला न विचारता सल्ला देऊ नका. तुमच्या आरोग्यात पहिल्यापेक्षा सुधार असाल. 

तुळ : काही राहिलेली कामे पूर्ण होऊ शकतात. नोकरी आणि व्यवसायात सहकार्य न मिळाल्याने तणाव वाटेल. काही लोक तुमच्या कामाला विरोध करतील. याव्यतिरिक्त तुम्ही काही नवे आणि जास्त करण्याचा विचार कराल. येणाऱ्या दिवसांत काही मोठे निर्णय घेण्याची योजना आखू शकता. आज तुम्हाला विवाहाचा प्रस्ताव मिळू शकेल. लग्न झालेल्यांसाठी दिवस चांगला असेल. 

वृश्चिक : व्यवसायात फायदा होण्याचा योग आहे. नोकरदार वर्गासाठी दिवस छान असेल. अडकलेली कामे पूर्ण होतील. जुन्या त्रासातून मार्ग सापडेल. विरोधकांवर विजय मिळवण्याचे योग आहेत. काही चांगल्या संधी मिळू शकतील. व्यापारातील निर्णय विचार पूर्वक घ्या. अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. आज तुम्ही कुठे फिरायलाही जाऊ शकता. जोडीदाराकडून तुम्हाला मदत देखील मिळू शकते. आरोग्याची काळजी घ्या. 

धनु : नोकरदार वर्गाला कामात अडचणी येऊ शकतात. व्यवसाय करणाऱ्यांनी सावध राहा. कायदेशीर प्रकरणात अडकून राहू शकता. वायफळ वेळ जाऊ शकतो. जागेत बदल करण्याचा विचार कराल. कामासंदर्भात बाहेर जावे लागेल. प्रेम जीवनात काही बदल होतील. या राशीतील अविवाहीत लोकांसाठी चांगला योग आहे. आरोग्याच्या प्रकरणात संभाळून राहा. 

मकर : जुन्या अडचणी संपण्याचे योग आहेत. मकर राशीसाठी स्थिती चांगली असेल. व्यवसाय आणि नोकरीमध्ये नव्या आयडीया मिळतील. तुमची एनर्जी लेवल वाढेल.कोणावर डोळे बंद करुन विश्वास ठेवू नका. जोडीदारासोबत बाचाबाची होऊ शकते. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आरोग्याच्या बाबतीत दिवस चांगला जाईल. आजारपणातून सुटका मिळेल. 

कुंभ : करियरसाठी या राशीतील मंडळींना दिवस चांगला जाईल. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांची मदत मिळेल. काही चांगले आणि मोठे बदल होण्याची शक्यता आहे. ऑफिस किंवा व्यवसायात अनुभवी लोकांचा सल्ला घ्या. धन लाभ होऊ शकतो. प्रॉपर्टीच्या प्रकरणात दिवस चांगला असेल. महत्त्वाच्या लोकांशी ओळख होईल. प्रेम जीवनासाठी दिवस चांगला असेल. आरोग्याची काळजी घ्या. 

मीन : नोकरी किंवा व्यवसायात बदल करण्याचा विचार करु शकाल. अचानक फायदा होण्याचा योग आहे. जोडीदाराची देखील मदत मिळून धन लाभ होऊ शकतो. वायफळ खर्चांवर नियंत्रण ठेवाल. नवे कमावण्याचे मार्ग मिळतील. ऑफिसमध्ये नवे काम किंवा नवी जबाबदारी मिळेल. काहीही बोलताना विचार करुनच बोला. वायरल आजारांपासून सावध राहा.