मुंबई : प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक प्रकारच्या खुणा असतात. काहींना त्या खूणा जन्मताच येतात. तर काहींना या खुणा वयानुसार येतात किंवा निघून देखील जातात. या खूणांमध्ये शरीरावरील तीळाचा देखील समावेश आहे. वेगवेगळ्या वयात तिळ किंवा खुणा शरीरावर येणं आणि जाणं यासाठी काही कारण असता. त्यामुळेच शरीरावरील तीळांना समुद्रशास्त्रात महत्वाचे स्थान दिले आहे.
त्यामुळे तुमच्या शरीराच्या कोणत्या भागावर तीळ आहे. त्यानुसार त्याचं महत्व आणि तुमचं नशीब बदलतं.
नाकावर तीळ - नाकावर तीळ असणे म्हणजे व्यक्ती खूप प्रतिभावान आहे. ती व्यक्ती आनंद आणि समृद्धीने भरलेले जीवन जगते. त्याचबरोबर महिलांच्या नाकावर तीळ असल्याने ती व्यक्ती खूप भाग्यवान असल्याचे सांगितले जाते.
पापण्यांवर तीळ - ज्या व्यक्तीच्या डोळ्यांच्या पापण्यांवर तीळ असेल, तर ती व्यक्ती खूप संवेदनशील असते.
डोळ्यावर तीळ - पुरुषाच्या उजव्या डोळ्यावर तीळ म्हणजे पत्नीशी चांगले जमते, तर डाव्या डोळ्यावर तीळ असणे हे पत्नीसोबतच्या नातेसंबंधात असणाऱ्या किंवा तयार होणाऱ्या आंबटपणाचे किंवा न पटण्याचे लक्षण आहे.
भुवयांवर तीळ - ज्या लोकांच्या दोन्ही भुवयांवर तीळ असतात, त्यांचे आयुष्य अनेकदा प्रवासात व्यतीत होते. उजव्या कपाळावर तीळ म्हणजे व्यक्तीचे आयुष्य आनंदाने व्यतीत होईल, तर डाव्या कपाळावर तीळ सुखी वैवाहिक जीवन दर्शवते.
डोळ्याच्या बुबुळावर तीळ - खूप कमी लोकांच्या डोळ्याच्या बुबुळावर तीळ असतो पण तो खूप महत्त्वाचा असतो. हा तीळ माणसाचे विचार कसे असतात हे सांगतो. उजव्या बाहुलीवर तीळ असणे म्हणजे व्यक्ती उच्च विचारांचा धनी असतो, तर डाव्या बाहुलीवर तीळ असणे म्हणजे त्याचे विचार आजारी असतात.
कानावर तीळचा - कानावर तीळ असणे हे सूचित करते की व्यक्ती अल्पायुषी आहे.
ओठांवर तीळ - महिलांच्या ओठांवर तीळ असेल तर ते त्यांचे सौंदर्य वाढवते. तसेच, समुद्रशास्त्रानुसार, ओठावर तीळ असलेली व्यक्ती प्रेमळ असते. पण व्यक्तीच्या ओठाखाली तीळ असेल तर, त्याच्या जीवनात गरिबी येते.
तोंडावर तीळ - चेहऱ्यावर तीळ स्त्री आणि पुरुष दोघांसाठी शुभ आहे. हे त्यांचे आनंदी आणि समृद्ध जीवन जगण्याचे आणि भाग्यवान असल्याचे लक्षण आहे.
गालावर तीळ - गालावर तीळ असणारे व्यक्ती नेहमी आनंदी राहतात. तसेच तुमच्या डाव्या गालावर तिळ असेल तर ही व्यक्ती गरीब असते, तसेच ज्या व्यक्तीच्या उजव्या गालावर तीळ असेल तर ती व्यक्ती श्रीमंत होते.
जबड्यावर तीळ - जबड्यावर तीळ फार कमी लोकांमध्ये दिसतात. हे तीळ माणसाच्या आयुष्यात आरोग्याशी संबंधित चढ-उतार कायम ठेवतात.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.)