Magh Purnima 2023: यंदाची माघ पौर्णिमा येत्या शनिवारी म्हणजे 4 फेब्रुवारी रोजी सुरु होणार आहे. ती दुसऱ्या दिवशी रविवारी समाप्ती होणार आहे. ही पौर्णिमा ज्योतिषीय दृष्टीकोनातूनही अत्यंत महत्वाची मानली गेली आहे. या दिवशी चंद्र आपल्या 16 कलांनी परिपूर्ण असतो. या दिवशी चंद्र स्वतःच्या राशीत कर्क राशीत प्रवेश करतो. असे मानले जाते की या दिवशी स्वर्गातील सर्व देवी-देवता पृथ्वीवर येतात आणि गंगेत स्नान करतात.
माघ पौर्णिमेच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी, आश्लेषा नक्षत्र आणि पुष्य नक्षत्र यांचा संयोग होत आहे. सर्वार्थ सिद्धी योग सकाळी 07:06 पासून सुरू होत आहे, जो दुपारी 12:13 पर्यंत राहणार आहे.
माघ पौर्णिमा सुरू : 4 फेब्रुवारी 2023, शनिवारी रात्री 9.28 वाजता
माघ पौर्णिमा समाप्ती: 5 फेब्रुवारी 2023, रविवार रात्री 11.59 वाजता
वाचा: यावर्षी एकूण 7 वेळा मंगळ गोचर, 'या' राशींच्या लोकांचे भाग्य उजळणार, खिशात पैसा खुळखुळणार