Mangalwar Upay : मंगळवारी करा हे 4 उपाय उजळेल तुमचं भाग्य, होईल आर्थिक लाभ

Mangalwar Remedies : आज अंगारकी चतुर्थी आणि त्यात मंगळ...म्हणजे आज गणराया आणि हनुमानाचा वार. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक देवाला एक दिवस समर्पित केला गेला आहे. त्यामुळे आजच्या दिवशी काही उपाय केल्यास तुमच्या घरावरील सर्व संकट नाहीस होणार, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. 

Updated: Jan 10, 2023, 08:17 AM IST
Mangalwar Upay : मंगळवारी करा हे 4 उपाय उजळेल तुमचं भाग्य, होईल आर्थिक लाभ  title=
Mangalwar Upay How to Please Lord Hanuman Do these 4 measures on Tuesday your luck will brighten and you will get financial benefits marathi news

How to Please Lord Hanuman : हिंदू धर्मानुसार देवदेवतेची कृपा असल्यास तुमचं भाग्य उजळतं. ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या आयुष्यात पैशांची चणचण, कुटुंबिक वाद, व्यापारामध्ये नुकसान असे अनेक गोष्टींसाठी तुमच्यावर देवाची अवकृपा आहे असं सांगितलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार हा बाप्पा आणि हनुमानाची पूजाअर्चा करण्याचा दिवस...त्यामुळे जर तुमच्या आयु्ष्यात आर्थिक अडचण असो किंवा कुठलीही समस्या..ती नाहीसी करायची असेल तर आजच्या दिवशी ज्योतिषशास्त्रानुसार काही उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्यास तुमला आयुष्यात यशस्वी होण्यापासून कोणी रोखू शकतं नाही. (Mangalwar Upay How to Please Lord Hanuman Do these 4 measures on Tuesday your luck will brighten and you will get financial benefits marathi news)

हे उपाय मंगळवारी नक्की करा!

शनीची महादशा दूर करा

अनेक व्यक्तींच्या कुंडलीती शनीची महादशा असते. अशामध्ये आजच्या दिवशी म्हणजे मंगळवारी तुम्ही शास्त्रात सांगितल्यानुसार एक उपाय सांगितला आहे. तुम्ही मंगळवारी 108 तुळशीच्या पानांवर पिवळ्या चंदनाने रामाचं नाव लिहा. त्यानंतर या पानांचा हार तयार करुन बजरंगबलीला अपर्ण करा. हा उपाय केल्यास राहू आणि मंगळ-शनिशी संबंधित सर्व दोष दूर होतात, असं ज्योतिषशास्त्रात मानलं जातं. 

आयुष्यातील दु:ख दूर करा!

यासाठी तुम्ही मंगळवारी सकाळी लवकर उठून सकाळची कामं केल्यानंतर शुद्ध आंघोळ करा. त्यानंतर हुनमानाच्या मंदिरात जाऊन फुलांचा हार, दिवे आणि लाडू अर्पण करा. याशिवाय 108 वेळा हनुमान चालिसाचं पाठण करा. हा उपाय तुम्ही शनिवारीही करा. असं केल्यास कुंडलीतील सर्व ग्रहांचे शुभ परिणाम दिसून येतील, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. 

 

हेसुद्धा - Angaraki Chaturthi 2023 : आज पहिली अंगारकी चतुर्थी, 'या' राशींवर लक्ष्मीची कृपा तर चुकूनही करु नका 'ही' कामं

अकाली मृत्यूचं संकट टळतं

मृत्यू हा कोणालाच नको असतो. पण जन्म आहे तर मृत्यूही आहे. पण ज्योतिषशास्त्रानुसार अकाली मृत्यूचं संकट टाळण्यासाठी उपाय सांगण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी हनुमान मंदिरात जाऊन बजरंग बलीला सिंदूर लावा. यासोबत त्यांना गुलाबाच्या फुलांचा हार अर्पण करा. यासोबत देशी तुपाचा दिवा लावा आणि तिथे सुंदरकांड पाठ करा. हा उपाय सतत 11 मंगळवार केल्याने व्यक्तीचे सर्व त्रास टळतात आणि अकाली मृत्यूचा धोकाही दूर होतो. 

आर्थिक संकट दूर होईल 

कुटुंबाच्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी, दर मंगळवारी अशा ठिकाणी जा जिथे माकडांचा अधिक वास आहे.  त्यांना स्वतःच्या हाताने केळी, गूळ, हरभरा, शेंगदाणे खायला द्या. वाटेत भिकारी दिसला तर त्याला खायला द्या पण त्याला पैसे न देण्याची काळजी घ्या. असं मानले जातं की हे उपाय केल्याने व्यक्तीचे नशीब हळूहळू चमकू लागतं आणि आर्थिक संकट दूर होते. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)