Margashirsh 2022: पहिला गुरूवार आणि मार्तंडभैरव षड् रात्रोत्सव, अशी करा पूजा विधी; जाणून घ्या

Margashirsha Guruvar 2022: मार्गशीर्ष महिन्याला 24 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असून पहिला गुरुवार आहे. गुरुवारी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. तर मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत षड् रात्रोत्सव असतो. 

Updated: Nov 23, 2022, 02:15 PM IST
Margashirsh 2022: पहिला गुरूवार आणि मार्तंडभैरव षड् रात्रोत्सव, अशी करा पूजा विधी; जाणून घ्या title=

Margashirsh Guruwar Vrat 2022:  कार्तिक अमावास्या 24 नोव्हेंबरला पहाटे 4 वाजून 26 मिनिटांनी संपणार आहे. त्यानंतर मार्गशीर्ष मासारंभ होणार आहे. मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार असून मार्तंडभैरव षड् रात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. मार्गशीर्ष हा श्रावण महिन्यानंतर सर्वात पवित्र महिना मानला जातो. 'मासांना मार्गशीर्षो ऽ हम्' या वचनाने भगवद्गीतेत गौरव करण्यात आला आहे. या महिन्यात मार्तंडभैरव षड् रात्रोत्सव, चंपाषष्ठी, भागवत एकादशी, श्रीदत्त जयंती, संकष्टी चतुर्थी, सफला एकादशी येत आहे. दुसरीकडे मार्गशीर्ष महिन्यात पाच गुरूवार येत आहेत. कुमारिका आणि सुहासिनी मोठ्या भक्तिभावाने देवी लक्ष्मीची पूजा करतात. 

मार्तंडभैरव षड् रात्रोत्सव आणि चंपाषष्ठी

महाराष्ट्रातील बहुतांश लोकांचं कुलदैवत असलेल्या खंडेरायाची षड् रात्रोत्सवला 24 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत षड् रात्रोत्सव असतो. सहा दिवस श्री शंकराच्या  मार्तंडभैरव आवतारानं मणी- मल्ल दैत्यासोबत युद्ध केलं होतं आणि चंपाषष्ठीच्या दिवशी विजय मिळवला होता. यानंतर देवांनी मार्तंडभैरवावर चाफ्याची फुलं आणि भंडारा उधळला होता. त्यामुळे या सहा दिवसात भाविक मोठ्या भक्तिभावाने खंडेरायाची पूजा करतात. या सहा दिवसात मल्हारी माहात्म्यचं पठण केलं जातं आणि चंपाषष्ठीच्या दिवशी सांगता केली जाते. 

बातमी वाचा- Vastu Shastra: 'या' पाच वस्तू तिजोरीत ठेवल्याने होईल भरभराट, समुद्र मंथनाशी आहे संबंध

लक्ष्मी पूजन आणि घट मांडणी

मार्गशीर्ष महिन्यात पाच गुरूवार येतात. गुरुवारी देवी लक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते. सर्वप्रथम घट मांडण्याच्या ठिकाणी रांगोळी काढावी. त्यावर चौरंग किंवा पाट ठेवून लाल कपडा व्यवस्थितरित्या अंथरावा. त्यावर तांदूळ ठेवून बरोबर मध्यभागी कळश ठेवावा. कळशात दूर्वा, पैसा आणि सुपारी घालावी. अंब्याची पाच पान ठेवून त्यावर नारळ ठेवावा. चौरंगावर देवी लक्ष्मीचा फोटो आणि श्रीयंत्र ठेवा. देवीपुढे पाच फळं, लक्ष्मी कवडी यांची मांडणी करावी. तसेच देवीपुढे पाच पानांचा विडा ठेवावा. नैवेद्य म्हणून लाह्या, गुळ, बाताशे ठेवावे. देवी लक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण करावे. श्री महालक्ष्मी व्रत कथा वाचावी.