Naraka Chaturdashi 2022 : कधी आहे छोटी दिवाळी? मुहूर्त, महत्व, पूजा विधी जाणून घ्या

Diwali 2022 : नरक चतुर्दशीच्या दिवशी पायाने फोडायचा तो चिरोटय़ाचा राक्षस.. दूध, तेल आदी उपचारांनी समृद्ध झालेले सुगंधी उटणं.. आणि सर्वावर मुकुटमणी म्हणजे गोल, वजनदार, नदीकिनाऱ्याच्या गोटय़ाप्रमाणे भासणारा गुळगुळीत, प्लॅस्टिकच्या वेष्टणातील मोती साबण. मग चला यंदा हे सगळं कधी होणार आहे आणि नरक चतुर्दशीचा मुहुर्त, पूजेचा विधी आणि धार्मिक महत्त्व समजून घेऊयात. 

Updated: Oct 23, 2022, 12:03 PM IST
Naraka Chaturdashi 2022 :  कधी आहे छोटी दिवाळी?  मुहूर्त, महत्व, पूजा विधी जाणून घ्या title=
Narak Chaturdashi 2022 shubh muhurt and puja vidhi nmp

नरक चतुर्दशी 2022 :  'उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली' ...दिवाळी तोंडावर आली की टीव्हीवर घरोघरी ही जाहीरात ऐकू यायची. नरक चर्तुदशी म्हणजे छोटी दिवाळीला (Diwali 2022) पहाटे उठून अभ्यंग स्नान करायची परंपरा...कार्तिक महिन्यांच्या कृष्णा पक्षाला चतुर्दशीला नरक चतुर्दशी साजरी केली जाते. या दिवशी भगवान कृष्णाची आणि काली मातेची पूजा केली जाते. तसंच या दिवशी यमदेवतेचीही पूजा केली जाते. नरक चतुर्दशीला नरक चौदस, रुप  चौदस किंवा काली चौदस या नावानेही ओळखलं जातं. पंचागानुसार दिवाळीच्या आदल्या दिवशी नरक चतुर्दशी साजरी केली जाते. (Narak Chaturdashi 2022 shubh muhurt and puja vidhi nmp)

नरक चतुर्दशीच्या दिवशी पायाने फोडायचा तो चिरोटय़ाचा राक्षस.. दूध, तेल आदी उपचारांनी समृद्ध झालेले सुगंधी उटणं.. आणि सर्वावर मुकुटमणी म्हणजे गोल, वजनदार, नदीकिनाऱ्याच्या गोटय़ाप्रमाणे भासणारा गुळगुळीत, प्लॅस्टिकच्या वेष्टणातील मोती साबण. मग चला यंदा हे सगळं कधी होणार आहे आणि नरक चतुर्दशीचा मुहुर्त, पूजेचा विधी आणि धार्मिक महत्त्व समजून घेऊयात. 

या दिवशी आहे नरक चतुर्दशी

साधारणपणे छोटी दिवाळी दिवाळीच्या एक दिवस आधी म्हणजेच अश्विन कृष्ण चतुर्दशीला साजरी केली जाते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे अश्विन कृष्ण अमावस्येला दिवाळी साजरी केली जाते. मात्र यंदा नरक चतुर्दशी 24 ऑक्टोबर 2022 सोमवारी आहे. यंदा छोटी दिवाळी आणि दिवाळी एकाच दिवशी आली आहे. त्यामुळे सोमवारी सकाळी छोटी दिवाळी आणि संध्याकाळी लक्ष्मीपूजन साजरा करण्यात येणार आहे. 

नरक चतुर्दशी शुभ मुहूर्त (Narak chaturdashi 2022 shubh muhurat)

 
सूर्योदय : मुंबईच्या वेळेनुसार सकाळी 6.35 वाजता 

अभ्यंग स्नान मुहूर्त : सकाळी 5.04.59 ते 06.27.13 पर्यंत
 
ब्रह्म मुहूर्त : सकाळी 4.56 ते 5.46 पर्यंत

अभ्यंग स्नानाचं महत्त्व (Abhyanga Snan)

नरक चर्तुदशीला घरातील मोठी मंडळी आपल्याला उठवायला मागे लागते..अरे उठ लवकर उटणं लावू घे आणि आंघोळ नाही तर नरकात जाशील. तुमच्या घरी पण असं म्हणतात ना...तर यामागे एक पौराणिक कथा आहे. नरक चर्तुदशीच्या दिवशी पहाटे श्री कृष्णाने नरकासुरचा वध केला होता. नरकासुराने काही स्त्रियांना बंदी केलं होतं. त्यांची सुटका करण्यासाठी श्री कृष्णाने नरकासुरचा वध केला. असं म्हणतात की, नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला होती की, नरक चर्तुदशीला जर पहाटे मंगलस्नान करेल त्याला नरकाची बाधा होणार नाही आणि कृष्णाने नरकासुराला वर दिलं. तेव्हापासून ही परंपरा पाळली जाते. 

चला मग उद्या सकाळी अभ्यंग स्नान करुन नवीन कपडे परिधान करा आणि फराळाचा आनंद घ्या. लहान मुलं आंघोळ झाल्यावर फटाके फोडण्यासाठी आतुर असणार आहे.