४ राशींच्या लोकांनी राहा सावधान, राहुची करडी नजर

ग्रहांच्या आपल्या जीवनावर चांगला वाईट असा परिणाम होत असतो. राहू हा कडक ग्रहांपैकी एक. ज्याची करडी नजर त्या राशीच्या लोकांसाठी घातक असते. म्हणून काय उपाय कराल. 

Updated: Feb 2, 2022, 09:06 AM IST
४ राशींच्या लोकांनी राहा सावधान, राहुची करडी नजर

मुंबई : ज्योतिषशास्त्रात काही ग्रहांना अत्यंत धोकादायक मानले जाते. जसे- शनि, राहू, केतू. या ग्रहांची वाईट नजर जीवनाचा नाश करण्यासाठी पुरेशी आहे. त्यामुळे या ग्रहांमध्ये होणाऱ्या बदलांची लोकांना सर्वाधिक भीती वाटते. कारण या बदलांचा लोकांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो. पुन्हा एकदा असा मोठा बदल होणार आहे, जो 4 राशीच्या लोकांसाठी अशुभ सिद्ध होऊ शकतो.

क्रूर ग्रह बदलणार राशी 

क्रूर ग्रह मानला जाणारा राहू 12 एप्रिल 2022 रोजी आपली राशी बदलणार आहे. काही राशींसाठी वाईट काळ सुरू होऊ शकतो. त्यामुळे हे त्रास आणि नुकसान टाळण्यासाठी त्यांनी आतापासूनच काही उपाय करायला हवेत. यासाठी कुंडलीतील राहूच्या स्थितीनुसार राहूच्या शांतीसाठी उपाय करू शकतात. उदाहरणार्थ, कुत्र्याला दूध आणि ब्रेड खायला घालणे

या राशीच्या लोकांकरता कठिण काळ 

मेष  (Aries)
राहूचे संक्रमण मेष राशीत जन्मलेल्या लोकांसाठी अपमानजनक परिस्थिती निर्माण करू शकते. ते एखाद्या प्रकरणात अडकू शकतात. याशिवाय शारीरिक किंवा मानसिक वेदना होऊ शकतात. राहूच्या शांततेसाठी उपाय करणे चांगले राहील.

वृषभ (Taurus)
वृषभ राशीत जन्मलेल्या लोकांनाही राहूचे संक्रमण वाईट परिणाम देईल. त्यांचा खर्च वाढेल. कौटुंबिक समस्या असू शकतात.विचारपूर्वक खर्च करा आणि विचारपूर्वक बोला.

मकर (Capricorn)
मकर राशीत जन्मलेल्या लोकांसाठी राहूच्या राशी बदलानंतरचा काळ त्रासदायक असेल. त्यांना व्यवसाय-नोकरीमध्ये अडचणी येऊ शकतात. आईला त्रास होऊ शकतो. तुमचा वेळ संयमाने घ्या.

धनु  (Sagittarius)
राहूचे संक्रमण धनु राशीत जन्मलेल्या लोकांसाठी प्रेम जीवनात अडचणी आणेल. कदाचित काही लोकांचे ब्रेकअप. याशिवाय जोखमीची गुंतवणूक करू नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. कुटुंबातही अडचणी येऊ शकतात.