Raksha Bandhan 2021 : रक्षाबंधनला 'या' वेळेत चुकूनही भावाला बांधू नका राखी

या अशुभ काळात राखी बांधू नका

Updated: Aug 19, 2021, 12:13 PM IST
Raksha Bandhan 2021 : रक्षाबंधनला 'या' वेळेत चुकूनही भावाला बांधू नका राखी  title=

मुंबई : श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जाता. यंदा रक्षाबंधन 22 ऑगस्ट 2021 रोजी रविवारी साजरा केला जाणार आहे. हिंदूंच्या विशेषसणांपैकी एक सण म्हणून रक्षाबंधन ओळखला जातो. भावाने बहिणीचं रक्षण करावं याकरता त्याच्या मगटावर राखी बांधली जाते. तसेच भावाच्या दिर्घायुष्य आणि उज्वल भविष्याकरता बहिण हा दिवस साजरा करते. बहिण भावाच्या मनगटावर रक्षासूत्र बांधते. 

बहिण भावाला या दिवशी ओवाळते. भाऊ बहिणीच्या सुख-दुःखात साथ देण्याचे वचन देतो. या दिवशी भाऊ बहिणीला ओवाळणी देखील देतो. रक्षाबंधनच्या दिवशी एका विशिष्ट वेळी म्हणजे शुभमुहूर्तावर हा सण साजरा केला जातो. मात्र यंदा रक्षाबंधनवर राहूचा काळ आहे. हा काळ अशुभ मानला जातो. यामुळे जाणून घ्या शुभ मुहूर्त.... 

या अशुभ काळात राखी बांधू नका

भद्राची उपस्थिती सकाळी 6 वाजून 16 मिनिटांपर्यंत राहील. कोणत्याही परिस्थितीत भद्रकाळात राखी बांधू नये. भद्रकाळ हा विनाशकारी काळ मानला जातो. म्हणूनच याला अशुभ म्हटले जाते. त्यामुळे या काळात भावाला राखी बांधण अशुभ मानलं जातं. 

भद्राकाळात राखीन न बांधण्यामागे काय आहे आख्यायिका?

आख्यायिकेनुसार त्रेतायुगात रावणाने आपल्या बहिणीकडून भद्रा काळात राखी बांधून घेतली होती. यानंतर त्याच्या विनाशाला सुरुवात झाली होती आणि अखेर प्रभू श्रीरामांनी त्याचा वध करुन त्याला संपवलं होतं. त्यामुळे भद्रा काळात कोणतीही बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधत नाही.

राहूचा काळ कधी?

तर, राहू काळ संध्याकाळी 5 वाजून 5 मिनिटांपासून ते संध्याकाळी 6 वाजून 39 मिनिटांपर्यंत असेल. राहू काळातील कोणतेही काम यशस्वी होत नाही, अशी धार्मिक श्रद्धा आहे. म्हणून, राखी बांधण्याचे कामही राहु काळच्या वेळी करु नये. भद्रा आणि राहु काळ दोन्ही अशुभ मुहूर्त मानले जातात.

या मुहूर्ताला राखी बांधण भावासाठी चांगलं, जाणून घ्या शुभ मुहूर्त

पौर्णिमा तिथी – 21 ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी 07 वाजेपासून ते 22 ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी 05 वाजून 31 मिनिटांपर्यंत

 पूजेचा शुभ मुहूर्त – सकाळी 06 वाजून 15 मिनिटांपासून ते संध्याकाळी 05 वाजून 31 मिनिटांपर्यंत

 राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त – दुपारी 01 वाजून 42 मिनिटांपासून ते संध्याकाळी 04 वाजून 18 मिनिटांपर्यंत राहील