Ravivar Upay : पैशांची चणचण जाणवतंय? मग रविवारी रात्री करा 'हा' छोटासा उपाय

Ravivar Remedies : रविवार म्हणजे सूर्य देवाचा वार. ज्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय. त्यांनी रविवार छोटासा उपाय केल्यास यावर मात करु शकतात असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे. 

Updated: Dec 4, 2022, 06:46 AM IST
Ravivar Upay : पैशांची चणचण जाणवतंय? मग रविवारी रात्री करा 'हा' छोटासा उपाय title=
Ravivar Upay Sunday Upay for money and Take a small measure on Sunday to overcome the financial crisis remedies for money nmp

Sunday Evening Remedies : हिंदू धर्मात देवांना विशेष महत्त्व असून अनेक देव आहेत. त्यामुळे प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवाचा दिवस मानला जातो. सोमवार हा शंकराचा तर मंगळवार हा गणपतीचा वार आहे. तसाच रविवार हा सूर्य देवतेचा वार आहे. ज्योतिषशास्त्रात असं म्हटलं जातं की रविवारी सूर्यदेवाची आराधना आणि उपवास केल्यास मनुष्याचे सगळे संकट नाहीसे होतात. जर तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागतं असेल, रविवारच्या दिवशी उपाय केल्यास तुम्हाला पैशांची चणचण जाणवणार नाही असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. जाणून घ्या आज रविवारच्या दिवशी काय उपाय करायचे ते... (Ravivar Upay Sunday Upay for money and Take a small measure on Sunday to overcome the financial crisis remedies for money)

रविवारी हा उपाय करा 

पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा

ज्योतिषशास्त्रानुसार रविवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावणं शुभ मानलं जातं. यामुळे घरात सुख-शांती नांदते, व्यक्तीचा दर्जा वाढतो आणि आर्थिक संकट दूर होतं. 

चौकोनी दिवा लावावा

ज्योतिषशास्त्रानुसार रविवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली चार तोंडी दिवा लावल्यास व्यक्तीला मान-सन्मान मिळतो. यासोबतच कार्यालयातील प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतात. 

काळ्या वस्तूंचं दान करा

रविवारी संध्याकाळी काळे तीळ, काळे कापड, काळी उडीद किंवा काळी मिरी दान केल्याने व्यक्तीवरील वाईट परिणाम दूर होतात. 

झोपताना हा उपाय करा 

जर तुम्हाला खूप जास्त पैशांची चणचण जाणवतं असेल तर हा उपाय नक्की करा. झोपताना एक ग्लास दूध डोक्याजवळ ठेवावे आणि रविवारी सकाळी सूर्योदयापूर्वी आंघोळ करून बाभळीच्या झाडाला अर्पण करावे. हा उपाय सलग 11 रविवार करा. यामुळे व्यक्तीची आर्थिक संकटातून सुटका होते. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)