Shani Ast: फेब्रुवारी महिन्यात शनीदेव होणार अस्त; 'या' राशींचं भाग्य चमकणार

Shani Ast 2024: आगामी महिन्यात शनीच्या स्थितीमध्ये बदल होणार आहे. 11 फेब्रुवारी ते 18 मार्चपर्यंत शनि कुंभ राशीत अस्त होणार आहे. त्याचा प्रभाव 38 दिवस राहणार आहे. शनीच्या चालीतील बदलामुळे सर्व राशींवर परिणाम होईल.

सुरभि जगदीश | Updated: Jan 16, 2024, 10:50 AM IST
Shani Ast: फेब्रुवारी महिन्यात शनीदेव होणार अस्त; 'या' राशींचं भाग्य चमकणार title=

Shani Ast 2024: वैदिक ज्योतिषशास्त्राप्रमाणे ग्रह त्यांच्या निश्चित वेळी गोचर करतात. म्हणजेच एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतात. यामध्ये शनी हा सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह आहे. शनी हा जीवन, परिश्रम आणि आरोग्याचा कारक मानला जातो. कुंडलीत शनीची मजबूत स्थिती लोकांसाठी सुख आणि सौभाग्याची शक्यता निर्माण करते. 

आगामी महिन्यात शनीच्या स्थितीमध्ये बदल होणार आहे. 11 फेब्रुवारी ते 18 मार्चपर्यंत शनि कुंभ राशीत अस्त होणार आहे. त्याचा प्रभाव 38 दिवस राहणार आहे. शनीच्या चालीतील बदलामुळे सर्व राशींवर परिणाम होईल. मात्र यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

मिथुन रास (Gemini)

मिथुन राशीच्या लोकांसाठी शनीची स्थिती शुभ राहणार आहे. कुटुंबात समृद्धी येणार आहे. करिअरमध्ये प्रगती होणार आहे. अचानक आर्थिक लाभ होईल. तुमच्या आयुष्यातील हा काळ प्रत्येक क्षेत्रात लाभ देऊ शकतो. तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात. तुम्हाला धार्मिक कार्यात रस असल्यास प्रवासालाही जाऊ शकता.

कर्क रास (Cancer)

कर्क राशीच्या लोकांना 38 दिवस लाभ होणार आहे. करिअर आणि व्यवसायात फायदा होईल. वैयक्तिक जीवन देखील आनंदाने भरलेले असेल. मेहनतीचे चांगले फळ मिळेल. तुम्हाला गुप्त शत्रूंवरही विजय मिळवता येणार आहे. नवीन व्यवसाय सुरू करू शकता. या काळात तुम्हाला मोठ्या प्रमाणात नफा मिळणार आहे. या राशीच्या व्यक्तींना अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळू शकतात.

मेष रास (Aries)

मेष राशीच्या लोकांवर वर्षभर शनीची कृपा राहणार आहे. मेहनतीचे गोड फळ मिळेल. पदोन्नतीचे योग येतील. कामाच्या ठिकाणी काही अडचणी येणार नाहीत. तुमच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडणार आहे.  तुमचे वैवाहिक जीवन चांगलं होणार आहे. आर्थिक, व्यवसाय आणि करिअरसाठी काळ खूप खास असणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)